Home / यवतमाळ-जिल्हा / नृसिंह व्यायाम शाळा...

यवतमाळ-जिल्हा

नृसिंह व्यायाम शाळा एक उज्वल भविष्यासह सुदृढ शरीर घडविणारी संस्था- आ.बोदकुरवार

नृसिंह व्यायाम शाळा एक उज्वल भविष्यासह सुदृढ शरीर घडविणारी संस्था- आ.बोदकुरवार

चित्तथरारक प्रत्यक्षिकांनी प्रेक्षक मंत्रमुग्ध :- आमदार, SDPO, ठाणेदार, सामाजिक कार्यकर्ते व वकील साहेबांच्या उपस्थितीत घडला प्रत्यक्षिकांचा थरार....

वणी: अनेक दिवसांपासून वणीतील नृसिंह व्यायाम शाळेच्या पटांगणात चिमुकल्यांसाठी लाठीकाठी व मर्दाणी खेळाचे प्रशिक्षण सुरू आहे. दरम्यान अंगीकृत काही ना काही सुप्त गुण असावे व वेळ प्रसंगी आपल्यावर कुणी वरचढ होऊ नये या दृष्टीकोनातून मर्दानी डाव आपल्याकडे असणे गरजेचे असते, विशेष म्हणजे महिला या बाबतीत या ठिकाणी अग्रेसर असल्याचे दिसते आहे.

 

   मर्दानी खेळाचे प्रशिक्षण विशेष म्हणजे हे प्रशिक्षण एक  चिमुकली कु. तेजस्वीनी राजू गव्हाणे सह नृसिंह व्यायाम शाळेचे पदाधिकारी यांनी सहकार्य दर्शवित प्रशिक्षण देत आहे, रोज या प्रशिक्षणात 80 ते 90 विद्यार्थी स्वसंरक्षणाचे धडे गिरवत आहे. रोज संध्याकाळी 5.30 ते 7.30 या कालावधीत हे प्रशिक्षण होत असते. दिनांक 02 जुलै 2023 ला वणीतील प्रसिद्ध असलेल्या श्री. नृसिंह व्यायाम शाळेच्या पटांगणात चित्तथरारक प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वणी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, वणीचे उपविभागीय पोलीस अधिकारी किंद्रे , वणी पोलीस स्टेशन चे ठाणेदार अजित जाधव साहेब, सामाजिक कार्यकर्ते लॉयन्स चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष राजाभाऊ पाथ्रडकर,  ऍड. निलेश चौधरी, नृसिंह व्यायाम शाळेचे अध्यक्ष प्रमोदजी इंगोले, सुभाष तिवारी, अशोक घुगुल, देवरवजी गव्हाणे, पुरुषोत्तम आक्केवार आदी प्रामुख्याने उपस्थित होते. आमदार बोदकुरवार यांनी आपले अध्यक्षस्थानावरून विचार व्यक्त करताना सांगितले की, नृसिंह व्यायाम शाळा एक उज्वल भविष्यासह सुदृढ शरीर घडविणारी संस्था आहे व मुला मुलींना कौतुकाची थाप देत शुभेच्छा दिल्या.

    वणी तालुक्यातील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले राजु देवरावजी गव्हाणे यांची मुलगी तेजस्वीनीला बालपणापासूनच साहसिक खेळाची आवड आहे. वयाच्या सातव्या वर्षांपासून तिने नृसिंह आखाड्यात लाठीकाठी व इतर साहसिक खेळांचे प्रशिक्षण घेण्यास सुरूवात केली. त्यानंतर पुढील प्रशिक्षण तिने नागपूर येथील सुप्रसिद्ध लाठीकाठी वस्ताद आप्पासाहेब भोसले यांच्या ताजराज हिरा आखाडा येथे घेतले आहे. सोबतच तिने आपली चमु बनवून तिने स्वतः घेतलेले गुण दुसऱ्या मुला मुलींना ती देत असुन त्यामुळे शरीर सुदृढ व मर्दानी डाव अंगीकृत असते, यातून बऱ्याच प्रमाणात विद्यार्थी तिच्याकडून प्रशिक्षण घेत आहे.

    तेजस्विनीला लाठिकाठीसह तलवारबाजी, दांडपट्टा, बाना, भालाफेक आदी साहसिक खेळात निपून आहे. याशिवाय कराटे या खेळातही ती ब्लू बेल्ट आहे. विविध साहसिक खेळासह ती वकृत्व, इतर कला व सामाजिक कार्यतही ती अग्रेसर असते. मुलींनी सुद्धा मर्दानी खेळाचे प्रशिक्षण घेतले पाहिजे हे तेव्हाचे यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हा पोलिस अधिक्षक दिलीप पाटील भुजबळ यांनी बोलून दाखविले होते. त्यांनी स्वतः या केंद्राला भेट देत प्रशिक्षणार्थी तथा युवा प्रशिक्षक तेजस्विनीची पाठ थोपटली होती.

