आई म्हणजे ममता तसेच आई म्हणजे आत्मा आणि आई म्हणजे ईश्वर या दोघांचा संगम म्हणजे आई होय. मायेची पाखरण करणारी एक स्त्री होय.एखादी स्त्री जेव्हा अपत्यास जन्म देते त्यावेळेस तिला मातृत्व प्राप्त होते. आणि समाजाच्या दृष्टीने ती त्या अपत्याची आई बनते. आईचे खरे प्रेम आणि पालनपोषण या सोबत कशाचीही तुलना केली जाऊ शकत नाही. आमच्या आयुष्यातील ती एकमेव महिला आहे जी कोणत्याही हेतूशिवाय आपल्या मुलाला भरपूर प्रेमळ काळजी देते. मूल म्हणजे आईसाठी सर्वकाही.आई या विषयावर कु पूर्वी विलास मडावी या इयत्ता 7 वी मध्ये शिकणाऱ्या जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थिनीने अत्यंत मार्फक अशी काव्यरचना केली आहे. कु पूर्वी विलास मडावी मु आयता ता आर्णी जि यवतमाळ येथील कष्टकरी कुटुंबात पूर्वीचा जन्म झाला.पूर्वीचे आई वडील दोन्ही शेतात कष्ट करतात. मोलमजुरी करून पूर्वीचे आईवडील संसाराचा गाडा चालवीत आहे. पूर्वीला चांगले संस्कार, शिक्षण देऊन पूर्वीच्या बौद्धिक, शारीरिक आणि मानसिक विकासात मौलाचा वाटा उचलत आहे.अवघ्या 14 वर्षाच्या या नवउदयोन्मुख कवयत्रिच्या यशात आईवडिलांचा महत्वाचा वाटा आहे. तसेच पूर्वीची आई सौ मंदा विलास मडावी या आयता गावच्या सरपंच आहेत.
आई
नऊ महिने त्रास सहन करून,
जि आपल्याला या जगात आनते ति आपली आई असते
जि आपली पहिली शाळा बनते
ति आपली आई असते
जे आपले सर्व हट्ट पुरवते ति
आपली आई असते
चुकल्यावर आपन आपल्यावर
जी प्रेमाने रागावते
ती आपली आई असते
जि आपल्यावर निस्वार्थपणे प्रेम करते
ती आपली आई असते
लहानापासून मोठ्यांची काळजी घेते पण स्वतःच्या काळजीकडे जिच लक्ष नसते
ति आपली आई असते.
जि दिवसभर काम करून
थकते, दमते ,कंटाळते
तरीही उत्साहाने आपल्या
अभ्यासात आपली मदत करते ति आपली आईच असते
जेव्हा आपण आजारी असतो
तेव्हा जि रात्रभर जागी राहते
ति आपली आईच असते.
स्वतःला होणारा त्रास आणि
दु:ख लपवून जी आपल्या कुटुंबासाठी जगते
ति आपली आईच असते
आपल्या चांगल्यासाठी जी नेहमी देवाकडे प्रार्थना करते
ति आपली आई असते,
जि आपल्याला वाईट नजरे- पासुन वाचवून ठेवते ति आपली आई असते.
जिच्यासाठी तिच सर्वकाही तिचे लेकर आनी कूटूंब
असते
ति फक्त आपली आईच असते
कु. पूर्वी विलास मडावी . वर्ग- 7वा
मु.पो.आयता ता.आर्णी जी.यवतमाळ
७६६६० ६३०८७