Home / यवतमाळ-जिल्हा / झरी-जामणी / *शेतकरयांनो जागृत व्हा!...

यवतमाळ-जिल्हा    |    झरी-जामणी

*शेतकरयांनो जागृत व्हा! Rccpl सिमेंट कंपनी चे डोंगरगाव चुनखडी लिज क्षेत्र पर्यावरण जनसुनावणी*

*शेतकरयांनो जागृत व्हा! Rccpl सिमेंट कंपनी चे डोंगरगाव चुनखडी लिज क्षेत्र पर्यावरण जनसुनावणी*
ads images

*शेतकरयांनो जागृत व्हा! Rccpl सिमेंट कंपनी चे डोंगरगाव चुनखडी लिज क्षेत्र पर्यावरण जनसुनावणी*

 

✍️दिनेश झाडे

 (भारतीय वार्ता)

 

झरीजामनी:-डोंगरगाव चुनखडी लिज क्षेत्र,गावे, डोंगरगाव, वेगाव, तालुका मारेगाव, दहेगाव तालुका वणी, जिल्हा यवतमाळ. हे लिज क्षेत्र Rccpl सिमेंट कंपनी मुकूट बनने शासनाकडून घेतला आहे.हया लिज क्षेत्राची पर्यावरण जनसुनावणी दि.17/07/2023 ला स्थानिक ठिकाणी घेण्यात येत आहे. ह्या अगोदर कंपनी साठी अल्प दरात जमीन खरेदी करणारे काही दलाल ह्या लिज क्षेत्रात सक्रिय झाले असल्याचे दिसून येत आहे. पर्यावरण जनसुनावणी, शासनाकडून लिज क्षेत्र मंजुरी साठी अत्यावश्यक असते. हया जनसुनावणी मध्ये पर्यावरण व शेतकरी शेती विषयक महत्वाचे असताना, कंपनीने व पर्यावरण विभाग ने ,ही जनसुनावणी जाणुन बुजुन पाऊस काळात शेतकरी पेरणी वेळात घेण्यात येत आहे, ह्या वेळात शेतकरी शेती कामात व्यस्त असल्याने ते आपली बाजू मांडू शकणार नाही, त्या मुळे कंपनी आपले व दलाल समर्थक लोक बसवून त्यांच्या हाजरी पत्रावर सही घेऊन, ही सुनावणी शांतता मध्ये मंजुरी करून घेते, स्थानिक लोकांचे ह्या प्रकल्पाला विरोध होणार नाही. तरी शेतकरी बांधवांना विनंती आहे कि, प्रत्येक प्रकल्प ग्रस्त शेतकरी बांधवांनी ह्या सुनावणी मध्ये हजर राहून आपले प्रश्न उपस्थित करावे, जनसुनावणी मध्ये, प्रशासन अधिकारी चे म्हणण्यानुसार,जरी ही सुनावणी पर्यावरण विषयक असलं तरी, शेतकरी ने प्रकल्पाला शेती च न दिल्यास प्रकल्प होणार नाही, म्हणून शेतकरी शेती विषयक मुद्दे हे ह्या सुनावणी मध्ये अति आवश्यक असतात. सर्व शेतकरी ने 1). जमीन चे योग्य मोबदला व कंपनी मार्फत रोजगार हे विषय तेथे च मंजुरी करून घ्यावी,2). कोणत्याही मध्यस्थी दलाल मार्फत जमीन खरेदी मान्य करू नका, कंपनी द्वारा जमीन खरेदी चे मागणी करा.3) लिज क्षेत्रातील संपूर्ण जमिनी चे एकमुस्त खरेदी झाल्यावर कंपनी ला काम करण्यासाठी ग्रामपंचायत अनुमती द्यावी तोपर्यंत कोणत्याही प्रकारची अनुमती देण्यात येऊ नये,कारण ह्याच कंपनीने परसोडा लाईमसटोन लिज क्षेत्र तालुका कोरपना जिल्हा चंद्रपूर मध्ये ग्रामपंचायत सचिव व सरपंचाची हातमिळवणी करून स्थानिक लोकांच्या बनावट खोटे सह्या करून पेसा अनुसूचित क्षेत्र ग्रामपंचायत अनुमती दिली होती, जनसुनावणी स्थानिक ठिकाणी न घेता दलाल मार्फत आणलेल्या व्यक्ती ना बसवून शेतकरी चे खोटे सह्या करून पर्यावरण मंजुरी घेतली आहे व आता दलाल मार्फत कवडीमोल भावाने खरेदी जमीन वर जबरदस्ती उत्खनन सुरू केली ते ग्रामपंचायत ने बंद केले आहे, ह्या विषयावर, मागिल दोन वर्षांपासून आमचं आंदोलन सुरू आहे,शासन व प्रशासन अधिकारी शी हातमिळवणी करून, कंपनी पेसा अनुसूचित क्षेत्र आदिवासी शेतकरी ना लुबाडणूक करत आहे, ह्या लिज क्षेत्रातील शेतकरीना भेट देऊन विचारा, कंपनी ने परसोडा लाईमसटोन लिज क्षेत्रात कंपनी ने केलेल्या घोटाळा उघडकीस येईल.3). जनसुनावणी मध्ये कंपनी चे वरिष्ठ अधिकारी (vice president,manegar), सर्व प्रकल्पग्रस्त व ह्या मध्ये मध्यस्थी करण्यासाठी जिल्हाधिकारी यवतमाळ स्वतः हजर असतात . म्हणून डोंगरगाव  चुनखडी लिज क्षेत्र मधील प्रकल्प ग्रस्त शेतकरी बांधवांनी पर्यावरण सुनावणी मध्ये जमीन चे खरेदी कंपनी नावाने नोंद, जमीन खरेदी चे भाव व नौकरी तेथे च मंजुरी करून घ्यावी, कंपनी सर्व प्रकल्पग्रस्त शेतकरी बांधवांचे मागण्या, जिल्हाधिकारी समक्ष मंजुरी झाल्यानंतर च पर्यावरण हाजरी पत्रावर स्वाक्षरी करावी, त्या आधी करू नये, अन्यथा सुनावणी मध्ये हजर चे स्वाक्षरी हे कंपनी शासनाला शेतकरी मंजुरी असे दाखवून लिज क्षेत्र मंजुरी करून घेते, तरी माझ्या शेतकरी बांधवांना विनंती आहे की,वरिल विषयावर विचार करून जनसुनावणी मध्ये जास्तीत जास्त संख्येने हजर रहावे, कंपनी  जमीनचे एकमुस्त भूसंपादन खरेदी व कंपनी मार्फत रोजगार, ठेकेदार रोजगार खपवून घेणार नाही, कंपनी दलाल व इतर दलालांना गाव जमीन खरेदी बंदी , ह्या विषयावर कंपनी मंजुरी झाल्यानंतर सह्या कराव्या अन्यथा करू नये, नाही तर प्रकल्प ग्रस्त शेतकरी चे जन्माच भाकर कंपनी व कंपनी दलाल कवडीमोल भावाने, परिवार मध्ये आंतर झगडे/( बहीण, आत्या, मावशी संपती वाटा) असे झगडे तयार करून कवडीमोल भावाने जमीन खरेदी करेल, तरी ह्या साठी आधी च शेतकरी बांधवांनो जाग व्हा. असं अरुण मैदमवार परसोडा ग्रामपंचायत कृती समिती सदस्य एवं प्रकल्प ग्रस्त शेतकरी व सामाजिक कार्यकर्ता ह्यांनी आपले मनोगत व्यक्त करत प्रकल्प ग्रस्त शेतकरी बांधवांना जागृत करण्यासाठी ह्या माध्यमातून आपल्या समक्ष मत व्यक्त केला आहे.

