Home / यवतमाळ-जिल्हा / नागरिकांनो पुढील दहा...

यवतमाळ-जिल्हा

नागरिकांनो पुढील दहा दिवस उष्णतेचे

नागरिकांनो पुढील दहा दिवस उष्णतेचे
ads images
ads images
ads images

जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

यवतमाळ :-जिल्ह्यात मागील काही दिवसा पासून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. पुढील १० दिवस तापमान आणखी वाढ होऊन ते ४५ अंश डिग्री सेल्सियस पर्यंत जाण्याची शक्यता आहे. या काळात उष्माघातापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी काय करावे व काय करू नये,याबाबत जिल्हा प्रशासनातर्फे आवश्यक मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

Advertisement

 

तीव्र उन्हात मुख्यत: दुपारी १२ ते ४ या वेळात  घराबाहेर पडणे टाळवे. थोड्या- थोड्या अंतराने पाणी प्यावे, हलक्या रंगाचे सुती कपडे वापरावे, घराबाहेर पडताना टोपी,गमछा, दुपट्टा डोके व तोंड झाकण्यासाठी वापरावा,  छत्रीचा वापर करावा व सोबत पाणी ठेवावे.

 

मद्य,चहा,कॉफी व कार्बोनेटेड शितपेय पिण्याचे टाळावे. तसेच शिळे अन्न खाणे टाळवे. उन्हात काम करताना चेहरा व डोके पांढ-या कपड्याने झाकावे. चक्कर येत असल्यास व आजारी वाटल्यास लवकरात लवकर डॉक्टराकडे जावे. तत्पूर्वी ओआरएस, लस्सी, ताक, लिंबूपाणी सेवन करावे.

घरामध्ये लहान मुलं असल्यास त्यांच्याकडे विशेष लक्ष द्यावे. दुपारी १२ ते ४ या वेळेत मुले बाहेर पडणार नाहीत,याची काळजी घ्यावी. दिवसभर पुरेसे पाणी पीत राहतील याकडे लक्ष द्यावे.

उष्णतेच्या लाटेमुळे आजारी पडलेल्या व्यक्तीच्या उपचारासाठी व्यक्तीला एखाद्या थंड जागी ठेवावे. शरीराचे तापमान खाली आणण्याचे प्रयत्न करावे. ओल्या कपड्याने त्यांना पुसत राहवे. डोक्यावर थंड पाणी टाकावे. ओआरएस,लस्सी,ताक,लिंबूपाणी द्यावे,तसेच जवळच्या आरोग्य केंद्रात त्वरीत दाखल करून उपचार सूरु करावे. सोबतच पाळीव प्राण्यांना सुद्धा  सावलीत ठेवून भरपूर पाणी प्यायला द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडून यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांना करण्यात आले आहे.

 

ताज्या बातम्या

सीसीआयला थेट कापूस खरेदी करायचे आदेश, आ. संजय देरकरांनी शेतकऱ्यांना केले टोकण मुक्त. 27 November, 2024

सीसीआयला थेट कापूस खरेदी करायचे आदेश, आ. संजय देरकरांनी शेतकऱ्यांना केले टोकण मुक्त.

वणी :- येथील सीसीआय कडून खरेदी करण्यात येत असलेल्या कापसाची टोकण पद्धत बंद करून थेट कापूस खरेदी करण्याचे आदेश आमदार...

सुशगंगा पब्लिक स्कूल मध्ये संविधान दिवस उत्साहात साजरा. 27 November, 2024

सुशगंगा पब्लिक स्कूल मध्ये संविधान दिवस उत्साहात साजरा.

वणी:- सुशगंगा पब्लिक स्कूल मध्ये 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिवस (संविधान दिन) मोठ्या उत्साहात साजरा केला. हा कार्यक्रम...

संविधान दिना निमित्त आ. संजय देरकर यांनी चैत्यभूमीवर जावून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना केले अभिवादन 27 November, 2024

संविधान दिना निमित्त आ. संजय देरकर यांनी चैत्यभूमीवर जावून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना केले अभिवादन

वणी :- आज तारीख २६ नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान दिन असल्याने वणी विधानसभेचे नवनिर्वाचित लोकप्रिय आमदार संजय देरकर...

संविधान दिनानिमित्त वणी येथे जाहीर व्याख्यान. 24 November, 2024

संविधान दिनानिमित्त वणी येथे जाहीर व्याख्यान.

वणी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान दिनानिमित्त वणी येथे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी वरोरा रोड वरील...

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन. 23 November, 2024

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.

...

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव. 23 November, 2024

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.

वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...

यवतमाळ-जिल्हातील बातम्या

सुशगंगा पब्लिक स्कूल मध्ये संविधान दिवस उत्साहात साजरा.

वणी:- सुशगंगा पब्लिक स्कूल मध्ये 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिवस (संविधान दिन) मोठ्या उत्साहात साजरा केला. हा कार्यक्रम...

महायुती चे उमेदवार आ.बोदकुरवार यांना कुणबी समाजाचे युवा उभरता चेहरा महेश पहापळे यांचा पाठिंबा.

वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...