Home / यवतमाळ-जिल्हा / झरी-जामणी / *पर्यावरण जनसुनावणी...

यवतमाळ-जिल्हा    |    झरी-जामणी

*पर्यावरण जनसुनावणी कधी?* *Rccpl मुकूटबन चुनखडी लिज वनजमीन 467 हे.क्षेत्र उत्खनन मुळे वन्यजीव पर्यावरण शेतकरी प्रभावित*

*पर्यावरण जनसुनावणी कधी?*    *Rccpl मुकूटबन चुनखडी लिज वनजमीन 467 हे.क्षेत्र उत्खनन मुळे वन्यजीव पर्यावरण  शेतकरी प्रभावित*
ads images

*पर्यावरण जनसुनावणी कधी?*

 

Rccpl मुकूटबन चुनखडी लिज वनजमीन 467 हे.क्षेत्र उत्खनन मुळे वन्यजीव पर्यावरण  शेतकरी प्रभावित

 

✍️दिनेश झाडे

 भारतीय वार्ता

 

झरीजामणी:-Rccpl मुकूट बन सिमेंट कंपनी, तालुका झरी जिल्हा यवतमाळ कंपनी ला मुकूट बन चुनखडी लिज क्षेत्रातील 467 हेक्टर वनजमीन चे , वनविभागाने stage I,stage II मान्यता दिली होती, परंतु हे वनक्षेत्र लिज, वाघांचे अस्तित्व असलेल क्षेत्र असल्याकारणाने wildlife विभागात अटकून होते. मुकूट बन व आजुबाजुला असलेल्या क्षेत्रात नेहमी वाघांचे अस्तित्व दिसून येत,हे सर्वांना परिचित आहे. Tadoba andhari tiger reserve TATR चे The tiger conservation plan नुसार 2017 पर्यंत वाघांचे अस्तित्व असलेल क्षेत्र दाखविले आहेत,तर मग नंतर  2021 मध्ये WII अहवालात लिज क्षेत्र 572.17 हे वाघांचे क्षेत्र दाखविले नाही,हे अहवाल कंपनी ला सहकार्य करित हे वाघांचे ताडोबा टायगर्सची वनजमीन कंपनी ला देण्यासाठी तयार करण्यात आले आहे का? असे जनतेला प्रश्न उपस्थित होतो आहे. ही वनजमीन वाघांचे अस्तित्व असलेल क्षेत्र म्हणून अद्याप कंपनी ला चुनखडी लिज मिळाली नव्हती, परंतु आता कंपनी हे लिज क्षेत्र मिळवण्यासाठी आटापिटा करत आहे, ह्या वनजमिनी मोबदला मध्ये पैनगंगा नदी किनारी 349 लाख रुपये खर्च वृक्षारोपण तरतूद हे दिखावा आहेत का?, कंपनीने लावलेल झाडं अस्तित्वात आहेत का? खनन प्रकिया मुळे प्रदुषण नियंत्रण साठी, लोकांना निरोगी ठेवण्यासाठी वृक्षारोपण आवश्यक असते,हे करताना कंपनी दिसत नाही, लोकांनी ह्या विषयावर जागृत व्हायला हवे.ही वाघांचे अस्तित्व असलेल वनभुमी कंपनी ला न देण्याबाबत एनजीओ संस्था कडून भरपूर विरोध झाला होता, परंतु स्थानिक लोकांच्या अज्ञानामुळे ह्या वनभुमी साठी विरोध झाला नाही, ही वनभुमी मध्ये कंपनी चे उत्खनन सुरू झाल्यास वनभुमी मधील वाघ व इतर हिंसक वन्यजीव शेतकरी चे शेती नुकसान करेल.हया वन्यजीव साठी पर्यायी जागा कंपनीने उपलब्ध करून दिल्याचे माहिती नाही. करिता ह्या चुनखडी लिज क्षेत्र साठी सार्वजनिक जनसुनावणी का घेण्यात येत नाही.हया आधी घेतलेलं जनसुनावणी ही 10 ते 12 वर्ष पहिले सिमेंट प्लांट उद्योग साठी घेतली होती. ह्या वनभुमी चुनखडी लिज क्षेत्र साठी स्वतंत्र जनसुनावणी होणं गरजेचं आहे,कारण ह्या वनभुमी मधील उत्खननामुळे व वन्यजीव मुळे आजुबाजुला असलेल्या शेतकरी जीवनात प्रभाव पडणार आहे. केंद्रीय व राज्य पर्यावरण विभाग ने ह्या विषयावर सार्वजनिक लोकसुनावणी तातडीने घ्यावी.शासनाने स्थानिक लोकांना विश्वासात न घेता हे लिज क्षेत्र सिमेंट कंपनी ला दिले परंतु ह्या मुळे वनक्षेत्रात असणारे वन्यप्राणी व शेतकरी वर काय प्रभाव पडणार ह्या साठी अद्याप सार्वजनिक सुनावणी घेण्यात आली नाही. एकिकडे वाघ वाचवा,वाघ बिबट कमी होत आहे म्हणून विदेशातून आणत आहेत,तर दुसरीकडे वन्यजीव वास्तव असलेल क्षेत्र कंपनी ला देण्यात येत आहे.  वाघांचे अस्तित्व असलेल क्षेत्र कंपनी चे खनिज कामासाठी वळविण्यात येत नाही, परंतु हे क्षेत्र घाईगडबडीत शासनाने कंपनी ला मान्यता दिल्याचे दिसून येत आहे. तत्कालीन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे साहेब यांनी ह्या लिज ला मान्यता दिली नव्हती, परंतु आता च्या सरकारने स्थानिक लोकांना विश्वासात न घेता, घाईगडबडीत मान्यता देऊन, वन्यजीव मुळे स्थानिक शेतकरी त्रस्त होणार आहे.हे निश्चित आहे, असे अरुण मैदमवार सामाजिक कार्यकर्ता ह्यांनी म्हटले आहे. कंपनीचे प्रा.जमिन 104 हेक्टर क्षेत्र मधील, उत्खनन मुळे, पिंप्रडवाडी गाव घरे व  लगतचे शेतपिक धुळीमुळे व ब्लास्टिंग मुळे नुकसान होत असताना कंपनी कडून कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई देताना दिसत नाहीत. ह्या वनभुमी मध्ये अनेक वृक्ष आहेत जे ह्या उत्खनन मुळे नष्ट होणार आहे,लोकांनी वेळेत जागृत व्हा. वन्यजीव व वृक्षतोड वाचवा, आजचं झाड हे उद्याचे जिवन आहे.

