*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे*
*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...
Reg No. MH-36-0010493
झरी: दिनांक २९ जुलै २०१४ रोजी, फडणवीस सरकार २०१४ ला सत्तेत यायच्या आधी धनगर समाजाला विविध प्रकारच्या फसव्या योजना सांगून व एसटी आरक्षणाच गाजर दाखवून केंद्रात व राज्यात सत्तेत आले पण तरीही येरे माझ्या मागल्या अशीच अवस्था झाली आहे. या घटनेला 29 जुलै 2023 रोजी नऊ वर्षे पूर्ण झाली असून आणखी समाजाला एसटी आरक्षण मिळालेलं नाही आहे. फडवणीस सरकार कधीपर्यंत फसविणार आहे समाजाला असा प्रश्न निर्माण झाला आहे.आता धनगर समाज हा जागा झाला असून बीजेपी सरकारला येत्या २०२४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जागा दाखवून देवू अशी ग्वाही या ठिकाणी दिली. 29 जुलै हा दिवस आत्मघात दिवस म्हणून युवकांनी निषेध नोंदविला.२२ योजनांचं गाजर समाजाला फडणवीस यांनी दाखवलं पण अजूनही खावू दिलं नाही, आज राना वनात मेंडपाळ मेंढ्या चरायला घेऊन जातो तेव्हा काही लोक त्यांना मारहाण करतात , जबर जखमी करतात यावर सरकारने त्यांना मोफत चाराई पास द्यावा , समाजाला राहण्यासाठी घरकुल योजनेचा लाभ मिळावा , प्रत्येक जिल्हास्तरावर पशू आरोग्य व प्रशिक्षण महाविद्यालय उभे करणे , धनगर बहुल गावात अहिल्यादेवी सामाजिक सभागृह , अश्या विविध प्रकारच्या मागण्या करिता व सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराजा यशवंतराव होळकर युवा मंचच्या वतीने तोंडाला काळे फासून व काळे कपडे परिधान करून सरकारचा जाहीर निषेध केला, यावेळी महाराजा यशवंतराव होळकर युवा मंच चे अध्यक्ष उमेश शेरकि , गंगाधर बोधे, विठ्ठल बोधे, संजय बोधे, धनंजय गोंडे, संदीप बोधे, नैतिक बोधे, तन्मय बोधे, संदीप येवले, प्रफुल बोधे, मारोती गोंडे, प्रतीक उरकुडे, प्रवीण बोधे, ज्ञानदीप बोधे, संजय बोधे, उज्वल बोधे, विजय बोधे, आनोज चामाठे , विजय चामाठे, अरुण उरकुडे , सुभाष निपुंगे, मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.
*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...
*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...
*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...
झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...
वणीः- राष्ट्रीय पातळीवर छत्तीसगढ राज्यातील दुर्ग येथे दिनांक २४ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२४ या दरम्यान राष्ट्रीय पातळीवर...
झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...