वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी)
यवतमाळ :- आदर्श शिक्षक व गुणवंत विद्यार्थी पुरस्कार मिळण्यासाठी मोठा संघर्ष व मेहनत असते. पुरस्कारप्राप्त शिक्षकांनी त्यांच्या कामातुन शाळेला एक ओळख मिळवून दिली आहे. यामुळे जिल्हा परिषद शाळेकडे पाहण्याचा पालकांचा, विद्यार्थ्यांचा आणि समाजाच्या दृष्टिकोनात बदल झाला आहे. म्हणुनच शिक्षकांचे कार्य कौतुकास्पद , अभिमानास्पद आणि अनुकरणीय आहे असे गौरवोद्गार जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी काढले.
आदर्श शिक्षक व गुणवंत विद्यार्थी पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात, जिल्हा समाजकल्याण अधिकारी पियुष चव्हाण, कार्यकारी अभियंता स्वच्छता व पाणीपुरवठा प्रतिक कोल्हे, शिक्षणाधिकारी प्राथमिक किशोर पागोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
निपुण भारत मध्ये शिक्षकांनी चांगले काम केल्याचे सांगत जिल्हाधिकारी म्हणाले की, ज्या शाळा गुणवत्तेत कमी पडत आहेत त्या शाळेत पुरस्कारप्राप्त शिक्षकांनी मार्गदर्शकाचे काम केले पाहिजे. शिक्षक हे एक चांगले करियर आहे.एक नविन पिढी, नवा समाज घडविण्याची सेवेची संधी आपल्याला मिळते. या संधीचा पुरेपार फायदा घेऊन, प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या क्षमतेनुसार सक्षम नागरिक होण्यासाठी प्रयत्न करीत रहावे.
पुरस्करामुळे आपली जबाबदारी वाढली असुन जिल्ह्यात एक चांगले शिक्षक म्हणुन आपली ओळख निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे राज्यात,देशात व जागतिक पातळीवर आपली दखल घेतली जाईल असे कार्य शिक्षकांनी करावे.
जिल्हा परिषद शाळा इतर शाळांपेक्षा कुठेही कमी नाहीत. उलट या शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्याच्या पालकांना विद्यार्थ्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज राहत नाही, इतकी तयारी शिक्षक विद्यार्थ्यंकडुन करून घेतात.
समाजाच्या सेवेसाठी आपल्याला उत्तम विद्यार्थी घडवायचे आहेत. त्याचबरोबर तालुक्याचे लिडर म्हणुनही आपण काम करावे. सर्व शाळांना सोबत घेऊन सर्व शाळा आपल्यासारखे काम करतील याची जबाबदारी आपण घ्यावी असेही जिल्हाधिकारी याप्रसंगी म्हणाले.
गुणवंत विद्यार्थी म्हणुन पुरस्कार मिळणे ही एक पायरी आहे. अशा अनेक पाय-या भविष्यात आपल्याला गाठायच्या आहेत.त्यासाठी उपस्थित गुणवंत विद्यार्थ्यांना श्री येडगे यांनी शुभेच्छा दिल्यात.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते आदर्श शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांना पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...
वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...