वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
यवतमाळ: जिल्ह्यात दिनांक 20 जुलै 2023 पासुन सतत धार पाऊस सुरू असून दिनांक 21.07.2023 सकाळी 10.00 पर्यन्त तालुका यवतमाळ 3.8 मी.मी., बाभुळगाव 0.8 मी.मी., कळंब 4.2 मी.मी., दारव्हा 8.8 मी.मी. दिग्रस- 11.8 मी.मी.,आर्णी- 57.4 मी.मी., नेर- 3.9 मी.मी. पुसद- 9.6 मी.मी., उमरखेड- 69.1 मी.मी., महागाव- 49.3 मी.मी., वणी- 20.0 मी.मी., मारेगाव- 14.5 मी.मी., झरीजामणी- 10.9 मी.मी., केळापुर- 15.2 मी.मी., घाटंजी 15.5 मी.मी., राळेगाव- 6.8मी.मी. असे एकुण सरासरी 19.8 पावसाची नोंद झालेली आहे. तसेच आर्णी तालुक्यांतील लोणेबेळ 124.25 मी.मी.,अंजनखेडा-124.25 मी.मी., उमरखेड तालुक्यातील उमरखेड 106.75 मी.मी., विडुळ 85.25 मी.मी. चातारी- 156.25मी.मी., निगनुर- 66.75 मी.मी., कुपती 86.25 मी.मी., महागाव तालुक्यातील फुलसावंगी 66.75 मी.मी., मंडळमध्ये अतिवृष्टी झालेली आहे. तालुका उमरेखड येथील चातारी या गावांमध्ये 40 45 घरांमध्ये पावसाचे पाणी घुसले होते परंतू सद्यस्थितीत पावसाचे पाणी ओसरण्यास सुरुवात झालेली आहे. पूर परिस्थिती निर्माण झाल्यास शालेय विद्यार्थी यांना घरीजाण्यास अडथळा निर्माण होवू नये, कोणताही अनुचीत प्रकार होवू नये याकरीता तालुका उमरखेड, महागाव येथील प्राथमिक,
माध्यमिक, महाविद्यालय (नियोजीत परीक्षा वगळता) शाळा बंद करण्याचे आदेश पारित करण्यात आलेले आहेत तसेच स्थानीक
पूर परिस्थितीचा विचार करून इतर ठिकाणी शाळा बंद करणे आवश्यक वाटत असल्यास संबंधित तहसीलदार यांनी स्थानीक परिस्थीतिचा विचार करून निर्णय घ्यावा असे निर्देश देण्यात आलेले आहेत. तसेच दिनांक 21.07.2023 रोजी जिल्ह्यातील
सर्वच तालुक्यात मुसळधार पाऊस झाला असून बहुतांश रस्ते वाहतुकीस बंद आहेत. करीता शालेय विद्यार्थी यांना शाळेत जाणे - येण्यास अडथळा निर्माण होऊ नये तसेच कोणताहि अनुचित प्रकार होवू नये याकरीता जिह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालय शाळा उद्या दिनांक 22.07.2023 रोजी बंद ठेवण्याचे आदेश पारित करण्यात आलेले आहे. सर्व विभाग प्रमुख व त्यांचे अधिनस्त कर्मचारी यांना मुख्यालय न सोडण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत.
जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाल्यास तात्काळ बचाव कार्य करण्याकरिता तालुका वणी -१, उमरखेड - १ व जिल्हा मुख्यालय - २ पथके साहित्य निशी सज्ज आहेत. तालुका मधील गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाल्यास नागरीकांना जवळच्या समाज मंदिर, ग्रामपंचायत या ठिकाणी त्यांची राहण्याची, जेवणाची व्यवस्था करावी याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत. आत्तापर्यंत च्या माहिती नुसार कळंब मधील सोणखास नाला, राळेगाव रावेरी व किन्ही येथील पुल, आष्टा कळंब, रावेरी पिंपळखुटी रोड व उमरखेड मधील बोरी हिमायत नगर, पुल, झरी मधील मांडावा- बोरी पुल सद्यस्थितीत बंद आहेत.जिल्ह्यातील महसुल, पोलीस, कृषि, मंडळ अधिकारी, तलाठी, गावस्तरीय यंत्रणा सज्ज आहेत. तसेच जिल्ह्यातील बहुतांशपुलावरुन पाणी वाहत असून वाहत्या पुलावरचे पाण्यामधुन गाडी टाकण्याचे धाडस नागरिकांनी करु नये.वाहत्या पुलावरुन गाडी टाकण्याचे धाडस करतानाचे निदर्शनास आल्यास संबंधित व्यक्ती यांचे वर गुन्हा नोंदविण्याचे निर्देश पोलीस विभाग यांना देण्यात आले आहे.
जिल्ह्यातील प्रकल्प हे 50 टक्के चे वर भरले असून काही प्रकल्प मधुन विसर्ग सूरू आहे. करीता नागरिकांनी असा ठिकाणी निसर्ग पर्यटन बघण्याकरिता जाणे टाळावे तसेच संबंधित कार्यकारी अभियंता, यांनी प्रकल्प क्षेत्रात सामान्य व्यक्ती यांना प्रवेश देवू नये.बां धकाम काम सूरू असलेल्या अर्धवट इमारती मध्ये नागरिकांनी आश्रय घेणे टाळावे. काम सुरू असलेल्या इमारती मध्ये नागरीक, मजूर आश्रय घेत असल्याचे निदर्शनास आल्यास तालुका तहसीलदार यांनी त्यांना इतर ठिकाणी स्थलांतरित होण्याच्या सूचना द्यावेत. दिनांक 21 जुलै 2023 रोजी मौसम विभाग यांनी जिल्ह्यास ऑरेंज अलर्ट दिला असून नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेवून प्रशासनाकडून वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन करावे व प्रशासनास सहकार्य करावे.
मदतीकरिता संपर्क क्रमांक 07232-240720/240844/255077
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...
वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...