Home / यवतमाळ-जिल्हा / मारेगाव / वनोजा (देवी) व डोलडोंगरगाव...

यवतमाळ-जिल्हा    |    मारेगाव

वनोजा (देवी) व डोलडोंगरगाव येथे अवैध दारू विक्री जोमात...मात्र पोलिस प्रशासन कोमात.... वनोजा (देवी ) व डोलडोंगरगाव येथील अवैध दारू विक्री बंद करा - गावकऱ्यांचे ठाणेदारांना निवेदन आता नव्याने रुजू झालेले ठाणेदार काय कारवाई करते याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

वनोजा (देवी) व डोलडोंगरगाव येथे अवैध दारू विक्री जोमात...मात्र पोलिस प्रशासन कोमात....        वनोजा (देवी ) व डोलडोंगरगाव येथील अवैध दारू विक्री बंद करा - गावकऱ्यांचे ठाणेदारांना निवेदन    आता नव्याने रुजू झालेले ठाणेदार काय कारवाई करते याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

वनोजा (देवी) व डोलडोंगरगाव येथे अवैध दारू विक्री जोमात...मात्र पोलिस प्रशासन कोमात....

 

 

 

वनोजा (देवी ) व डोलडोंगरगाव येथील अवैध दारू विक्री बंद करा - गावकऱ्यांचे ठाणेदारांना निवेदन

 

आता नव्याने रुजू झालेले ठाणेदार काय कारवाई करते याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

 

रिपोर्टर : राजेश येसेकर मो. ७७५६९६३५१२

 

 

वनोजा (देवी) : मारेगाव तालुक्यापासून १५ किमी अंतरावर असलेल्या वनोजा (देवी) व डोलडोंगरगाव मध्ये अवैध दारू विक्री जोमात.... मात्र पोलीस प्रशासन कोमात....

अवैध दारू विक्रीचे धंदे सुरू आहेत. त्यामुळे गावात शांतता व सुव्यवस्था भंग होऊन अल्पवयीन मुले दारूच्या आहारी जाऊन गावातील तंटा भांडने वाढली आहेत. काही ठिकाणी पोरग आणि बाप मिळुनच दारु पितात यामुळे बाप आवरेना पोराले...अन पोरग आवरेना बापाले ... अशी अवस्था  या गावातील झाली आहे. या पुर्वी हि गावातील अवैध दारू विक्री बंद व्हावी म्हणून  काही महिला मंडळांनी मारेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.पण त्यांचा काही उपयोग झाला नाही. ग्राम पंचायतच्या माध्यमातून दारू विक्री करणाऱ्यांना नोटीस देऊनही काही मुजोर विक्रेते मानायला तयार नाहीत. उलट त्यांच्याकडून दारू बंद करणाऱ्यांना मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. त्यामुळे गावकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत सर्व महिला व पुरुष मंडळीच्या सह्या घेऊन अवैध दारू विक्री बंद कराचे निवेदन डोलडोंगरगावचे सरपंच शितल येरमे व वनोजादेवीचे उपसरपंच प्रशांतकुमार भंडारी यांच्या नेतृत्वात २१ जुलै रोजी नव्याने रुजू झालेले ठाणेदार जनार्दन खंडेराव यांना निवेदन देऊन सुरू असलेली अवैध दारू विक्री वनोजा (देवी), डोलडोंगरगाव येथे अवैध दारू धार्मिक स्थळांच्या परिसरातील खुलेआम सुरू असलेली अवैध दारू विक्री बंद करावी अन्यथा गावकऱ्यांना प्रशासनाच्या विरोधात लोकशाहीच्या मार्गाने तीव्र आंदोलन छेडल्या शिवाय पर्याय नाही. असा गर्भित इशारा सरपंच शितल येरमे, उपसरपंच प्रशांतकुमार भंडारी व गावकऱ्यांनी दिला आहे.

वनोजा (देवी ) व डोलडोंगरगाव येथील अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी नव्याने रुजू झालेले ठाणेदार काय कारवाई करते याकडे गावकऱ्यांचे व परिसरात नागरिकांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

मारेगावतील बातम्या

बोरी (बु ) येथील 32 वर्षीय विवाहित युवकाने विहिरीत उडी टाकून केली आत्महत्या

मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे आयोजन*

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...