Home / यवतमाळ-जिल्हा / 4 ऑगस्ट ला वणी आणि मारेगाव...

यवतमाळ-जिल्हा

4 ऑगस्ट ला वणी आणि मारेगाव तालुक्यात मंडल यात्रेचा जनजागृती दौरा

4 ऑगस्ट ला वणी आणि मारेगाव  तालुक्यात मंडल यात्रेचा जनजागृती दौरा
ads images
ads images
ads images

7 ऑगस्ट मंडल दिनाच्या औचित्याने ” ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी जनजागृती अभियान विदर्भातील सर्व जिल्ह्यात

वणी: 7 ऑगस्ट मंडल दिनाच्या औचित्याने ” ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी,जनजागृती अभियान विदर्भातील सर्व जिल्ह्यात राबविले जात असून याच अभियानाचा टप्पा म्हणून सदर मंडल यात्रा 4 ऑगस्ट 2023 ला वणी आणि मारेगाव तालुक्यातील गावांमध्ये येणार आहे.ओबीसी जनगणना झालीच पाहिजे या मुख्य मागणीसह अन्य मागण्या शासनातर्फे मान्य करून घेण्यासाठी “ 7 ऑगस्ट मंडल दिनाच्या औचित्याने ” ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी जनजागृती अभियान विदर्भातील 7 जिल्ह्यात 30 जुलै ते 6 ऑगस्ट 2023 पर्यत राबविण्यात येत आहे.या अभियानात 1) जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. (2) ओबीसी विद्यार्थ्यांसाठी 72 वसतीगृहे व 21,600 विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजना लागू झाली पाहिजे.

Advertisement

(3) सर्व व्यवसायिक अभ्यासक्रमांना 100% फी माफी योजना लागु करावी. (4) महाज्योती संस्थेस 1000 कोटी रूपयाचा निधी मिळाला पाहिजे.(5) इतर मागास आर्थिक विकास महामंडळाला 1000 कोटीचा निधी मिळाला पाहिजे. (6) इतर मागास बहुजन कल्या विभागाद्वारे सर्व जिल्ह्यात स्वतंत्र कार्यालय, अधिकारी व ओबीसी भवन निर्माण झाले पाहिजेत (7) इतर मागास बहुजन कल्याण विभागाला 30,000 करोड रूपयाचा निधी मिळाला पाहिजे. (8) तात्काळ शिक्षक भर्ती झाली पाहिजे. (9) शेतकऱ्यांच्या लाला हमी भाव मिळाला पाहिजे (10) स्वामीनाथन आयोग लागू करा. इत्यादी मागण्या शासनदरबारी मान्य करण्यात याव्या यासाठी अभियान राबविण्यात येत आहे. दिनांक 4 ऑगस्ट 2023 ला मंडल यात्रा वणी तालुक्यातील नायगाव (बु) येथेसकाळी 10.30 वा. पुनवट येथे सकाळी 10.45 वा. पुरड येथे सकाळी 11.00 वा. शेलू (बु) येथे सकाळी 11.15 वा. चारगाव चौकी येथे सकाळी 11.30 वा. केसुर्ली येथे सकाळी 11.45 वा. वणी येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात दुपारी 12.00 वाजता तसेच चिखलगाव येथे दुपारी 1.00 वाजता यात्रा पोहचणार आहे.

माजी प्रधानमंत्री, व्ही. पी. सिंग ओबीसी मसीहा, बी. पी. मंडल यांच्या प्रेरणेतून ही यात्रा नियोजित आहे.वणी तालुक्यासोबतच मारेगाव तालुक्यातील गावात ही यात्रा पोहचणार आहे. दि 4 ऑगस्ट 2023 ला मंडल यात्रेच्या आगमनानिमीत्त्य मारेगाव तालुक्यातील खालील गावात स्वागत व सभा आयोजित केलेल्या आहेत. यामध्ये दुपारी 1.30 वा. मंगरूळ येथे. मारेगाव येथे (मार्डी चौक) दुपारी 2.00 वाजता. करणवाडी येथे दुपारी 2.30 वाजता तर बोटोनी येथे दुपारी 3.00 वाजता सभा होणार आहेत.

ओबीसी महिला समन्वय समिती, सन्मान स्त्री-शक्ती फाऊंडेशन, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटना,विदर्भ राज्य आंदोलन समिती आणि OBC (VJ, NT, SBC) जातनिहाय जनगणना कृती समिती, वणी-मारेगाव-झरी, जि. यवतमाळ इत्यादी संघटनेनी जनतेला यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

यवतमाळ-जिल्हातील बातम्या

महायुती चे उमेदवार आ.बोदकुरवार यांना कुणबी समाजाचे युवा उभरता चेहरा महेश पहापळे यांचा पाठिंबा.

वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...

आतापर्यंत सगळ्याला आजमावले एकदा मनसेला संधी द्या- राजू उंबरकर

वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...

गळफास घेतलेल्या अवस्थेत अनोळखी ईसमाचा मॄतदेह आढळला.

:- वणी आज दिनांक ५ नोव्हेंबर रोजी सकाळी वणी वरोरा मार्गावरील रेल्वे गेटच्या बाजूला अनोळखी इसमाने गळफास घेतलेल्या...