*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे*
*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...
Reg No. MH-36-0010493
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
झरीजामनी:-दि.17/07/2023 ला डोंगर गाव चुनखडी लिज क्षेत्र तालुका मारेगाव जिल्हा यवतमाळ. लिज क्षेत्र साठी पर्यावरण जनसुनावणी जिल्हाधिकारी यवतमाळ अध्यक्ष ते खाली 90% स्थानिक लोकांच्या विरोधात पार पडले होते.हया संदर्भात डोंगर गाव चे प्रकल्प ग्रस्त शेतकरी ने आज दि.25/07/2023 ला प्रदुषण नियंत्रण मंडळ चंद्रपूर येथे क्षेत्रीय अधिकारी , प्रदुषण नियंत्रण मंडळ चे भेट घेऊन फेर घेण्याबाबत निवेदन दिले आहे, डोंगर गाव लिज पर्यावरण जनसुनावणी चे वेळ सकाळी 11 वाजता होते व जिल्हाधिकारी 12.30 नंतर जनसुनावणी मध्ये आल्याने प्रकल्प ग्रस्त शेतकरी संतप्त होऊन जनसुनावणी मंडप मधून जिल्हाधिकारी चे उशिरा येण्याचं कारणाने, व जमिन अधिग्रहण चे सुनावणी अगोदर हे पर्यावरण जनसुनावणी ठेवल्या कारणाने,सर्व प्रकल्पग्रस्त शेतकरी बांधवांनी ह्या जनसुनावणी वर बहिष्कार करून मंडपातून जिल्हाधिकारी समोर बाहेर पडले. उद्योग मंत्रालय चे नियमानुसार भूसंपादन प्रक्रिया सुनावणी व जमीन ताबा कंपनी ने घेतल्यानंतर पर्यावरण सुनावणी आवश्यक असते. परंतु जिल्हाधिकारी यवतमाळ ने ह्या नियमां विरूद्ध व 90% स्थानिक लोकांच्या विरूद्ध जनसुनावणी घेऊन प्रकल्प ग्रस्त शेतकरी वर अन्याय केला जातो आहे. ह्या जनसुनावणी मध्ये 90% स्थानिक प्रकल्प ग्रस्त शेतकरी बाहेर पडले त्या नंतर जिल्हाधिकारी व कंपनीने, कंपनी समर्थन करणारे लोक बसवून जनसुनावणी घेतले आहे.हे बेकायदेशीर पद्धतीने घेतलं आहे, जिल्हाधिकारी ने उद्योग मंत्रालय चे नियमानुसार भूसंपादन सुनावणी अगोदर हे पर्यावरण जनसुनावणी का घेतला? ह्या अधिकारी ना कायद्याचे ज्ञान नाही का? कायद्याचे उल्लंघन केले नाही का? असं प्रश्न उपस्थित होतो आहे. जेव्हा 90% लोक जिल्हाधिकारी समोर सुनावणी मंजुरी नाही असे म्हणत मंडपातून बाहेर पडले तेव्हा जिल्हाधिकारी ने ही सुनावणी रद्द न करता कंपनी समर्थन करणारे लोक कडून का घेण्यात आला आहे.हे अधिकारी जनतेसाठी का कंपनी साठी हा प्रश्न उपस्थित होतो आहे. आजची जनसुनावणी ही स्थानिक लोकांच्या विरोधात जिल्हाधिकारी ने घेऊन प्रकल्प ग्रस्त शेतकरी बांधवांवर अन्याय केला आहे, जिल्हाधिकारी ने सर्व स्थानिक लोकांच्या विरोधात ही सुनावणी घेऊन कंपनी ला अप्रत्यक्षपणे सहकार्य केले आहे का असा प्रश्न प्रकल्प ग्रस्त शेतकरी बांधवांना उपस्थित होतो आहे. ह्या स्थानिक शेतकरी चा ह्या प्रकल्पाला विरोध आहे.लिज क्षेत्र गावातील स्थानिक लोकांनी ह्या सुनावणी मधून बाहेर पडून जगन्नाथ महाराजांचं मठात सभा घेऊन प्रकल्पाला विरोध दर्शविला आहे व पुढे ह्या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी कायद्याने प्रकिया करू व हा प्रकल्प गावात होऊ देणार नाही, जुने सुनावणीमध्ये स्थानिक शेतकरीचा सहभाग नसल्याने रद्द करून,ह्या साठी फेरसुनावणी घेण्यात यावे ,ह्या विषयावर क्षेत्रीय अधिकारी, प्रदुषण नियंत्रण मंडळ चंद्रपूर ला प्रकल्प ग्रस्त शेतकरी, अशोक गौरकार, डॉ अफजल खलिल, रविंद्र गौरकार, रविंद्र पवार व अरूण मैदमवार सामाजिक कार्यकर्ता इत्यादी ने निवेदन दिले आहे .
*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...
*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...
*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...
झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...
वणीः- राष्ट्रीय पातळीवर छत्तीसगढ राज्यातील दुर्ग येथे दिनांक २४ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२४ या दरम्यान राष्ट्रीय पातळीवर...
झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...