Home / यवतमाळ-जिल्हा / हरहुन्नरी कलावंत, साहित्यिक...

यवतमाळ-जिल्हा

हरहुन्नरी कलावंत, साहित्यिक वणी न्युज एक्स्प्रेस वृत्तवाहिनीचे संपादक तथा पत्रकार.

हरहुन्नरी कलावंत, साहित्यिक वणी न्युज एक्स्प्रेस वृत्तवाहिनीचे संपादक तथा पत्रकार.
ads images
ads images
ads images

विनोदकुमार आदे यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

वणी:- विनोदकुमार आदे यांचा जन्म 26 जुलै 1984 रोजी यवतमाळ जिल्ह्यातील मारेगांव तालुक्यातील नवरगांव (धरण) या गावी झाला. घरची परिस्थिती जेमतेम त्यात वडील सुतार काम करत आई मोलमजुरी करीत होती. वर्ग पहीलीचे शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवरगांव येथे झाले असून पुढील शिक्षण मारेगांव व वणी येथे झाले. 1992 ला नवरगाव सोडून मारेगांव येथे स्थायिक झाले. नवरगाव येथील प्रसिद्ध मुर्तिकार विनायक शतपलक यांच्या मुर्तिकलेने प्रेरित होऊन विनोदकुमारने मुर्तिकला अवघत करून मुर्तिकला क्षेत्रात आज रोजी वणी उपविभागात अव्वल स्थान निर्माण केले व हळूहळू ईतर कला ही अवघत करत 101 कलेचे धनी म्हणून आज यांची ख्याती आहेत. त्यामुळेच विनोदकुमार परिसरातील सर्वपरिचित असं नावं आहे. अगदी लहानपणापासूनच त्यांना कला क्षेत्रात आवड असल्याने त्यांनी आपल्या जिद्द आणि मेहनतीने विविध कलेत लौकिक मिळवलेले आहे. हस्तकला, चित्रकला, मूर्तिकला, रांगोळी, गीतकार, कवी, निवेदक, गायक, अभिनय, अश्या विविध क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटवला. सध्या ते "वणी न्यूज एक्सप्रेस" या आघाडीच्या वृत्तवाहिनीचे संपादक म्हणून काम करत आहेत. विनोदकुमार एक कलावंत आहेच पण सोबतचं त्यांनी सामाजिक कार्याचा वसाही सांभाळला आहे. त्यांनी विविध सामाजिक संघटनासोबत काम केले. स्वतः सामाजिक संघटना निर्माण केली. 2002 मध्ये मारेगाव येथे स्थापन झालेल्या श्री. गुरुदेव सत्संग सेवा समिती च्या माध्यमातून विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम, कला महोत्सव, आरोग्य शिबीरे, कवी संमेलनांचे मोठ्या थाटामाटात आयोजन केले.स्वातंत्र्य दिन, गणराज्य दिवस असो की, छत्रपती शिवाजी महाराज जयंती असो, मारेगावच्या जिजाऊ चौकात विनोदकुमार निःस्वार्थ वृत्तीने रांगोळी साकारायचे.या त्यांच्या विविध क्षेत्रातील निःस्वार्थ कार्यामुळे त्यांचा अनेक मंचवरुन गौरव करण्यात आला."शुसगंगा पॉलीटेक्निक कॉलेज" मध्ये मायनिंग शाखेत शिकत असतांना 2013 मध्ये त्यांनी तयार केलेल्या सायन्स मॉडेलला नंदुरकर अभियांत्रिकी महाविद्यालय, यवतमाळ येथे प्रथम तर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावती येथे द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. विज्ञानाच्या साह्याने स्वयंपूर्ण वणी शहर ही प्रतिकृती राज्यस्तरावर कौतुकाचा विषय बनली होती.कोव्हीड 19 च्या काळातही शासनाच्या नियमांचे पालन करुन वणी येथील जैताई मंदिराच्या बाजूने दुर्गा उत्सवात त्यांनी कोरोना आजाराशी संबंधित जनजागृतिपर तयार केलेला देखावा हा वणीकरांच्या कुतूहलाचा विषय ठरला होता.

Advertisement

वणी उपविभागात सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनी प्रज्वलन (कलामहोत्सव)

याचे मोठ्या स्तरावर आयोजन करून कलावंताच्या कौशल्याला न्याय देण्यासाठी मंचही उपलब्ध करून दिला.

नुकताच आदिवासी साहित्य परिषदेत त्यांचा टुकार काव्यसंग्रह प्रकाशित करण्यात आला तसेच कथा लेखन, लघुचित्रपट निर्मिती, स्वतःचा कुमार रेकाॅर्डिंग व फिल्म मेकिंग स्टुडीओ असून स्वतःचा आर्केस्ट्रा देखील आहेत.

हाॅटेलात कपबश्या धुणारा, उन्हातान्हात रेती मसाला कालवणारा, भंगार गोळा करणारा.

विनोदकुमार यांचा प्रवास हा असा शून्यातून विश्वनिर्मितीकडे जाणारा प्रवास आहे. त्यापाठीमागे त्यांची प्रचंड मेहनत आहे.

अश्या प्रयत्नशील युवा कलावंत विनोदकुमार आदे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आपली पुढील वाटचाल यशाची असो..

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

यवतमाळ-जिल्हातील बातम्या

महायुती चे उमेदवार आ.बोदकुरवार यांना कुणबी समाजाचे युवा उभरता चेहरा महेश पहापळे यांचा पाठिंबा.

वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...

आतापर्यंत सगळ्याला आजमावले एकदा मनसेला संधी द्या- राजू उंबरकर

वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...

गळफास घेतलेल्या अवस्थेत अनोळखी ईसमाचा मॄतदेह आढळला.

:- वणी आज दिनांक ५ नोव्हेंबर रोजी सकाळी वणी वरोरा मार्गावरील रेल्वे गेटच्या बाजूला अनोळखी इसमाने गळफास घेतलेल्या...