वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
यवतमाळ : मागील वर्षासारखी यावर्षी युरियाची टंचाई भासणार नाही यासाठी जिल्हा प्रशासनाने योग्य नियोजन करावे. तसेच धामणगाव ऐवजी वाशिम आणि नांदेड जिल्ह्यातील रॅक पॉईंट काही तालुक्यांना जास्त जवळचा असल्यामुळे या दोन रॅक पॉईंटवर खताची जादा मागणी नोंदवावी, अशा सूचना पालकमंत्री संजय राठोड यांनी दिल्यात.
जिल्हास्तरीय खरीप हंगाम २०२३-२४ ची नियोजन बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयातील महसुल भवन येथे पार पडली. यावेळी मंत्री राठोड बोलत होते. या बैठकिला खासदार भावना गवळी, आमदार सर्वश्री मदन येरावर, प्रा. अशोक उईके, निलय नाईक, इंद्रनील नाईक,संजय रेड्डी बोदकुरवार, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, तसेच जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर व इतर विभाग प्रमुख उपस्थित होते.
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी खरीप हंगामातील नियोजनाचे सादरीकरण केले. यात त्यांनी जिल्ह्यात ९ लक्ष २ हजार ७२ हेक्टर वर खरिपाची पेरणी होणार असुन यात सर्वाधिक महत्वाची कापुस, सोयाबिन आणि तुर ही तिन पिके आहेत. त्यापैकी ४ लक्ष ५५ हजार हेक्टर क्षेत्रावर कापुस, २ लक्ष ८६ हजार १४४ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन तर १ लक्ष २४ हजार १०० हेक्टर क्षेत्रावर तुर पिकाची लागवड होणार आहे. यासोबतच ज्वारी ६५०० हेक्टर, उडिद ४९५० हेक्टर, मुंग ४५०० हेक्टर, तीळ १६७ हेक्टर, मका ८९० हेक्टर, बाजरी ९५ हेक्टरवर लागवड करण्याचे नियोजन आहे.बियाण्याची मागणी: जिल्ह्यात लागवडीसाठी बियाण्याची मागणी नोंदवली आहे. कापुस बियाण्यांचे २२ लक्ष ७५ हजार पॅकेट्सची मागणी नोंदविण्यात आली आहे. सोयाबीनचे २ लक्ष १३ हजार क्विंटल बियाण्यांची गरज असुन यासाठी ग्राम बिजोत्पादन मोहिम आणि शेतक-यांकडचे स्वत:चे बियाणे असे २ लक्ष ८८ हजार २४२ क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. त्याचबरोबर महाबीज, राबिनी आणि खाजगी असे मिळून ७५ हजार ५५४ क्विंटल बियाणे आज उपलब्ध आहे.खताची मागणी : जिल्ह्यात एकुण २ लक्ष १३ हजार ९२० मे. टन खताची मागणी आहे. तर आज पर्यंत उपलब्ध साठा ९६ हजार ९३३ मे टन आहे. मागणी मध्ये युरिया ६८ हजार मे. टन, डीएपी १६ हजार, एमओपी ७४००, कॉम्प्लेक्स ७७ हजार ५२०, एसएसपी ४५ हजार मे.टनाची गरज आहे. जिल्ह्यात माळटेकडी नांदेड, धामणगाव, बडनेरा, हिंगणघाट, चंद्रपुर, वाशीम, वर्धा,आणि अकोला या ठिकाणी रॅक पाँईंट आहेत.
कृषी निविष्ठा विक्रीसाठी जिल्ह्यात एकूण ६६४० केंद्र असुन कापुस बियाणे १४३३, इतर बियाणे १८१९, रासायनिक खते १९१५ तर किटकनाशकांसाठी १४७३ केंद्रांना परवानगी देण्यात आली आहे.यावेळी पालकमंत्री संजय राठोड यांनी फळबाग लागवड, औषधी व मसाला पिके, रेशीम व मत्स्य शेती, कृषी विज्ञान केंद्र, माती परिक्षण इत्यादि बाबत माहिती नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली.यावेळी खासदार भावना गवळी यांनी पोकरा,महावितरण, रेशिम शेतीबबत विशेष बैठक लावण्यात यावी अशा सुचना केल्यात. पांढरकवडा येथील आदिवासी प्रकल्प कार्यालयातंर्गत लाभार्थ्यांनी घेतलेले जनावरे विकलेत याची चौकशी करण्याची मागणी आमदार प्रा. अशोक उइके यांनी केली. तसेच वरुड जहांगिर येथील तलावात आताच ८५ टक्के पाणी आहे. पावसाळ्यात या तलावात पाणी साठवण क्षमता राहणार नाही. त्यामुळे या तलावातील पाणी सोडण्यात यावे. यबाबत जिल्हाधिकारी यांनी पाटबंधारे विभागाला पाणी सोडण्याचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्यात .
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...
वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...