ताज्या बातम्या

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* 04 January, 2025

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे*

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* 04 January, 2025

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी*

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे 03 January, 2025

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. 03 January, 2025

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

...

मुकूटबन येथे शौचालय व प्रवासी निवारा उपलब्ध करून द्या- सुरेंद्र गेडाम यांची मागणी 02 January, 2025

मुकूटबन येथे शौचालय व प्रवासी निवारा उपलब्ध करून द्या- सुरेंद्र गेडाम यांची मागणी

झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...

राष्ट्रीय पातळीवरील नृत्य स्पर्धेत वणीतील स्पर्धकांनी विविध नृत्य स्पर्धांमध्ये मारली बाजी. 02 January, 2025

राष्ट्रीय पातळीवरील नृत्य स्पर्धेत वणीतील स्पर्धकांनी विविध नृत्य स्पर्धांमध्ये मारली बाजी.

वणीः- राष्ट्रीय पातळीवर छत्तीसगढ राज्यातील दुर्ग येथे दिनांक २४ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२४ या दरम्यान राष्ट्रीय पातळीवर...

झरी-जामणीतील बातम्या

मुकूटबन येथे शौचालय व प्रवासी निवारा उपलब्ध करून द्या- सुरेंद्र गेडाम यांची मागणी

झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

रान डुकरांचा हैदोस, मुकुटबन येथील शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान

झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...