Home / यवतमाळ-जिल्हा / मारेगाव / 5 जून पासून ऑपरेटरला...

यवतमाळ-जिल्हा    |    मारेगाव

5 जून पासून ऑपरेटरला हटविण्यासाठी रोजगार सेवकाचे काम बंद आंदोलन

5 जून पासून ऑपरेटरला हटविण्यासाठी रोजगार सेवकाचे काम बंद आंदोलन

रोजगार सेवकांना अपमानजनक वागणूक देत असल्याने आंदोलन

मारेगाव : रोजगार सेवकाना अपमानजनक वागणूक देणाऱ्या रोजगार हमी योजनेच्या त्या टेबलवरून ऑपरेटर ला तात्काळ हटविण्यासाठी महाराष्ट्र रोजगार सेवक संघटनेच्या वतीने येत्या 5 तारखे पासून काम बंद अंदोलनासह धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा तसेच गावात विकास कामे झपाट्याने व्हावी यासाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. मागेल त्याला गावातच कामे उपलब्ध करून देण्यासाठी रोजगार सेवकांची नेमणूक करण्यात आली आहे. रोजगार हमीची ऑनलाईन कामे करण्यासाठी पंचायत समिती स्तरावर आपरेट करण्यासाठी आपरेटर देण्यात आले असताना गेल्या काही दिवसापासून या योजनेला कंत्राटी पद्धतीचे ग्रहण लागले असून, रोजगार सेवकांच्या अमंलाबजावणीला या टेबलवर केराची टोपली दाखविल्या जात आहे. तसेच येथील ऑपरेटर कंत्रांटदाराच्या दावणीला बांधला गेला असल्यामुळे स्थानिक विकास कामात मोठा पेच निर्माण झाल्याची ओरड आहे.

रोजगार सेवकांकडून स्थानिक कामे करून घेण्यासाठी ऑपरेटरला पैसे मिळत नसल्याने त्यांची कामे प्रलंबित ठेवली जात असून चिरीमिरी देणाऱ्या ठेकेदाराची कामे तातडीने केली जाते असा आरोप तक्रारीतुन आंदोलकांनी केली आहे. याबाबत रोजगार सेवकांनी वारंवार तक्रारी केलेल्या आहेत. मात्र, वरिष्ठ पातळी वरून ठोस कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे ऑपरेटरच्या मुजोऱ्या वाढल्या आहेत. ग्रामसभेने सुचविलेल्या विकास कामाची अमंलाबजावणी करण्यासाठी पंचायत समितीच्या ऑपरेटर ची महत्व पूर्ण जबाबदारी आहे. यामध्ये ऑनलाईन मस्टर काढणे, मजुरी अदा करणे, ऑनलाईन मंजुरात घेणे इत्यादी कामांचा समावेश आहे. मात्र, रोजगार सेवकांनी सादर केलेल्या मागणीच्या प्रस्तावाकडे दुर्लक्ष करून ठेकेदारांनी सादर केलेल्या प्रस्तावाची दखल येथील ऑपरेटर बादल खंडरे यांचे कडून घेतली जात असल्याने त्यांना तात्काळ या टेबलवरून 15 दिवसाचे आत हटविण्यात यावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा या मागणी अर्जातून देण्यात आला होता, मात्र या तक्रारीला केराची टोपली दाखविण्यात आल्यामुळे येत्या 5 तारखेपासून रोजगार सेवकांनी आंदोलनाचे शस्त्र उपसावे लागले आहे.

या आंदोलनाची नोटीस मारेगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना रोजगार सेवकांनी बजावली आहे. शिवाय पोलिस स्टेशन तथा तहसील कार्यालयाला निवेदन देऊन या आंदोलनाबाबत अवगत केले. दिलेल्या नोटीसवर तक्रार संघटनेचे अध्यक्ष खुशाल येरगुडे, सचिव भगवान धाबेकर, उपाध्यक्ष प्रशांत सपाट, सहसचिव गणपत मडावी, संतोष कोंडेकर, अनिल कुमरे, रमेश सिडाम, महादेव गुरुनुले, शैलेश पेंदोर, नारायण सुसराम, विवेक नरवाडे, स्वप्नील ठावरी, गणेश कालेकर, आशिष किनाके, नितेश काटकर, मनोज दडांजे, संदीप जिवणे, वामन डोंगे, आशिष भोयर, गणेश कुळमेथे, सिद्धार्थ खैरे, शेषराव देवाळकर,अमित खिरटकर, गजानन बोधे, प्रमोद जुमनाके, संतोष बल्की, इत्यादीच्या सह्या आहेत.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

मारेगावतील बातम्या

बोरी (बु ) येथील 32 वर्षीय विवाहित युवकाने विहिरीत उडी टाकून केली आत्महत्या

मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे आयोजन*

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...