Home / यवतमाळ-जिल्हा / भुरकी गावातील अंगणवाडी...

यवतमाळ-जिल्हा

भुरकी गावातील अंगणवाडी मदतनीस प्रक्रियेत मोठा घोळ, महिला बाल विकास विभागातील अधिकारी सामील असल्याची शंका.

भुरकी गावातील अंगणवाडी मदतनीस प्रक्रियेत मोठा घोळ, महिला बाल विकास विभागातील अधिकारी सामील असल्याची शंका.
ads images
ads images
ads images

वणी:- महिला बाल विकास विभाग व एकात्मिक बाल विकास योजना प्रकल्प  वणी जिल्हा यवमाळ मार्फत सन - २०२३ ते २०२४ मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदभरती करण्यात आली. त्यात १९/०६/२०२३ रोजी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. त्यात वणी तालुक्यातील भूरकी या गावातील अंगणवाडी मदतनीस पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. तर गावातील एकूण पाच उमेदवारांनी  उमेदवारी अर्ज दाखल केला त्यातील नामे

Advertisement

जयश्री शरद खोंड,

प्रियांका राकेश झाडे,

कोमल अतूल देऊळकर,

प्रणाली अमोल लांबट,

पूजा आकाश उपरे,

तर,

एकात्मिक महिला व बाल विकास वणी द्वारा उमेदवार गुण क्रमांक यादी दिनांक - ०३/०८/२०२३ रोजी प्रसिद्ध झाली.

त्या यादीतील गुण हे वर्ग १२ वी च्या पात्रतेनुसार घेण्यात आलेले होते.

उमेदवार  प्रियांका राकेश झाडे या भुरकी या गावातील कार्यरत असलेल्या अंगनवाडी सेविका यांचा सून आहेत .

त्या यादीत उमेदवार यादी प्रसिद्ध झाली त्यात १२ वी वर्गाचे गुण हे ८२.४६% दिले आहे. तर त्या उमेदवार यांना १२ वी च्या ओरिजनल मार्क्सशिट मध्ये ४७.६९% आहे.

त्या पदभरती मध्ये घोटाळा झाला आहे. तर या प्रकरणी आक्षेप घेण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे  बाल विकास प्रकल्प अधिकारी तसेच  गटविकास प्रकल्प अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले. तरी वरील तक्रारीचा लवकरात लवकर वरील घटकांची चौकशी करून योग्य त्या उमेदवारास न्याय मिळवून देण्यात  यावा. वरील मुद्यांची योग्य ती तपासणी करून घोटाळा करणाऱ्यां विरोधात योग्य ती कार्यवाही करण्यात यावी व त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. अशी मागणी कोमल देऊळकर, जयश्री खोंड,प्रणाली लांबट, या उमेदवारांनी बालविकास प्रकल्प अधिकारी वणी यांच्या कडे तक्रार दाखल केली आहे.  या तक्रारीची चौकशी करून काय कारवाई करणार याकडे उमेदवारांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

यवतमाळ-जिल्हातील बातम्या

महायुती चे उमेदवार आ.बोदकुरवार यांना कुणबी समाजाचे युवा उभरता चेहरा महेश पहापळे यांचा पाठिंबा.

वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...

आतापर्यंत सगळ्याला आजमावले एकदा मनसेला संधी द्या- राजू उंबरकर

वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...

गळफास घेतलेल्या अवस्थेत अनोळखी ईसमाचा मॄतदेह आढळला.

:- वणी आज दिनांक ५ नोव्हेंबर रोजी सकाळी वणी वरोरा मार्गावरील रेल्वे गेटच्या बाजूला अनोळखी इसमाने गळफास घेतलेल्या...