मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
Reg No. MH-36-0010493
.
सय्यद रहीम रजा
तालुका प्रतिनिधी उमरखेड
अनेक वर्षापासून ठिय्या मांडून बसलेल्या अधिकाऱ्याची तात्काळ बदली करा अन्यथा रा कॉ च्या वतीने आंदोलनाचा इशारा
उमरखेड प्रतिनिधी :
मागील एका वर्षापासून नगरपरिषद उमरखेड येथे प्रशासक लागू झाल्यानंतर शहराअंतर्गत प्रत्येक वार्डातील आरोग्य विषयक समस्या वाढलेल्या दिसत आहेत त्यामुळे न पा अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षपणामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका होत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मागील 6 ते 7 वर्षांपासून कार्यालयात ठाणं मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दि 17 एप्रिल रोजी मुख्याधिकारी यांना निवेदनातून देण्यात आला .
नगर परिषदेतील उदासीन धोरणामुळे शहरातील नाल्या ,घाण व कचऱ्याने तुंबलेले आहेत तुंबलेल्या नाल्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्याचे चित्र शहरात पहावयास मिळत आहेत .
प्रामुख्याने सांडपाण्याची नालीसफाई होत नसल्याने व डासांचे प्रमाण वाढलेले आहेत .प्रभाग क्रमांक 1 व 2 मधील शाईन नगर ,सेवादास कॉलनी ,साक्षी नगर , ढाणकी रोड येथील मजबूत बांधकाम केलेल्या नाल्या असून त्यातील गाळ उपसा केला जात नाही . मागील एक वर्षापासून प्रभागांमध्ये रस्ते झाडले जात नाही त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 10 ,11 व 12 मध्ये कचरा घंटागाडी येत नसून कचरा रस्त्यावर टाकण्याची वेळ जनते समोर येत आहेत .घनकचरा संकलन करणारे कामगार व ठेकेदार त्यांच्या कामाकडे लक्ष देत नसून सफाई कामगारांना वेळेचे बंधन राहिलेले नाही सफाई कामगारांना कामासाठी विनंती केली असता अरेरावी व उद्धटपणे बोलून काम न करता निघून जातात व तेथील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे
नगरपरिषद अंतर्गत कार्यरत असलेला संवर्ग चे अधिकारी मागील 5 ते 6 वर्षांपासून एकाच डागी ठाण मांडून बसले आहेत अशा अधिकाऱ्यांची बदली होणे आवश्यक आहे असे न झाल्यास भ्रष्टाचार होण्यास चालना मिळेल अशा अधिकारी येणाऱ्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षांच्या फायद्याचे अशु शकतात .तसेच नगरपरिषद मध्ये अधिकाऱ्यांचा राजकीय हस्तक्षेप वाढला असून एका विशिष्ट सत्ताधारी पक्षाच्या नेत्याच्या आदेशानुसार कार्यालयीन कामकाज चालू असल्याने सामान्य नागरिकांना अडचणी निर्माण होत असल्याचे निवेदनाद्वारे केली आहे .
सदर अधिकाऱ्याकडे अतिरिक्त विभागाचे अतिरिक्त प्रभार दिले असून या अधिकाऱ्याला आपल्या पदाचा दुरुपयोग करण्यास वाव मिळत आहे व कार्यालयात येणाऱ्या सामान्य जनतेला अरेरावी व शिवीगाळ करून गैरवर्तणूक देत असलेल्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करून व शहराच्या स्वच्छतेकडे गांभीर्याने लक्ष देऊन विशिष्ट संवर्ग अधिकाऱ्यांच्या बदली बाबत ताबडतोब कारवाई न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा न पा मुख्याधिकारी यांना निवेदनातून देण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष राजू भैया जयस्वाल , शहर अध्यक्ष युसुफ सौदागर ,जिल्हा सरचिटणीस दत्ता गंगासागर , युवक तालुका अध्यक्ष बबलू जाधव पाटील,सुभाष जाधव ,मिथिलेश जयस्वाल , साजीद जागीरदार,जाकीर राज , तलहा जाबाज ,संतोष सूर्यवंशी ,शेख इस्त्राईल ,रहमत जागीरदार ,सय्यद मुसासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...
सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...
*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी...
पाच टक्के दिव्यांग निधी नियमित मिळावा- गजानन वानखेडे सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड :शासनाच्या...
रुढी परंपरेला फाटा देत लावला शिवविवाह सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड येथे जिजाऊ सांस्कृतिक...
बाबासाहेबांनी भगवान बुद्धाचा धम्म देऊन या देश्यावर फार उपकार केले - प्रा.जोगेंद्र कवाडे ✒️ सय्यद रहीम रजातालुका...