Home / यवतमाळ-जिल्हा / चिखलगाव रेल्वेगेट ते...

यवतमाळ-जिल्हा

चिखलगाव रेल्वेगेट ते वरोरा रेल्वेगेटपर्यंत सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या बांधकामात अनियमितता.

चिखलगाव रेल्वेगेट ते वरोरा रेल्वेगेटपर्यंत सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या बांधकामात अनियमितता.
ads images
ads images
ads images

२१ कोटी रुपयांच्या काँक्रीटीकरणाच्या बांधकामची गुणवत्ता व घनता तपासुन जबाबदार ठेकेदार व अधिकारी यांच्या वर कारवाई करावी अशी मागणी भाजपा जिल्हा सरचिटणीस रवि बेलुरकर यांनी केली आहे

वणी : शहरातील चिखलगाव रेल्वे गेट ते टिळक चौक , वरोरा रेल्वेगेटपर्यंत सिमेंट काँक्रीटी रस्त्याचे बांधकाम करण्यात येत आहे.२० कोटी ८१ लाख ६५ हजार ६४३ रुपये खर्चाच्या या कामात अनियमितता असुन नियम धाब्यावर बसवून हे काम करण्यात येत असल्याची तक्रार भाजपचे यवतमाळ जिल्हा सरचिटणीस रवि बेलुरकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग पांढरकवडा येथे तसेच गुणनियंत्रक विभागा अमरावती येथे केली आहे.

Advertisement

 या रस्त्याच्या बांधकामात आतापर्यंत झालेल्या या सिमेंट रस्त्याच्या कामाची गुणवत्ता निकुष्ट दर्जाची असुन, या रस्त्याला आतापासूनच भेगा पडल्या असुन, नालीचे काँक्रीट बांधकाम कुठे कमी तर कुठे जास्त लेव्हल न पाळता आधे अधुरे काम करुन सोडुन दिले आहे.या कामा मुळे नागरिक त्रस्त झाले आहे. या रस्त्यावरून शाळेकरी मुले ये-जा करतात या रस्त्यावर कॉलेज, शाळा, शिकवणी वर्ग असल्याने या रस्त्यावर मुला ,मुलींची  वर्दळ सुरू असते, या रस्ताचे गेल्या एक महिन्यापासून  काम बंद आहे. त्यामुळे जर अपघात झाल्यास कोण जबाबदार राहील, या रस्त्याचे बांधकाम पांढरकवडा बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याच्या देखरेखी खाली सुरू आहे. असे असले तरी संबधीत ठेकेदाराकडून निविदेत असलेल्या अटि व शर्थिची दिशाभूल केली जात आहे. कंत्राटदाराने निविदेत दाखविलेल्या आर. एम. सी. प्लांटची जागा व प्रत्यक्ष आर. एम. सी. पुरवठयाची जागा निश्चित नाही. प्लांट एम. ६० कागदावरच असुन स्काडा रिपोर्टहि संशयास्पद असल्याचा आरोप रवि बेलुरकर यांनी तक्रारीतुन केला आहे.

या कामात साडेसात मीटर रुंदीची अत्याधुनिक फेवर व्हायब्रेटर मशीन कामावर नसून आजपर्यंत या कामावर ही मशीन वापरण्यात आली नाही, असे निवेदनात म्हटले आहे. चिलिंग प्लांटही कोठेच निदर्शनास आले नाही. या कामावर वाळू स्किनिंग व वाँशिंग युनिट व रस्त्याला तांत्रिकरीत्या स्कँपिंग करण्यात आलेले नाही. या कामाची माहिती देणारा फलक लावण्यात आलेला नाही.या कामाची गुणवत्ता तपासून ठेकेदारावर व जबाबदार अधिकारी यांच्यावर कडक कार्यवाही करावी अशि मागणी जिल्हा सरचिटणीस रवि बेलुरकर यानी तक्रारीच्या निवेदनातुन केली आहे.

ताज्या बातम्या

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन. 23 November, 2024

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.

...

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव. 23 November, 2024

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.

वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

यवतमाळ-जिल्हातील बातम्या

महायुती चे उमेदवार आ.बोदकुरवार यांना कुणबी समाजाचे युवा उभरता चेहरा महेश पहापळे यांचा पाठिंबा.

वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...

आतापर्यंत सगळ्याला आजमावले एकदा मनसेला संधी द्या- राजू उंबरकर

वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...