आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
वणी:- १९ जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वणी शहरात पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गुप्त माहितीदारा कडून माहिती प्राप्त झाली की, एक महिंद्रा कंपनीची मालवाहू गाडी क्रमांक एम.एच.२९ बि.ई.४७५५ मध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला सुगंधी तंबाखू भरून वणी शहरात आदर्श शाळेच्या जवळ थांबून आहे.अशा माहिती वरून स्थानिक गुन्हे शाखा वणी, पांढरकवडा विभाग पथकाने सापळा रचून सदर वाहनाच्या चालकास ताब्यात घेऊन चालकास नाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव शंकर बाबाराव खोडे,५४ वर्ष रा. कात्री,ता.कळंब जिल्हा.यवतमाळ, असे सांगितल्याने चर्या गाडीची तपासणी केली असता त्यात तिन पांढऱ्या रंगाच्या पोत्यात २००ग्राम शमतेचे १२० नग डब्बे किंमत १,१२,२०० रुपये, शासनाने प्रतिबंधीत केलेला सुगंधी तंबाखू चालका जवळील एक मोबाईल फोन, मुद्देमाल वाहून आणण्यासाठी वापरात आणलेले वाहन असा एकूण ४,१२,७००/ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर तंबाखू हा यवतमाळ येथील शैलेश गाडेकर यांच्या मालकीचा असल्याचे आरोपी वाहन चालक यांनी सांगितले असता अन्न सुरक्षा अधिकारी घनश्याम दंदे यवतमाळ यांच्या तक्रारीवरून २० जुलै रोजी शंकर बाबाराव खोडे,रा.कात्री, यांच्या विरूद्ध वणी पोलिस स्टेशन येथे भादवि तसेच अन्न सुरक्षा मानके कायदा २००६ नियम व नियमने २०११ चे विविध कलमा नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कारवाई आधारसिंग सोनोने,पो.नि.स्थागुशा यांचे मार्गदर्शनाखाली घनश्याम दंदे अन्न सुरक्षा अधिकारी,सपोनि अमोल मुडे, सुनील खंडागळे, योगेश डगवार, सुधीर पांडे, भोजराज करपते, निलेश निमकर, सुधीर पिदुरकर, रजनीकांत मडावी, चालक सतीश फुके,स्थागुशा पथकांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
पुढील तपास वणी पोलिस करीत आहे.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...
वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...
:- वणी आज दिनांक ५ नोव्हेंबर रोजी सकाळी वणी वरोरा मार्गावरील रेल्वे गेटच्या बाजूला अनोळखी इसमाने गळफास घेतलेल्या...