वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
वणी:- गेल्या चार-पाच दिवसांपासून वणी शहरात डॉ.लोढा यांच्या निष्काळजीपणा मुळे नवजात बाळ विकृत जन्माला आले.अशी ओरड सुरू आहे.तसेच बाळाच्या फोटो सह डॉ.लोढा यांचा फोटो लावून सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे.
यावर डॉ.महेंन्द्र लोढा यांनी ४ ऑगष्ट रोजी स्थानीक विश्रामगृहात पत्रकार परिषद आयोजित करून या संपूर्ण प्रकरणा बाबत खुलासा केला. त्याचेवर झालेले आरोप खोडून काढले. तसेच सदर घटनेमुळे व्यथित होऊन वणी ग्रामीण रुग्णालयाच्या मानवसेवी स्त्रीरोग चिकित्सक या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती दिली.
सविस्तर वृत्त असे की वणी शहरातील भगतसिंग चौक परिसरातील एका स्त्रिची २८ जुलै रोजी ग्रामीण रूग्णालय ८ महिने काही दिवसात प्रसूती झाली. प्रसूती नंतर नवजात बाळाच्या बेंबीच्या ठिकाणी अतिरिक्त मांस आलेले दिसले, तसेच बाळाला शौच व लघवीचे अवयव दिसून आले नाही. त्यामुळे त्या बाळाच्या पालकांनी डॉ.लोढा यांना जाब विचारला की आंम्हि आपल्या खाजगी रुग्णालयात माझ्या पत्नीची सोनोग्राफी करून घेतली त्यावेळी डॉक्टरांनी बाळाच्या वाढीबाबत माहिती दिली नाही. आपले बाळ छान आहे. असे सांगितले तर असे विकृत बाळ का जन्माला आले. असा आरोप नवजात बाळाच्या पालकांनी केला.
त्यामुळे बाळाच्या पालकांनी वणी पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल केली. व स्थानिक विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.
यावर डॉ.महेंन्द्र लोढा यांनी खुलासा केला की, लोढा हॉस्पिटल मध्ये साधी लेवल (१) ची सोनोग्राफी मशीन आहे. महिलेनी ज्या दिवशी सोनोग्राफी केली तेंव्हा गर्भाशयातील बाळ २२ आठवड्याचे होते. लेव्हल १ च्या मशीन मध्ये पुरेशी माहिती दिली जात नाही.त्यासाठी मी सदर महिला पेशंटला ३ डी सोनोग्राफी केंद्रांवर जाऊन सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला. त्या बाबतचे रेफर लेटर महिलेला दिले. मात्र त्या महिलेने ती सोनोग्राफी केली नाही. सदर महिला त्यानंतर तपासणी साठी आली नाही. त्यांनी तपासणी न केल्याने बाळाच्या प्रकृती बाबत कोणतीही माहिती मिळाली नाही.
जर सदर महिलेनी सर्व तपासण्या वेळोवेळी केल्या असत्या तर बाळाच्या प्रकृती बाबत आधीच निदान झाले असते. एक डॉक्टर म्हणून यात कोणताही निष्काळजीपणा आला नाही. असा खुलासा डॉ.लोढा यांनी दिला.
तसेच वणी ग्रामीण रुग्णालयात काही खाजगी स्पेशालिस्ट डॉक्टरांना प्रशासन मानधन तत्वावर नियुक्ती करतात. डॉ. लोढा हे ग्रामीण रुग्णालयात स्त्रि रोग चिकित्सक म्हणून काम करीत आहे. या प्रकरणात नंतर डॉ.लोढा यांनी जिल्हा शल्य चिकित्सक यवतमाळ यांचेकडे पदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे.
या बाबत काय कारवाई केली जाणार आहे याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...
वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...