वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
यवतमाळ: रेड क्रॉस संस्था ही जगभरात आपत्तीग्रस्त लोकांसाठी कार्य करणारी संस्था असून १५० वर्षापेक्षा जास्त काळापासून मानव सेवेसाठी कार्य करणारी संस्था म्हणून या सोसायटीचा गौरव केला जातो. ८ मे हा जागतिक रेडक्रॉस दिन असून रेड क्रॉस सोसायटीचे संस्थापक ‘हेनरी ड्यूनेट’ यांची जयंती आज रक्तदान करुन साजरा करीत आहोत. उन्हाळ्यामध्ये भासणारा रक्ताचा तुटवडा भरुन काढण्यासाठी आज केलेले रक्तदान हे ख-या अर्थाने या संस्थेचा मानवी सेवा कार्याचा उद्देश साध्य करणारे आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले.
जिल्हा प्रशासन व इंडियन रेड क्रॉस सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आज रेड क्रॉस दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय बचत भवन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी जिल्हाधिकारी यांनी रेड क्रॉस भवन येथे ध्वजारोहण केले. यावेळी जिल्हाधिकारी यांनी रक्तदान करुन उपस्थितांना मार्गदर्शन केले.
जिल्हाधिकारी यांनी जागतिक रेड क्रॉस दिनाच्या शुभेच्छा देत मागील वर्षी सुद्धा याच दिवशी रक्तदान शिबिर घेतल्याची आठवण सांगितली. या सोसायटीच्या कार्याचा मानवतेसाठी व आरोग्यासाठी काय उद्देश आहे, हे समजून घेतले पाहिजे. यवतमाळ जिल्ह्यात या सोसायटीचे मोठ्या प्रमाणात काम झाले पाहिजे अशी आशा व्यक्त केली.
शिबिरात सहभागी झालेल्या सर्व रक्तदात्यांचे त्यांनी अभिनंदन केले. या कार्यक्रमासाठी मागच्या आठवड्यापासून परिश्रम घेत असलेल्या स्वयंसेवीचेही आभार मानले.
या रक्तदान शिबिरात २३१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यात जिल्हाधिकारी अमोल येडगे,उपविभागीय अधिकारी अनिरुद्ध बक्षी, प्रा. घनश्याम दरणे, 112 वेळा रक्तदान करणारे संदीप बेलखोडे, सौ किरण राठी, प्रकल्प अधिकारी डॉ अजय लाड, प्रविण राखुंडे, फिरोज पठाण, तसेच जिल्हा प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी रेड क्रॉस सोसायटीचे सदस्य, संकल्प फाउंडेशन, निस्वार्थ सेवा फाउंडेशन, सावित्री ज्योतिराव समाजकार्य महाविद्यालय, निमा फाउंडेशन, सारा सिंटेक्स वर्कर्स, फार्मसी महाविद्यालय नगरपरिषद यवतमाळ, हिमालय कार्स आणि सेतू केंद्राची कर्मचारी, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सदस्य, रेमंड,रविराज इंडस्ट्री, इत्यादी संस्थांनी या रक्तदान शिबिरात सहभाग घेतला.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सविता चौधर, तहसिलदार डॉ योगेश देशमुख, मुख्याधिकारी श्री डोल्हारकर, रेड क्रॉस संस्थेचे श्री गिलानी, किशोर दर्डा, टी.सी राठोड, देविदास गोपालानी, डॉ बी सी अग्रवाल, डॉ. विजय अग्रवाल,डॉ भोंगाडे, डॉ. हातगावकर, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री गिलानी, सुत्र संचालन घनश्याम दरणे, तर आभार अजय लाड यांनी मानले. यावेळी मेडीकल कॉलेजचे कर्मचारी तसेच रक्तदाते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...
वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...