Home / यवतमाळ-जिल्हा / भव्य मोफत आयुर्वेदिय...

यवतमाळ-जिल्हा

भव्य मोफत आयुर्वेदिय रोगनिदान व औषधोपचार शिबिर थाटात संपन्न.

भव्य मोफत आयुर्वेदिय रोगनिदान व औषधोपचार शिबिर थाटात संपन्न.

निमा शाखा यवतमाळ, माहेश्वरी मंडळ व महेश सेवा समिती यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते आयोजन

यवतमाळ: नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन शाखा यवतमाळ, माहेश्वरी मंडळ व महेश सेवा समिती यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक महेश भवन , संकट मोचन रोड, यवतमाळ येथे डॉक्टर डे निमित्त दि. ०२/०७/२०२३ रविवार रोजी सकाळी १०:०० वा. ऐतिहासिक भव्य मोफत आयुर्वेदिय रोगनिदान व औषधोपचार शिबिर आयोजित करण्यात आले होते.

शिबिराच्या उद्घाटन समारंभात अध्यक्ष स्थानी डॉ दिनेश चांडक ( अध्यक्ष निमा यवतमाळ) होते, तर शिबिराचे उद्घाटक व प्रमुख पाहुणे म्हणून डॉ राजीवजी मुंदाने (प्राचार्य, डा. मा. म. आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय, यवतमाळ), डॉ आनंद बोरा (सचिव निमा यवतमाळ),डॉ शैलेश यादव (कोषाध्यक्ष निमा यवतमाळ), श्री विजय लाहोटी (अध्यक्ष माहेश्वरी मंडळ, यवतमाळ व श्री चंद्रकांत बागडी (अध्यक्ष महेश सेवा समिती, यवतमाळ) यांची उपस्थिती लाभली. उद्घाटन कार्यक्रमामध्ये कार्यतत्पर असे निमा यवतमाळ सदस्य व मेडिकल ऑफिसर डॉ विजय अग्रवाल यांच्या सेवानिवृत्त पर शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला, लगेच प्रथम रुग्णाचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करुन शिबिराला सुरुवात झाली.

  यावेळी शिबिरामध्ये यवतमाळ येथील  निमा सदस्य व नामांकित डॉ . आलोक गुप्ता, डॉ लक्ष्मीनिवास सोनी, डॉ सचिन तायडे, डॉ अंजली गवार्ले ,डॉ पंकज पवार, डॉ अतिष गजभिये, डॉ नोवेश कोल्हे, डॉ आनंद बोरा,डॉ योगेश दुद्दलवार, डॉ रोहित आगलावे, डॉ पंकज दिडपाये, डॉ कविता बोरकर, डॉ प्राची नेवे,डॉ मनिषा पोहरे , डॉ विद्या पाचकवडे डॉ मंगला निकम, डॉ माया दिक्षित, डॉ कल्याणी जिरापुरे इ. विविध (मुळव्याध , भगंदर, नेत्ररोग, चर्मरोग, स्त्रीरोग, संधिवात , आमवात , अग्निकर्म, विद्धकर्म जलौकावचरण , पंचकर्म तज्ञ) अशा १८ डॉक्टरांनी आपली सेवा प्रदान केली.

यावेळी ४९८ रुग्णांची तपासणी करून योग्य औषधोपचार केले तसेच सर्व पंचकर्म चिकित्सा प्रात्यक्षिक, हाडांचा ठिसुळपणा तपासणी , रक्तशर्करा व हिमोग्लोबिन तपासणी  चा लाभ सर्व रुग्णांनी लाभ घेतला.शिबिरामध्ये अग्निकर्म, विद्धकर्म, जलौकावचरण, बिडालक, नेत्रतर्पण इ.आयुर्वेदीय प्रात्यक्षिक हे शिबिराचे मुख्य आकर्षण ठरले.

यवतमाळमध्ये निमा तर्फे प्रथमच एवढ्या मोठ्या स्वरुपात आयुर्वेदीय महाशिबिराचे आयोजन केले गेले तेव्हा हे शिबिर निमा यवतमाळसाठी ऐतिहासिक ठरले असुन, जनतेने प्रचंड प्रतिसाद दिला त्यामुळे आमचे " हर दीन आयुर्वेद, हर घर आयुर्वेद" हे उद्दिष्ट साध्य झाले असे उद्गार प्रमुख पाहुणे डॉ राजीवजी मुंदाने यांनी काढले तर भविष्यात आयुर्वेद सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी निरंतर असे शिबिर आयोजित करू अशी ग्वाही निमा यवतमाळ अध्यक्ष डॉ दिनेश चांडक यांनी दिली. शिबिराचे प्रकल्प अधिकारी म्हणून डॉ आदित्य अढाऊकर व श्री संदीप सोनी यांनी जबाबदारी सांभाळली. व शिबिराचे यशस्वीतेसाठी डॉ नितीन कोथळे, डॉ मंगेश हातगावकर, डॉ राजेश माईंदे, श्री महेश मुंदडा, श्री प्रमोद धुत, श्री प्रकाश मुंदडा, श्री संतोष चांडक, श्री शैलेश सिकची, श्री सतीश टावरी व महेश सेवा समिती यवतमाळ , माहेश्वरी मंडळ यवतमाळ, माहेश्वरी महिला मंडळाच्या सर्व सदस्यांनी व महेश भवन च्या सर्व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले. त्याकरिता प्रकल्प अधिकारी यांनी सर्वांचे आभार मानले.

