Home / यवतमाळ-जिल्हा / निमा संघटना यवतमाळ...

यवतमाळ-जिल्हा

निमा संघटना यवतमाळ व दीनदयाल सेवा प्रतिष्ठान यवतमाळ च्या विद्यमाने जागतिक योग दिन उत्साहात साजरा

निमा संघटना यवतमाळ व दीनदयाल सेवा  प्रतिष्ठान यवतमाळ च्या विद्यमाने जागतिक योग दिन उत्साहात साजरा

यवतमाळ: नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन शाखा यवतमाळ व दीनदयाल सेवा प्रतिष्ठान ,यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २१/०६/२०२३, बुधवार रोजी, स. ०६:३० वा. , दीनदयाल प्रबोधिनी लाॅन, निळोणा, यवतमाळ येथे भव्य योग प्रात्यक्षिक व योगनृत्य कार्यक्रमाचे आयोजन करुन ९ वा जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी, निळोणा येथील निसर्गरम्य परिसरात श्री राजेश नागोरवाला( मुख्य योगनृत्यप्रशिक्षक, योग नृत्य परिवार, यवतमाळ) व सौ प्रियंका नागोरवाला व चमु यांनी ३० मिनिटे योग नृत्य प्रात्यक्षिक करून घेतले. यानंतर डॉ कविता बोरकर, निमा महिला प्रतिनिधी तथा पतंजली योग प्रशिक्षक, यवतमाळ) , डॉ गणेश सव्वालाखे (विदर्भ प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र योग शिक्षक संघ) व श्री नरेंद्र ढोकणे सर यांनी विविध योगासने, प्राणायाम, शवासन इ. प्रात्यक्षिक शिकवले. यावेळी ५० ते ६० निमा यवतमाळ सदस्य व दीनदयाल सेवा प्रतिष्ठान सदस्य यांनी कार्यक्रमाचा लाभ घेऊन अतिशय उत्साहात कार्यक्रम संपन्न झाला.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री मनोज केदारे साहेब (ठाणेदार, अवधूत वाडी पोलिस स्टेशन, यवतमाळ) यांची उपस्थिती लाभली, तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ दिनेश चांडक (अध्यक्ष, निमा यवतमाळ) होते, तसेच श्री नरहरजी देव (अध्यक्ष, दीनदयाल प्रबोधिनी, यवतमाळ), डॉ आनंद बोरा ( सचिव निमा यवतमाळ), डॉ शैलेष यादव (कोषाध्यक्ष, निमा यवतमाळ), श्री प्रेम राठी(सामाजिक कार्यकर्ते, यवतमाळ), डॉ प्रविण राखुंडे (माजी अध्यक्ष,निमा यवतमाळ), डॉ आलोक गुप्ता,(अध्यक्ष, निमा प्रोक्टॉलॉजी सोसायटी, यवतमाळ), डॉ अतिष गजभिये (सहसचिव, निमा महाराष्ट्र राज्य शाखा), डॉ संजय अंबाडेकर (राज्य उपाध्यक्ष, निमा महाराष्ट्र राज्य शाखा) यांची उपस्थिती लाभली.असे वृत्त डॉ आदित्य अढाऊकर जिल्हा संपर्कप्रमुख निमा यवतमाळ यांनी कळविले.

ताज्या बातम्या

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* 16 December, 2024

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...

परभणी येथील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची  विटंबना करणाऱ्यां समाज कंठकावर कारवाई करा, भारतीय बौध्द महासभा,समता सैनिक दल व वंचित बहुजन आघाडी यांची मागणी. 16 December, 2024

परभणी येथील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्यां समाज कंठकावर कारवाई करा, भारतीय बौध्द महासभा,समता सैनिक दल व वंचित बहुजन आघाडी यांची मागणी.

वणी:- परभणी येथे १० डिसेंबर रोजी एका समाजकंटकाने भारतीय संविधानाची प्रतिकृतीची विटंबना केली. या देशद्रोही कृत्याचा...

*क्रांतीज्योती सावित्रीआई फुले.मा .फातिमा शेख आणि राजमाता जिजाऊ यांच्या संयुक्त जयंती निमित्याने खुली सामाजिक ज्ञान स्पर्धेचे आयोजन*    *पुस्तके वाचून जयंती साजरी करूया: डाॅ.विवेक बांबोळे* 16 December, 2024

*क्रांतीज्योती सावित्रीआई फुले.मा .फातिमा शेख आणि राजमाता जिजाऊ यांच्या संयुक्त जयंती निमित्याने खुली सामाजिक ज्ञान स्पर्धेचे आयोजन* *पुस्तके वाचून जयंती साजरी करूया: डाॅ.विवेक बांबोळे*

*क्रांतीज्योती सावित्रीआई फुले.मा .फातिमा शेख आणि राजमाता जिजाऊ यांच्या संयुक्त जयंती निमित्याने खुली सामाजिक ज्ञान...

हॉटेल आपला राजवाडा, वणी. चे पार्टनर सुमित मालेकर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 15 December, 2024

हॉटेल आपला राजवाडा, वणी. चे पार्टनर सुमित मालेकर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

...

चोरडिया फार्म हाऊस येथे राधाकृष्ण मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न. 15 December, 2024

चोरडिया फार्म हाऊस येथे राधाकृष्ण मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न.

वणी:- वणी घुग्गुस हायवेवर मंदर शेत शिवारातील चोरडिया फार्म हाऊस येथे दत्त जयंतीच्या शुभमुहूर्तावर राधाकृष्ण मूर्तीचा...

पाटाळा धुळ यात्रे निमित्त, भव्य निःशुल्क आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन, अखिल सातोकर व मित्र परिवाराचा पुढाकार. 15 December, 2024

पाटाळा धुळ यात्रे निमित्त, भव्य निःशुल्क आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन, अखिल सातोकर व मित्र परिवाराचा पुढाकार.

वणी: गेल्या अनेक वर्षांपासून दत्त जयंती निमित्त वर्धा नदी चे तीरावर पाटाळा येथे धुळयात्रा भरत आहे. हजारो भाविक भक्त...

यवतमाळ-जिल्हातील बातम्या

धाडसी घरफोडी सोन्याच्या दागिन्यांसह रोख लंपास.

वणी:- शहरातील गुरूवर्य कॉलनी येथील बंद घर फोडून नगदी ४५ हजार रुपये व सोन्याचे दागिने मिळून ४ लाख ९० हजारांचा मुद्देमाल...

निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी चे अध्यक्ष व सहयोग ग्रुपचे सदस्य सुरेन्द्र गेडाम यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय झरी येथे रुग्णांना फळवाटप

झरी :निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी आणि सहयोग ग्रुप मुकुटबन कडुन ग्रामीण रुग्णालय झरी येथे फळवाटप कार्यक्रम घेण्यात आला.निसर्ग...

सुशगंगा पब्लिक स्कूल मध्ये संविधान दिवस उत्साहात साजरा.

वणी:- सुशगंगा पब्लिक स्कूल मध्ये 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिवस (संविधान दिन) मोठ्या उत्साहात साजरा केला. हा कार्यक्रम...