वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
मुकुटबन: झरी जामनी तालुक्यातील मोठी बाजारपेठ आणि आरसिपीएल सिमेंट उद्योगामुळे प्रसिद्धीस आलेल्या मुकुटबन नगराला असंख्य समस्यांनी ग्रासले आहे. मुकुटबन स्मार्ट नगर नाही तर भकास नगर अशी म्हणायची वेळ आली आहे.
काही दिवसाआधी लोकमत पेपरला स्मार्ट मुकुटबन ची बातमी व जाहीरात आली होती परंतु प्रत्यक्ष मुकुटबन चा प्रत्येक वार्ड समस्या ने ग्रासला आहे . वार्ड न. 5 मध्ये तर बिकट परिस्थीती आहे . सरपंच स्वता या वार्डाचे असुन सुद्धा अनेक समस्या या वार्डात आहेत . सांडपाण्याची व नाल्याची समस्या गंभीर आहे . या समस्येमुळे वार्डातील नागरीकाचे वादविवाद होऊन राहीले आहे . नेहमी सुचना देवुन व निवेदन देखील दिला असुन त्यावर कोणतीही कार्यवाही अजुनपर्यंत झाली नाही.वार्ड न.5 मध्ये सांडपाण्यावर योग्य प्रक्रिया न करता, योग्यरीत्या सांडपाण्याची विल्हेवाट न लावता , हे सांडपाणी रस्त्यावर येत आहे.त्यामुळे डासांची पैदास मोठ्या प्रमाणात होऊन रोगराईला आमंत्रण दिल्या जात आहे.तसेच या वार्डातील नाल्या या कच्या आहे त्याचे पक्के बांधकाम होणे गरजेचे आहे परंतु ग्रामपंचायत ने याकडे सपशेल दुर्लक्ष केले आहे.ग्रामपंचायत ने लवकरात लवकर या समस्यांकडे जातीने लक्ष घालून या समस्यांचे निराकरण करावे अशी स्थानिकांची मागणी आहे. या मागणीचे निवेदन वार्ड न.5 मधील नागरिकांनी सरपंच ग्रामपंचायत मुकुटबन यांना 27 जुलै 2023 दिले. यामध्ये सुरेंद्र गेडाम सर राकेश काकरवार, आदींच्या सह्या आहे
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...
वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...