Home / यवतमाळ-जिल्हा / पोलीस दलातील २९ गस्ती...

यवतमाळ-जिल्हा

पोलीस दलातील २९ गस्ती वाहनांचे पालकमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण

पोलीस दलातील २९ गस्ती वाहनांचे  पालकमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण

पोलिस दलाच्या बळकटीकरणासाठी निधी कमी पडू देणार नाही -पालकमंत्री संजय राठोड यांची ग्वाही

यवतमाळ : जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी चांगल्या वाहनांची गरज लागते या जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने माझ्या जिल्ह्याच्या पोलीस दलाचे बळकटीकरण करणे माझे प्रथम कर्तव्य आहे. म्हणुनच जिल्हा नियोजन समितीमधून आज पोलिस दलाला २९ वाहने उपलब्ध करून दिली आहे. आपल्या जिल्ह्याच्या पोलीस दलाचे बळकटी करणासाठी आवश्यक ती सर्व मदत करायला तयार असल्याची ग्वाही अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी दिली.आज पोलीस मुख्यालयात यवतमाळ जिल्हा पोलीस विभागासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून खरेदी करण्यात आलेल्या नऊ चार चाकी वाहने,दहा टी.व्ही.एस.मोपेड तर दहा हिरो मोटर सायकल अशा एकोणतीस गस्ती वाहनांचे हस्तांतरण पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते आज करण्यात आले.

यावेळी आमदार मदन येयेरावर,जिल्हा पोलीस अधिक्षक पवनकुमार बनसोड,अपर पोलीस अधिक्षक पियुष जगताप,तसेच पोलीस विभागातील पोलीस अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.यावेळी पालकमंत्री यांनी वाहनांचे पूजन करून वाहनांना हिरवा झेंडा दाखवून रवाना केले.

यावेळी बोलताना मंत्री श्री राठोड म्हणाले,आजही आपल्या जिल्ह्यातील काही पोलीस स्थानके ही ब्रिटिश कालीन असून, त्या पडायला आलेल्या इमारती मधुन आपली कामे चालतात, ही खेदाची बाब आहे. नविन  पोलिस इमारतींसाठी प्रस्ताव सादर करावे,लागलीच निधी प्राप्त करून देतो असे त्यांनी सांगितले.

त्याचबरोबर पोलीस बांधवांच्या निवासस्थानाच्या दुरुस्तीचे कामे, सी.सी.टीव्ही.कॅमेरे किंवा ड्रोन कुठेही निधी कमी पडू दिला जाणार नाही.पोलिस विभागाने दोन ड्रोनची मागणी केली होती परंतु जिल्ह्याला पाच ड्रोनची गरज आहे. पाच ड्रोनचा प्रस्ताव सादर करण्यासही त्यांनी सांगितले. तसेच जिल्ह्याच्या पोलीस दलाचे बळकटीकरण करणे व काही उनिवा असल्यास त्या दूर करणे हे त्यांचे कर्तव्यच असल्याचे पालकमंत्री यावेळी म्हणाले.

यावेळी प्रास्ताविक करताना जिल्हा पोलीस अधिक्षक पवन बनसोड यांनी सांगितले की, जिल्हा नियोजन समिती मधून २ कोटी २८ लाख ४३ हजार निधी प्राप्त झाला असून,या  गस्ती वाहनामुळे जिल्ह्याच्या पोलीस दलाला बळकटी प्राप्त होणार आहे. तसेच डायल ११२ च्या माध्यमातून संकटकालीन वेळेत सामान्य जनतेपर्यंत पंधरा मिनिटात पोहचणे शक्य होणार आहे. तसेच पालकमंत्री महोदयांनी यासाठी निधी दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले.  अपर पोलीस अधिक्षक पियुष जगताप यांनी आभार मानले.

 

ताज्या बातम्या

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* 16 December, 2024

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...

परभणी येथील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची  विटंबना करणाऱ्यां समाज कंठकावर कारवाई करा, भारतीय बौध्द महासभा,समता सैनिक दल व वंचित बहुजन आघाडी यांची मागणी. 16 December, 2024

परभणी येथील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्यां समाज कंठकावर कारवाई करा, भारतीय बौध्द महासभा,समता सैनिक दल व वंचित बहुजन आघाडी यांची मागणी.

वणी:- परभणी येथे १० डिसेंबर रोजी एका समाजकंटकाने भारतीय संविधानाची प्रतिकृतीची विटंबना केली. या देशद्रोही कृत्याचा...

*क्रांतीज्योती सावित्रीआई फुले.मा .फातिमा शेख आणि राजमाता जिजाऊ यांच्या संयुक्त जयंती निमित्याने खुली सामाजिक ज्ञान स्पर्धेचे आयोजन*    *पुस्तके वाचून जयंती साजरी करूया: डाॅ.विवेक बांबोळे* 16 December, 2024

*क्रांतीज्योती सावित्रीआई फुले.मा .फातिमा शेख आणि राजमाता जिजाऊ यांच्या संयुक्त जयंती निमित्याने खुली सामाजिक ज्ञान स्पर्धेचे आयोजन* *पुस्तके वाचून जयंती साजरी करूया: डाॅ.विवेक बांबोळे*

*क्रांतीज्योती सावित्रीआई फुले.मा .फातिमा शेख आणि राजमाता जिजाऊ यांच्या संयुक्त जयंती निमित्याने खुली सामाजिक ज्ञान...

हॉटेल आपला राजवाडा, वणी. चे पार्टनर सुमित मालेकर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 15 December, 2024

हॉटेल आपला राजवाडा, वणी. चे पार्टनर सुमित मालेकर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

...

चोरडिया फार्म हाऊस येथे राधाकृष्ण मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न. 15 December, 2024

चोरडिया फार्म हाऊस येथे राधाकृष्ण मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न.

वणी:- वणी घुग्गुस हायवेवर मंदर शेत शिवारातील चोरडिया फार्म हाऊस येथे दत्त जयंतीच्या शुभमुहूर्तावर राधाकृष्ण मूर्तीचा...

पाटाळा धुळ यात्रे निमित्त, भव्य निःशुल्क आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन, अखिल सातोकर व मित्र परिवाराचा पुढाकार. 15 December, 2024

पाटाळा धुळ यात्रे निमित्त, भव्य निःशुल्क आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन, अखिल सातोकर व मित्र परिवाराचा पुढाकार.

वणी: गेल्या अनेक वर्षांपासून दत्त जयंती निमित्त वर्धा नदी चे तीरावर पाटाळा येथे धुळयात्रा भरत आहे. हजारो भाविक भक्त...

यवतमाळ-जिल्हातील बातम्या

धाडसी घरफोडी सोन्याच्या दागिन्यांसह रोख लंपास.

वणी:- शहरातील गुरूवर्य कॉलनी येथील बंद घर फोडून नगदी ४५ हजार रुपये व सोन्याचे दागिने मिळून ४ लाख ९० हजारांचा मुद्देमाल...

निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी चे अध्यक्ष व सहयोग ग्रुपचे सदस्य सुरेन्द्र गेडाम यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय झरी येथे रुग्णांना फळवाटप

झरी :निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी आणि सहयोग ग्रुप मुकुटबन कडुन ग्रामीण रुग्णालय झरी येथे फळवाटप कार्यक्रम घेण्यात आला.निसर्ग...

सुशगंगा पब्लिक स्कूल मध्ये संविधान दिवस उत्साहात साजरा.

वणी:- सुशगंगा पब्लिक स्कूल मध्ये 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिवस (संविधान दिन) मोठ्या उत्साहात साजरा केला. हा कार्यक्रम...