*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे*
*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...
Reg No. MH-36-0010493
दारव्हा: तिवसा गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून अवैधरित्या दारू विक्री होत आहे.दारू विक्रीच्या व्यवसायामध्ये महिलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग असून त्या महिला बचत गटाच्या ही सदस्य आहेत. गावात व आजूबाजूच्या गावामध्ये मोठ्या प्रमाणात दारूची विक्री होत असताना पोलिसांकडून कुठल्या प्रकारची कारवाई केल्या जात नाही. त्यामुळे संबंधीची चौकशी करून कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राजेश राठोड यांनी तक्रार केली आहे. तसेच मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्रधान सचिव श्री मिलिंद म्हैस्कर - उत्पादन शुल्क यांना तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील मौजा तिवसा हे पाच हजार लोकसंख्या वस्तीचे गाव आहे.त्या गावातील १२ ते १५ लोक अवैध दारू विक्री करतात.परंतु दारव्हा तालुक्यातील लाडखेड पोलीस स्टेशनचे अधिकारी यांच्या कडून हप्ता वसुल करून अवैध दारू व्यवसाय व जुगार यांना अभय, संरक्षण दिले गेले आहे.त्यामुळे गावातील युवापिढी, तरुण वर्ग व्यसनाधीन होत आहे.अवैध दारूची विक्री आजूबाजूचा बोरगाव, चानी, नारकुंड, बोरजई गावालाही हेच लोक करतात.गावात राहणाऱ्या अनिता विष्णू राठोड महिला २०११ पासून दर वर्षी अवैध दारू व्यवसाय करीत असून लाडखेड पोलीस प्रशासनास तसेच कायदा व सुव्यवस्थेला जुमानत नाही असे दिसून येते.गावातच नाही तर, आजूबाजूच्या गावात दारू विक्री करतांना या महिलेस लाडखेड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हाची नोंद आहे.त्या महिले विरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 कलम 65 (C) व 65 (D) नुसार दि. 25जानेवारी 2020 रोजी व 29/10/2020 व 2022 गुन्हाची नोंद आहे. गावातील दत्त महिला बचत गट रास्त भाव दुकानाचा सचिव आहे हे विशेष. दिनांक 18.05.2023 रोजीचा मा मंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांनी श्री दत्त महिला बचत गट रास्त भाव दुकान यांच्या पुनर्निरीक्षण सुनावणीस तसे निदर्शनास आणून दिले व उप आयुक्त अमरावती यांच्या कडे समिती गठीत करून चौकशी करण्याची सूचना दिला आहे.
तर पूर्णा वसंत पवार, संज्या पवार, विशाल वसंत पवार व चेतन वसंत पवार हे ग्रामपंचायत कार्यालयाचा बाजूला अतिक्रमण करून गावातील ठराव न घेता घर टॅक्स पावती घेऊन त्या जागेवर अवैध दारू विक्री करतात. तसेच यांच्यावर तक्रार क्र. 352/2001 लाडखेड पोलीस स्टेशन भारतीय दंड विधान कलम 324, 504, 506, व 34 दि. 18 सप्टेंबर 2021 रोजी गुन्हाची नोंद आहे. त्या तक्रारी नमूद असलेले पिपे हे शब्द असून ते दारूचे पिपे चोरणाच्या प्रकरणात होते.परंतु लाडखेड पोलीस स्टेशन मधून प्रकरण दडपणात आले.त्यामुळे शासनाने जातीने लक्ष घालून चौकशी व गावात दारूबंदी समितीची नेमणूक करण्याचे आदेश देण्यात यावे व कायदेशीर फौंजदारी कारवाई करण्यात मागणी केली आहे.
तिवसा गावातील अवैध दारू व्यवसाय करणारे हे आहेत लोक
गावातील विशाल वसंत पवार,अनिता विष्णू राठोड,पूर्णा वसंत पवार,संज्या वसंत पवार,अनिता रामजी राठोड,राजेश वसराम राठोड (दुकानदार) मंगला राठोड,रेणुका गोपाळ राठोड,लक्ष्मण नैताम, देवल्या कोईचाडे, ताराचंद बबन राठोड, ताराचंद आडे व लीला रामलाल राठोड यांच्या नावाची यादी पुराव्यासह संबंधीत विभागाला सादर केली आहे.परंतू त्यांच्या कडून जाणिवपूर्वक दुर्लक्ष होत आहे.
*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...
*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...
*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...
झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...
वणीः- राष्ट्रीय पातळीवर छत्तीसगढ राज्यातील दुर्ग येथे दिनांक २४ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२४ या दरम्यान राष्ट्रीय पातळीवर...
झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...