    यावेळी तेजस्विनी हिने नृसिंह व्यायाम शाळेचा इतिहास थोडक्यात पाहुण्यांसमोर मांडला, तिने आपल्या शाळेतून होऊन गेलेले वस्ताद यांच्याबद्दल माहिती दिली, तसेच संस्थेविषयी सांगतांना तिने सांगितले की या नृसिंह व्यायाम शाळेला दुर्लक्षित केल्या जात होते मात्र आम्ही इथे प्रशिक्षण सुरू करून जणु याला संजीवणीच मिळाल्याचे आम्हाला दिसत आहे यात नृसिंह व्यायाम शाळेच्या संपूर्ण मंडळींचा मौलिक सहभाग आम्हाला वेळोवेळी मिळत असल्याचे तिने यावेळी सांगितले, कार्यक्रमाचे संचालन राजु गव्हाणे यांनी केले तर आभार तेजस्विनी राजु गव्हाणे हिने मानले. कार्यक्रमाला मोठ्याप्रमाणात बघ्यांची गर्दी जमली होती दरम्यान चित्तथरारक प्रात्याक्षिक पाहुन सगळ्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

ताज्या बातम्या

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* 16 December, 2024

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...

परभणी येथील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची  विटंबना करणाऱ्यां समाज कंठकावर कारवाई करा, भारतीय बौध्द महासभा,समता सैनिक दल व वंचित बहुजन आघाडी यांची मागणी. 16 December, 2024

परभणी येथील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्यां समाज कंठकावर कारवाई करा, भारतीय बौध्द महासभा,समता सैनिक दल व वंचित बहुजन आघाडी यांची मागणी.

वणी:- परभणी येथे १० डिसेंबर रोजी एका समाजकंटकाने भारतीय संविधानाची प्रतिकृतीची विटंबना केली. या देशद्रोही कृत्याचा...

*क्रांतीज्योती सावित्रीआई फुले.मा .फातिमा शेख आणि राजमाता जिजाऊ यांच्या संयुक्त जयंती निमित्याने खुली सामाजिक ज्ञान स्पर्धेचे आयोजन*    *पुस्तके वाचून जयंती साजरी करूया: डाॅ.विवेक बांबोळे* 16 December, 2024

*क्रांतीज्योती सावित्रीआई फुले.मा .फातिमा शेख आणि राजमाता जिजाऊ यांच्या संयुक्त जयंती निमित्याने खुली सामाजिक ज्ञान स्पर्धेचे आयोजन* *पुस्तके वाचून जयंती साजरी करूया: डाॅ.विवेक बांबोळे*

*क्रांतीज्योती सावित्रीआई फुले.मा .फातिमा शेख आणि राजमाता जिजाऊ यांच्या संयुक्त जयंती निमित्याने खुली सामाजिक ज्ञान...

हॉटेल आपला राजवाडा, वणी. चे पार्टनर सुमित मालेकर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 15 December, 2024

हॉटेल आपला राजवाडा, वणी. चे पार्टनर सुमित मालेकर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

...

चोरडिया फार्म हाऊस येथे राधाकृष्ण मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न. 15 December, 2024

चोरडिया फार्म हाऊस येथे राधाकृष्ण मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न.

वणी:- वणी घुग्गुस हायवेवर मंदर शेत शिवारातील चोरडिया फार्म हाऊस येथे दत्त जयंतीच्या शुभमुहूर्तावर राधाकृष्ण मूर्तीचा...

पाटाळा धुळ यात्रे निमित्त, भव्य निःशुल्क आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन, अखिल सातोकर व मित्र परिवाराचा पुढाकार. 15 December, 2024

पाटाळा धुळ यात्रे निमित्त, भव्य निःशुल्क आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन, अखिल सातोकर व मित्र परिवाराचा पुढाकार.

वणी: गेल्या अनेक वर्षांपासून दत्त जयंती निमित्त वर्धा नदी चे तीरावर पाटाळा येथे धुळयात्रा भरत आहे. हजारो भाविक भक्त...

यवतमाळ-जिल्हातील बातम्या

धाडसी घरफोडी सोन्याच्या दागिन्यांसह रोख लंपास.

वणी:- शहरातील गुरूवर्य कॉलनी येथील बंद घर फोडून नगदी ४५ हजार रुपये व सोन्याचे दागिने मिळून ४ लाख ९० हजारांचा मुद्देमाल...

निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी चे अध्यक्ष व सहयोग ग्रुपचे सदस्य सुरेन्द्र गेडाम यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय झरी येथे रुग्णांना फळवाटप

झरी :निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी आणि सहयोग ग्रुप मुकुटबन कडुन ग्रामीण रुग्णालय झरी येथे फळवाटप कार्यक्रम घेण्यात आला.निसर्ग...

सुशगंगा पब्लिक स्कूल मध्ये संविधान दिवस उत्साहात साजरा.

वणी:- सुशगंगा पब्लिक स्कूल मध्ये 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिवस (संविधान दिन) मोठ्या उत्साहात साजरा केला. हा कार्यक्रम...