*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...
Reg No. MH-36-0010493
यवतमाळ: नामदेव सूर्यभान पवार (रेमंड कंपनी कर्मचारी ) यांच्या वरती फौंजदारी गुन्हे नोंदवून राशन घोटाळ्यात हडप केलेली रक्कम वसुल करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य राशन कृती समितीचे अध्यक्ष राजेश राठोड यांनी मुख्यमंत्री यांना इमेल पाठवून केली आहे. सविस्तर वृत्त असे की दिनांक 27 जुलै 2022 रोजी केलेल्या तक्रारीतील शासकीय अधिकाऱ्याने साधी पहिली ओळ वाचली नाही किंवा पुरवठा निरीक्षकास समजले नाही असे दिसून येते किंवा दुसरे हितसंबंध असल्यामुळे दिनांक 06.09.2022 रोजीचे मा. पुरवठा निरीक्षक, तहसील कार्यालय यवतमाळ यांच्या चौकशी अहवाल मध्ये "नामदेव सूर्यभान पवार रा. तिवसा ता जि यवतमाळ ह्यांच्या कुटुंबात पत्नी व 2 मुळे असे एकूण 4 सदस्य आहे व जीवनमान मजुरी वर सुरु आहे ". असं नमूद आहे. पण राशन क्र. 272007240228 वर कुटुंब प्रमुख म्हणून जेष्ठ महिला श्रीम. कौसल्या दमडू पोपळकर वय 90 वर्षे, आधार कार्ड लिंक नाही. व ही महिला मयत असून वरील कार्ड ऑनलाईन 2017 मध्ये बनविले व आता सदस्य संख्या 5 आहे.यासोबत डी 1 रजिस्टर कॉपी व विक्री रजिस्टर सोबत जोडले आहे.
तेव्हाच रास्त भाव दुकानातील परिवाराला कळले की अंत्योदय योजने कार्ड आहे म्हणून परिवारातील नामदेव सूर्यभान पवार, रेमंड कंपनी कर्मचारी (2013 ) पासून कामाला आहेत पण अधिकारी यांच्या संगमताने AAY योजनेचे लाभ घेण्यासाठी या कार्ड वर घरातील 4 सदस्याची नावे व आधार कार्ड लिंक करून घेण्यात आले.
याच बरोबर राशन कार्ड क्र. 272007240246 ला पण पुरवठा निरीक्षकाचा संगमताने श्रीम. मेश्राम वय 101, आधार कार्ड लिंक नाही व ही महिला गावातील नाही पण AAY गटातील लाभ घेण्यासाठी मित्र परिवारातील सदस्य मयत श्री विलास वसराम चव्हाण (मयत लिस्ट 19/05/2022 तक्रार अर्ज सोबत जोडले आहे ) व इतर 3 यांचे नावे डी 1 रजिस्टर ला जोडून आजही या गटातील धान्य उचल चालू आहे.
तक्रारी नंतर दिनांक 16/09/2022 रोजी डी रजिस्टर वरुन डिलीट करण्यात आले. म्हणजेच 5 युनिट /व्यक्ती 70 किलो 29 महिने 33 दर = एकूण 66,990 रुपये व 2017 पासून अंदाजे 50,000 रुपये अपहार झाले.
ज्या सरकारी अधिकारी यांना कर्तव्यासाठी शासन पगार देते तेच डोळे बंद करून गैरप्रकारत सहभागी आहे हे दिसून येते.
दिनांक 19/05/2022 व दिनांक 04/07/2022 रोजीचा तक्रारीसोबत रेमंड कपंनीतील भविष्य निर्वाह निधी खातेची तपशील जोडले आहे. तरी पुरवठा निरीक्षकांनी हे चौकशी अहवाल मध्ये कुठेही नमूद नाही. नामदेव सूर्यभान पवार (राशन कार्ड नं. 272007240228) मौजे तिवसा येथील रहिवासी असून येथे रेमंड कपंनी, midc लोहारा, यवतमाळ मध्ये कर्मचारी असून PF, ESIC शासकीय लाभ घेतात तसेच नामदेव पवार यांनी खोटे उत्पन्न, ऍफिडेव्हिट, चौकशी मध्ये खोटं बयान दिलेलं आहे. अंत्योदय गटात राशन लाभ घेत शासनाची व कंपनीची फसवणूक करून दोन्ही ठिकाणी सोसिल सेक्युरिटीचा लाभ घेत आहे.
1) दिनांक 27.05.2022 रोजीचे मा. मुख्यमंत्री साहेब, महाराष्ट्र राज्य यांना कारवाई करण्याची तक्रार नामदेव सूर्यभान पवार रेमंड कपंनी मध्ये कर्मचारी असून अंत्योदय योजनेचा गटातून राशन उचल करून शासनाची फसवणूक तसेच खोट्या उत्पन्न आधारे योजनेचे लाभ घेत आहे व अतिरिक्त एक नाव जोडून एप्रिल 2020 ते डिसेंबर 2021 पर्यंत पंतप्रधान अन्न योजनेतून लूट करत आहे
2) दिनांक 04.07.2022 रोजीचे मा तहसीलदार साहेब, यवतमाळ यांच्या कडील तक्रार अर्ज
3) माहिती अधिनियम कायदा 2015 ऑनलाईन अर्ज क्र YACLO/R/2022/60141 दिनांक 29.06.2022
4) दिनांक 06.09.2022 रोजीचे मा. पुरवठा निरीक्षक, तहसील कार्यालय यवतमाळ यांच्या चौकशी अहवाल.
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...
वणी:- परभणी येथे १० डिसेंबर रोजी एका समाजकंटकाने भारतीय संविधानाची प्रतिकृतीची विटंबना केली. या देशद्रोही कृत्याचा...
*क्रांतीज्योती सावित्रीआई फुले.मा .फातिमा शेख आणि राजमाता जिजाऊ यांच्या संयुक्त जयंती निमित्याने खुली सामाजिक ज्ञान...
वणी:- वणी घुग्गुस हायवेवर मंदर शेत शिवारातील चोरडिया फार्म हाऊस येथे दत्त जयंतीच्या शुभमुहूर्तावर राधाकृष्ण मूर्तीचा...
वणी: गेल्या अनेक वर्षांपासून दत्त जयंती निमित्त वर्धा नदी चे तीरावर पाटाळा येथे धुळयात्रा भरत आहे. हजारो भाविक भक्त...
वणी:- शहरातील गुरूवर्य कॉलनी येथील बंद घर फोडून नगदी ४५ हजार रुपये व सोन्याचे दागिने मिळून ४ लाख ९० हजारांचा मुद्देमाल...
झरी :निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी आणि सहयोग ग्रुप मुकुटबन कडुन ग्रामीण रुग्णालय झरी येथे फळवाटप कार्यक्रम घेण्यात आला.निसर्ग...
वणी:- सुशगंगा पब्लिक स्कूल मध्ये 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिवस (संविधान दिन) मोठ्या उत्साहात साजरा केला. हा कार्यक्रम...