आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
मारेगाव:तालुक्यातील साखरा (महागाव) तलावा नजीक काळं सोन म्हणून ओळखला जाणारा कोळशाचां साठा असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहे .
केंद्रीय कोल इंडियाच्या अधिनिस्त काम करणाऱ्या सी.एम.पी.टी.आय या खाजगी कंपनीने कोळशाचा शोध घेतला आहे.मारेगाव तालुक्यातील कुंभा महसूल मंडळ अंतर्गत येणाऱ्या मांगली ,साखरा, कोथूर्ला शिवारात काही दिवसापासून केंद्रीय कोल इंडियाच्या कंत्राटदारामार्फत कोळशाची चाचपणी सुरू आहे. सध्या मांगली व साखरा शिवारात बोरवेलच्या माध्यमातून कोळसा शोधला जात आहे.
अशातच साखरा शिवारातील महागाव सिंचन तलाव नजिक केंद्रीय कोल इंडियाच्या मार्गदर्शनाखाली काम करणाऱ्या सी.एम.पी.टी.आय खाजगी कंपनीने बोरवेल द्वारे कोळशाची तपासणी केली असता १५० मीटर अंतरावर कोळसा साठा असल्याचे संबधित कंपनीला निदर्शनास आले आहे. सदर कोळशाचा थर 18 मीटरचा असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.याबाबतचा अहवाल केंद्रीय कोल इंडियाच्या मंत्रालयातील विभागात सादर केला जाणार आहे. केंद्रीय कोल इंडियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी नाव न छापण्याच्या अटीवर ही माहिती “भारतीय वार्ता ला” प्राप्त झाली आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचे नशीब पालटणार आहे.
सातत्याने कर्जाच्या कचाट्यात व आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सुवर्ण झळाळी मिळणार असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहे. तर दुसरीकडे शेत जमिनीचे दर चांगलेच वधारणार आहे. याबाबत मारेगावचे तहसीलदार उत्तम निलावाड यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.
महसूल विभाग अनभिज्ञ
तालुक्यातील कुंभा महसूल मंडळात कोल इंडिया खाजगी कंपनीमार्फत कोळसा तपासात आहे. याबाबतची साधी कुणकुण सुद्धा महसूल विभागाला नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासन किती सजग आहे याची प्रचिती येत आहे.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...
मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...
*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...