शिबिराचे सुत्रसंचलन श्री प्रेमरत्न राठी यांनी केले तर आभारप्रदर्शन श्री संदीप सोनी यांनी केले. असे वृत्त डॉ आदित्य अढाऊकर जिल्हा संपर्कप्रमुख निमा यवतमाळ यांनी कळविले.

ताज्या बातम्या

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* 16 December, 2024

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...

परभणी येथील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची  विटंबना करणाऱ्यां समाज कंठकावर कारवाई करा, भारतीय बौध्द महासभा,समता सैनिक दल व वंचित बहुजन आघाडी यांची मागणी. 16 December, 2024

परभणी येथील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्यां समाज कंठकावर कारवाई करा, भारतीय बौध्द महासभा,समता सैनिक दल व वंचित बहुजन आघाडी यांची मागणी.

वणी:- परभणी येथे १० डिसेंबर रोजी एका समाजकंटकाने भारतीय संविधानाची प्रतिकृतीची विटंबना केली. या देशद्रोही कृत्याचा...

*क्रांतीज्योती सावित्रीआई फुले.मा .फातिमा शेख आणि राजमाता जिजाऊ यांच्या संयुक्त जयंती निमित्याने खुली सामाजिक ज्ञान स्पर्धेचे आयोजन*    *पुस्तके वाचून जयंती साजरी करूया: डाॅ.विवेक बांबोळे* 16 December, 2024

*क्रांतीज्योती सावित्रीआई फुले.मा .फातिमा शेख आणि राजमाता जिजाऊ यांच्या संयुक्त जयंती निमित्याने खुली सामाजिक ज्ञान स्पर्धेचे आयोजन* *पुस्तके वाचून जयंती साजरी करूया: डाॅ.विवेक बांबोळे*

*क्रांतीज्योती सावित्रीआई फुले.मा .फातिमा शेख आणि राजमाता जिजाऊ यांच्या संयुक्त जयंती निमित्याने खुली सामाजिक ज्ञान...

हॉटेल आपला राजवाडा, वणी. चे पार्टनर सुमित मालेकर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 15 December, 2024

हॉटेल आपला राजवाडा, वणी. चे पार्टनर सुमित मालेकर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

...

चोरडिया फार्म हाऊस येथे राधाकृष्ण मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न. 15 December, 2024

चोरडिया फार्म हाऊस येथे राधाकृष्ण मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न.

वणी:- वणी घुग्गुस हायवेवर मंदर शेत शिवारातील चोरडिया फार्म हाऊस येथे दत्त जयंतीच्या शुभमुहूर्तावर राधाकृष्ण मूर्तीचा...

पाटाळा धुळ यात्रे निमित्त, भव्य निःशुल्क आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन, अखिल सातोकर व मित्र परिवाराचा पुढाकार. 15 December, 2024

पाटाळा धुळ यात्रे निमित्त, भव्य निःशुल्क आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन, अखिल सातोकर व मित्र परिवाराचा पुढाकार.

वणी: गेल्या अनेक वर्षांपासून दत्त जयंती निमित्त वर्धा नदी चे तीरावर पाटाळा येथे धुळयात्रा भरत आहे. हजारो भाविक भक्त...

यवतमाळ-जिल्हातील बातम्या

धाडसी घरफोडी सोन्याच्या दागिन्यांसह रोख लंपास.

वणी:- शहरातील गुरूवर्य कॉलनी येथील बंद घर फोडून नगदी ४५ हजार रुपये व सोन्याचे दागिने मिळून ४ लाख ९० हजारांचा मुद्देमाल...

निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी चे अध्यक्ष व सहयोग ग्रुपचे सदस्य सुरेन्द्र गेडाम यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय झरी येथे रुग्णांना फळवाटप

झरी :निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी आणि सहयोग ग्रुप मुकुटबन कडुन ग्रामीण रुग्णालय झरी येथे फळवाटप कार्यक्रम घेण्यात आला.निसर्ग...

सुशगंगा पब्लिक स्कूल मध्ये संविधान दिवस उत्साहात साजरा.

वणी:- सुशगंगा पब्लिक स्कूल मध्ये 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिवस (संविधान दिन) मोठ्या उत्साहात साजरा केला. हा कार्यक्रम...