ताज्या बातम्या

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* 04 January, 2025

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे*

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* 04 January, 2025

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी*

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे 03 January, 2025

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. 03 January, 2025

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

...

मुकूटबन येथे शौचालय व प्रवासी निवारा उपलब्ध करून द्या- सुरेंद्र गेडाम यांची मागणी 02 January, 2025

मुकूटबन येथे शौचालय व प्रवासी निवारा उपलब्ध करून द्या- सुरेंद्र गेडाम यांची मागणी

झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...

राष्ट्रीय पातळीवरील नृत्य स्पर्धेत वणीतील स्पर्धकांनी विविध नृत्य स्पर्धांमध्ये मारली बाजी. 02 January, 2025

राष्ट्रीय पातळीवरील नृत्य स्पर्धेत वणीतील स्पर्धकांनी विविध नृत्य स्पर्धांमध्ये मारली बाजी.

वणीः- राष्ट्रीय पातळीवर छत्तीसगढ राज्यातील दुर्ग येथे दिनांक २४ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२४ या दरम्यान राष्ट्रीय पातळीवर...

झरी-जामणीतील बातम्या

मुकूटबन येथे शौचालय व प्रवासी निवारा उपलब्ध करून द्या- सुरेंद्र गेडाम यांची मागणी

झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

रान डुकरांचा हैदोस, मुकुटबन येथील शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान

झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...