Home / यवतमाळ-जिल्हा / यवतमाळ ग्रामीण पो.स्टे....

यवतमाळ-जिल्हा

यवतमाळ ग्रामीण पो.स्टे. हददीतील कोळंबी फाटा येथे घडलेल्या दुहेरी खुनाचे गुन्हयाचा १६ तासातच उलगडा करुन ०३ आरोपीतांना घेतले ताब्यात

यवतमाळ ग्रामीण पो.स्टे. हददीतील कोळंबी फाटा येथे घडलेल्या दुहेरी खुनाचे गुन्हयाचा १६ तासातच उलगडा करुन ०३ आरोपीतांना घेतले ताब्यात
ads images
ads images
ads images

▪️स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळची कारवाई

यवतमाळ:दिनांक ०१ मे २०२३ रोजी रात्री २३:०० वा च्या सुमारास पोलीस नियंत्रण कक्ष येथे माहिती मीळाली की,यवतमाळ ते कोळंबी

Advertisement

फाटा दरम्यान दोन इसम हे मृत अवस्थेत पडलेले असुन त्यांचा कोणीतरी खुन केला आहे. अशा माहितीवरुन मा. पोलीस अधीक्षक सा.

मा. अपर पोलीस अधीक्षक सा. मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सा. यवतमाळ, मा. परिविक्षाधिन पोलीस उपअधीक्षक मा. पोलीस

निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन यवतमाळ ग्रामीण, ठाणेदार वडगांव जंगल स्थानिक गुन्हे शाखा चे अधिकारी

व अंमलदार यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व अनोळखी मृतक याची सकाळी ०४:०० वा पावेतो ओळख पटविली असता

मृतकांची नांवे अनुक्रमे १) अविनाश हनुमंत कटरे वय ३२ वर्ष रा. ह.मु. चापडोह पुर्नवसन जि. यवतमाळ २) उज्वल नारायण छापेकर वय

२८ वर्ष रा. भोसा जि. यवतमाळ असे असल्याचे समजल्याने मृतकचे नातेवाईकांशी संपर्क साधुन त्यांची ओळख पटल्याने फिर्यादी विकास

रामचंद्र हौंसकर वय ३६ वर्ष रा. महसुल नगर, यवतमाळ यांचे फिर्यादीवरुन अज्ञात आरोपी विरुध्द पोलीस स्टेशन यवतमाळ ग्रामीण येथे

अपराध क्रमांक १९५/ २०२३ कलम ३०२ भादवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.

सदर गुन्हयाचे घटनास्थळीच मा. पोलीस अधीक्षक श्री. पवन बन्सोड यांनी तात्काळ पाच पथके गठीत करुन आरोपी निष्पन्न

करणे करीता रवाना केली होती. त्याच दरम्यान सकाळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास स्थानिक स्तरावरुन माहिती मीळाली की, मृतक

अविनाश कटरे याचे पाटापांगरा गावात वडीलोपार्जीत असलेल्या घराच्या जागेच्या हिस्सेवाटणीत आलेली जागा खाली करुन देण्याचे

कारणावरुन चुलत आजी नामे राधाबाई व तीचा मुलगा नामे विकास कटरे यांचे सोबत वाद असुन मृतक नामे अविनाश हनुमंत कटरे हा

दिनांक ०१/०५/२०२३ रोजी पाटापांगरा ता घाटंजी येथे मित्रासह गेला होता व त्या ठिकाणी आजी राधाबाई हिला धक्काबुक्की करुन वाद

घातला होता. अशी माहिती प्राप्त झाल्याने स्थागुशा कडील पथकाने पाटापांगरा येथे रवाना होवुन माहिती घेतली असता दिनांक

०१/०५/२०२३ रोजी दोघेही मृतक हे पाटापांगरा गावात आले होते व त्यांनी जागा खाली करुन देण्याचे कारणावरुन वाद घातला व धक्का

बुक्की केली व गावातुन यवतमाळ कडे निघुन गेले अशी माहिती प्राप्त झाली. तसेच विकास कटरे याचे बाबत माहिती घेतली असता

विकास हा कामानिमीत्याने यवतमाळ व गळवा या गावी गेल्याचे समजल्याने व संशयाची सुई हि विकास कडे जात असल्याने त्यास गळवा

ता. बाभुळगांव या गावातुन ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्याने सदरचा गुन्हा हा हिस्सेवाटणी मध्ये आलेली जागा खाली करुन

मागत असल्याचे कारणावरुन स्वतः व त्याचे दोन मित्रांचे मदतीने केल्याची कबुली दिल्याने गुन्हयात आरोपी नामे १) विकास लालचंद

कटरे वय २३ वर्षे रा. पाटापांगरा ता. घाटंजी २) भारत दिगांबर गाडेकर वय २२ वर्षे रा. मोहम्मदपुर ता. बाभुळगांव ३) गजानन रामराव

मोरे वय २५ वर्षे रा. मोहम्मदपुर ता. बाभुळगांव यांना ताब्यात घेण्यात आले असुन त्यांचे अटकेची कारवाई सुरु आहे.

सदरचा अत्यंत क्लिष्ट, गुंतागुंतीचा आव्हानात्मक गुन्हा १६ तासाचे आत उघडकीस आणला असुन सदरची कारवाई ही मा.

पोलीस अधीक्षक यवतमाळ डॉ. श्री. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक श्री. पियुष जगताप, यांचे मार्गदर्शनात श्री. प्रदिप पाटिल

उपविभागीय पोलीस अधिकारी, पांढरकवडा प्रभार यवतमाळ उपविभाग, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्री. विनायक कोते, दिनेश

बैसाने, श्री. प्रदीप परदेशी पो.नि. स्थागुशा, श्रीमती दिपमाला भेंडे पो.नि. लोहारा प्रभार ठाणेदार पो.स्टे. यवतमाळ ग्रामीण, श्री संजु खंडारे

ठाणेदार वडगांव जंगल, सपोनि विवेक देशमुख, पोउपनि राहुल गुहे, पोहवा साजीद सैयद, बंडु डांगे, अजय डोळे, रुपेश पाली, नापोशी

विनोद राठोड, निलेश राठोड, रितुराज मेडवे, पोशी धनंजय श्रीरामे, चालक अमीत कुमरे, जितेंद्र चौधरी सर्व स्थागुशा तसेच सायबर सेल

यांचे पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे.

 

ताज्या बातम्या

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन. 23 November, 2024

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.

...

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव. 23 November, 2024

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.

वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

यवतमाळ-जिल्हातील बातम्या

महायुती चे उमेदवार आ.बोदकुरवार यांना कुणबी समाजाचे युवा उभरता चेहरा महेश पहापळे यांचा पाठिंबा.

वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...

आतापर्यंत सगळ्याला आजमावले एकदा मनसेला संधी द्या- राजू उंबरकर

वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...