Home / यवतमाळ-जिल्हा / झरी-जामणी / *Rccpl सिमेंट कंपनी मुळे...

यवतमाळ-जिल्हा    |    झरी-जामणी

*Rccpl सिमेंट कंपनी मुळे अपघात ग्रस्त कामगाराला अंपगत्व, कंपनी कडून अद्याप नुकसान भरपाई नाही*

*Rccpl सिमेंट कंपनी मुळे अपघात ग्रस्त कामगाराला अंपगत्व, कंपनी कडून अद्याप नुकसान भरपाई नाही*
ads images

*Rccpl सिमेंट कंपनी मुळे अपघात ग्रस्त कामगाराला अंपगत्व, कंपनी कडून अद्याप नुकसान भरपाई नाही*

 

✍️दिनेश झाडे

 भारतीय वार्ता

 

 

झरीजामनी:-Rccpl सिमेंट कंपनी मुकूटबन (mp birla group), तालुका झरी, जिल्हा यवतमाळ, ह्या कंपनीमध्ये सागर इंगोले, D&J Engineering ठेकेदार कडे वर्ष 2019 पासून वेल्डर पदावर कार्यरत  आहेत,व कंपनी मध्ये झालेल्या अपघातामुळे बेरोजगार होऊन घरी बसलेले कामगार सागर इंगोले व त्यांच्या परिवारावर आता उपासमारीची वेळ आली आहे. दि.28/01/2022 ला, कंपनी चे वेल्डिंग वर्किंग काम चालू असताना कंपनी इंजिनिअर ने सागरला अतितातडीचे वेल्डिंग काम सांगून, Raw mill च्या तिसऱ्या मजल्यावर वेल्डिंग काम करण्यासाठी आदेश दिले,ते काम करित असताना सागरला कोणत्याही प्रकारची पुर्व सुचना न देता,raw mill चे दरवाजा उघडला गेला त्या वेळी, तेथे काम करीत असताना सागर मशीनमध्ये अडकला गेला व सागरचे छातीचे हाडांची पिजंडा ला गंभीर दुखापती व मनकयाचे हाड घसरले गेले, तेव्हा कंपनीने ह्या विषयावर पोलिस कारवाई न करता  सागरला दवाखान्यात नेले, तेथे सागरचे सर्व प्रकारचे तपासणी केली असता,सागरला ह्या पुढे भविष्यात कोणत्या ही प्रकारची अवजड कामे करण्यासाठी प्रतिबंध करण्यात आले आहे,जर अवजड कामे केल्याने शरिराला गंभीर आजार निर्माण होणार असं स्पष्ट मत दवाखाना द्वारा सांगण्यात आले आहे, कंपनी मध्ये अपघात झाल्यानंतर कंपनीने, सागरला कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई व पेंशन दिले नाही.सागर व त्यांच्या पत्नी हे दोघे ही नैसर्गिक व मानवनिर्मित चुकीने,  अंपग ग्रस्त झालेल्या आहेत, त्यांना  परिवार पालनपोषण करण्यासाठी आर्थिक सामाजिक अडचणी ना सामोरं जावं लागतं आहे, कंपनी ने सागरला public liability insurance act 1991 अंतर्गत कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई अजून पर्यंत दिली नाही, सागरने अनेक वेळा कंपनी व्यवस्थापन व जिल्हा प्रशासन ला निवेदन दिले आहे, परंतु अद्याप कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई सागरला दिले नाही.करिता जिल्हा प्रशासन व कंपनी व्यवस्थापन ने, सागरचे कंपनी कामात नुकसान झाले असल्याने सागरला योग्य मोबदला व अवजड काम करण्यासाठी असमर्थ असल्याने मासिक पेन्शन लागू करण्यात यावे, अन्यथा कंपनी मार्फत आफिशियल हलकं स्वरूपाचं काम देण्यात यावे, सागरला हक्काचं न्याय मिळवून घेण्यासाठी,सागरला कंपनी विरूद्ध आंदोलन,आमरण उपोषण व national green trabunal कोर्टात जायला भाग पाडू नये, तसेच अपंगत्व आलेल्या सागर व त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी सामाजिक संस्था व मिडिया चया माध्यमातून, Rccpl सिमेंट कंपनी विरूद्ध प्रशासन समोर सागरला न्याय मिळवून देण्यासाठी सामाजिक प्रयत्न सर्वांनी करावे,असे अरुण मैदमवार सामाजिक कार्यकर्ता ह्यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे.

ताज्या बातम्या

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* 04 January, 2025

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे*

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* 04 January, 2025

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी*

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे 03 January, 2025

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. 03 January, 2025

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

...

मुकूटबन येथे शौचालय व प्रवासी निवारा उपलब्ध करून द्या- सुरेंद्र गेडाम यांची मागणी 02 January, 2025

मुकूटबन येथे शौचालय व प्रवासी निवारा उपलब्ध करून द्या- सुरेंद्र गेडाम यांची मागणी

झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...

राष्ट्रीय पातळीवरील नृत्य स्पर्धेत वणीतील स्पर्धकांनी विविध नृत्य स्पर्धांमध्ये मारली बाजी. 02 January, 2025

राष्ट्रीय पातळीवरील नृत्य स्पर्धेत वणीतील स्पर्धकांनी विविध नृत्य स्पर्धांमध्ये मारली बाजी.

वणीः- राष्ट्रीय पातळीवर छत्तीसगढ राज्यातील दुर्ग येथे दिनांक २४ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२४ या दरम्यान राष्ट्रीय पातळीवर...

झरी-जामणीतील बातम्या

मुकूटबन येथे शौचालय व प्रवासी निवारा उपलब्ध करून द्या- सुरेंद्र गेडाम यांची मागणी

झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

रान डुकरांचा हैदोस, मुकुटबन येथील शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान

झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...