वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
वणी:- एखाद्या फिल्ममध्ये चहावाला आपल्याला दिसतो. ती काही फार विशेष कौतुकाची बाब नाही. मात्र एखादा चहावाला जर शॉर्ट फिल्म बनवत असेल तर ती नक्कीच कौतुकाची गोष्ट आहे. एक चहावाला एक दोन नव्हे तर चार-पाच शॉर्ट फिल्म तयार करतो. हे कार्य नक्कीच कौतुकास्पद आहे. हा चहावाला आहे अक्षय रामदास रामटेके. वणीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात त्याचं चहाचं दुकान आहे. पहाटे चार-पाच वाजता उठायचं. नंतर सकाळी सहा-सातला दुकान उघडायचं. आणि रात्री आठ वाजेपर्यंत ग्राहकांना चहाची सेवा द्यायची. असा हा अक्षयचा नित्यक्रम.
"गुरुजी" ही 2019 मध्ये आलेली अक्षयची पहिली शॉर्ट फिल्म. विशेष म्हणजे अक्षयचे नियमित ग्राहक असलेले शिक्षक शंकर घुगरे यांनी त्याला या फिल्मसाठी विशेष मदत केली. सन 2020 मध्ये "शिव विचारधारा", सन 2021 मध्ये "स्माईल", एक रेडिओ वरची, "अविनाश" आणि 2023ची "आस" आदी शॉर्ट फिल्म्स ह्या अक्षयच्या कलाकृती.
कला शाखेतून अक्षयन ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. अक्षयचा मोठा भाऊ आशीष याचे 2004 मध्ये निधन झाले. त्यामुळें वडिलांना हातभार लावण्याकरिता अक्षयला या व्यवसायात यावं लागलं. शॉर्ट फिल्म तयार करण्याचं तंत्रशुद्ध शिक्षण घ्यावं, अशी त्याची इच्छा अजूनही कायम आहे. सुरुवातीला शॉर्ट फिल्म तयार करण्याच्या उद्योगाला घरून विरोध झाला. नंतर मात्र वडील रामदास आणि आई सिंधुताई यांनी त्याला प्रोत्साहन दिलं. किंबहुना त्याला मुंबईला प्रशिक्षणासाठीदेखील पाठवण्याची तयारी वडलांनी दाखवली.
अक्षय म्हणतो की, तो जास्तीत जास्त निरीक्षणातूनच शिकत गेला. कोणतीही फिल्म पाहताना तो त्यातील बारकावे आणि विविध पैलू सूक्ष्मपणे अभ्यासत होता. अनेक पिक्चर मेकिंग पाहत होता. युट्युब आणि विविध माध्यमांतून पुढं त्यानं अभ्यास देखील केला. फिल्म मेकिंगसाठी त्याला बाहेरून कुठलंच मार्गदर्शन मिळालं नाही. तरीही "करके देखेंगे" म्हणून अक्षयने या क्षेत्रात पाऊल टाकलं. सुरुवात अर्थात स्मार्टफोनने झाली. तो स्मार्टफोनं शुटिंग करायला लागला. पुढं चालून कॅमेरा आणि एडिटिंग तंत्र समजून घेऊ लागला. "अत्त दीप भव" या उक्तीप्रमाणं तो स्वतःच स्वतःचा गुरु झाला. डायरेक्शन, सिनेमॅटोग्राफी, एडिटिंग करतो. कॅमेऱ्यासाठी अतुल खोब्रागडे, अविनाश शिवनितवार, हर्षद गौरकार, गौरव गुल्हे आदी मित्रांची मदत मिळाली.
"अविनाश" ही शॉर्ट फिल्म अक्षयसाठी चॅलेंजच होती. त्याची स्क्रिप्ट गणेश मते यांनी लिहिली. अक्षयला दिवसभर वेळ मिळत नाही. त्यामुळं रात्री दुकान बंद झाल्यानंतर उशिरापर्यंत तो शॉर्ट फिल्मवर काम करतो. "अविनाश"चं एडिटिंग करायला जवळपास चार महिने लागले. हा सगळा खर्च अक्षय आणि गणेश मत्ते यांनी केला.
कोरोना काळातील लॉकडाऊनचा व्यावसायिक फटका बसला. मात्र या संकटाचंही त्यानं संधीत रुपांतर केलं.
आपला नियमित व्यवसाय सांभाळून त्याला या क्षेत्रात भरपूर कार्य करायचं आहे. अनेक विविध विषयांवर त्याला शॉर्ट फिल्म तयार करायच्या आहेत. शहर आणि परिसरातील दर्जेदार कलावंतांना घेऊन एक मोठा प्रोजेक्ट त्याला करायचा आहे. जमेल तिथून आणि जमेल तसं ज्ञान प्राप्त करून रसिकांना चांगली कलाकृती देण्याचा त्याचा मानस आहे. "कट" हा शब्द अक्षयसाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याच्या चहाच्या व्यवसायात देखील "कट" आहे आणि फिल्म मेकिंगच्यासुद्धा. त्याच्या भविष्यकालीन कलाकृतींसाठी सदिच्छा.
सुनील इंदुवामन ठाकरे.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...
वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...