Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / *राळेगाव तहसिल कार्यालयासमोर...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

*राळेगाव तहसिल कार्यालयासमोर काॅंग्रेसच्या वतीने धरणे आंदोल*

*राळेगाव तहसिल कार्यालयासमोर काॅंग्रेसच्या वतीने धरणे आंदोल*

*राळेगाव तहसिल कार्यालयासमोर काॅंग्रेसच्या वतीने धरणे आंदोल*

 

✍️प्रविण गायकवाड

    राळेगाव

 

राळेगाव:- तालुक्यातील काॅग्रेस पक्षाच्या वतीने आज दिनांक 31/5/2023 रोज बुधवारला राळेगाव येथील तहसिल कार्यालयासमोर खालील मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले.शेतकऱ्यांच्या कापसाला 10000 रूपये भाव देण्यात यावा. शेतकऱ्यांच्या शेतात जाण्यासाठी पांदन रस्त्याची कामे करण्यात यावी.शेतकऱ्यांना शेततळे आणि विज जोडणी तात्काळ करण्यात यावी.नियमित पिक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेले 50000 हजार रुपये अनुदान देण्यात यावे. शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाची नासाडी मोठ्या प्रमाणावर होऊनही पिक विम्याची रक्कम अजूनही मिळाली नाही ती त्वरित देण्यात यावी.शेतकऱ्यांच्या शेतातील विजेचे लोड शेडीग बंद करण्यात यावे. जीवनावश्यक वस्तूंची वाढलेली महागाई ताबडतोब कमी करण्यात यावी.अशा आशयाच्या मागण्या घेऊन या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात सर्वप्रथम काॅंग्रेस पक्षाचे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार स्व.बाळूभाऊ धानोरकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.त्याचबरोबर अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त स्मरण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.या कार्यक्रमात महादेवराव मेश्राम, जानराव गिरी,अडव्होकेट वैभव पंडित, मिलिंद इंगोले,अंकुशराव रोहणकर,सुरेश पेंद्राम यांनी आपल्या भावना व्यक्त करून शासनाप्रती रोष व्यक्त केला.त्यानंतर काॅंग्रेस पक्षाचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अडव्होकेट प्रफुल्ल मानकर यांनी शासनाच्या शेतकरी, बेरोजगार,मजूर यांच्या प्रती असलेली नाराजी व्यक्त केली.कार्यक्रमाच्या शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे माजी शिक्षणमंत्री प्राध्यापक वसंतराव पुरके सरांनी शासन सर्वसामान्य, शेतकरी, शेतमजूर, सुशिक्षित बेरोजगार यांच्या विरोधात कसे आहे हे उपस्थित मान्यवर मंडळाच्या लक्षात आणून दिले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश काळे यांनी केले तर प्रदीप ठुणे यांनी आभार मानले.त्यानंतर पक्षाच्या वतीने उपस्थित नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत तहसिल कार्यालयात निवेदन देण्यात आले. या धरणे आंदोलनात पक्षाचे नेते तथा प्राध्यापक वसंतराव पुरके सर, यवतमाळ जिल्हा अध्यक्ष प्रफुल्ल मानकर, ओबीसी जिल्हा अध्यक्ष इंजिनिअर अरविंद वाढोणकर, राळेगाव तालुका अध्यक्ष राजेंद्र तेलंगे,शहर अध्यक्ष प्रदीप ठुणे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष मिलिंद इंगोले, उपाध्यक्ष मारोतराव पाल, वसंत जिनिंग राळेगावचे अध्यक्ष नंदकुमार गांधी, उपाध्यक्ष अंकुश रोहणकर, नगरपंचायत राळेगावचे अध्यक्ष रवींद्र शेराम, उपाध्यक्ष जानराव गिरी, ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्था राळेगावचे अध्यक्ष सचिन हुरकुंडे , तसेच अनेक वेगवेगळ्या संस्थाचे तालुक्यातील पदाधिकारी व शेतकरी, महिला भगिनी यांचे सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...