*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न*
*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-भिमा...
Reg No. MH-36-0010493
आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी)
झरी जामनी: तालुक्यातील मुकुटबन येथील RCCPL / M.P बिर्ला सिमेंट कंपनीने भूमिहीन बेरोजगार यांना कायमस्वरूपी नौकरी न दिल्यास आमरण उपोषण करण्याचा शेतकऱ्यांनी इशारा दिला आहे.याबाबतेचे सदर निवेदन मा. जिल्हाधिकारी साहेब यवतमाळ यांना निवेदन देण्यात आले आहे. कंपनीने कायमस्वरूपी नौकरी न दिल्यास दि. १९ एप्रिल २०२३ ला. वेळ १०-३० वा.०० पासून आमरण
उपोषण करण्याची परवानगी संबंधित शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे मा जिल्हाधिकारी यवतमाळ यांना मागितली आहे.अविन विठ्ठल मुद्दमवार वय ३७,राजेश संतोष चिंतावार वय २१,दिलीप गजानन मुत्यलवार वय ३१,आणि किशोर राजेश मुद्दमवार वय २१ सर्व रा. मुकुटबन ही निवेदन देण्याच्या भूमिगत शेतकऱ्यांची नावे आहे.निवेदनाद्वारे या शेतकरी पुत्रांनी जिल्हाधिकारी यवतमाळ यांना कळविले आहे की,
हे शेतकरी मौजा मुकुटबन येथील रहिवाशी असून ते प्रकल्पग्रस्त शेतकर्याचे भूमिहीन पुत्र आहेत त्यांची वडीलोपार्जीत शेती मुकुटबन स्थित RCCPL कंपनी यांनीअधिग्रहित केलेली आहे,तेव्हा शासकीय नियमानुसार शेती अधीग्रहीत केलेल्या शेतकरी / बेरोजगारी भूमीपुत्रांना सदर सिमेंट कंपनी मध्ये कायम स्वरूपी नौकरी देण्याचे शासकीय तजवीज असताना सुद्धा या भूमिहीन बेरोजगार युवकांना भुलथाफा देऊन खाजगी कंत्राटदार यांचे मार्फत मागील एक ते दोन वर्षापासून कामाला ठेवलले आहे,पण हि बाब शासनाप्रति योग्य नाही.ते सर्व अर्जदार बांधव भूमिहीन असल्याने व नमूद कंपनी मध्ये कायम स्वरूपी नौकरी नसल्याने त्यांचे, व त्यांच्या कुटुंबीयावर उपासमारीची वेळ आलेली
आहे, हा एक प्रकारे या शेतकऱ्यांवर होत असलेला अन्यायच आहे. या सर्व अन्यायग्रस्त, प्रकल्प ग्रस्त भूमिहीन सुशिक्षित युवक बेरोजगाराने आयुष्य भर खाजगी कंत्राटदाराच्या अधीपत्याखाली काम करणे योग्य आहे का ? हा एक चिंताग्रस्त प्रश्ना आहे याबाबत
शेतकऱ्यांनी नमूद कंपनीस दि. ३/०४/२०२३रोजी निवेदन दिलेले आहे परंतु आज पावेतो नमूद कंपनीकडून
कोणत्याही प्रकारची दखल न घेता कोणता हि. न्यायमिळाला नाही आहे.तेंव्हा या सर्व अर्जदार शेतकऱ्यांनी दि. १९/०४/२०२३ रोजी सकाळी १० -३० वा. नमुंद RCCPL कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारा समोर सहकुटुंब आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-भिमा...
*तालुका कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष निलेश संगमवार भाजपात..* *आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये इनकमिंग...
*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...
*ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यासाठी Evm मशीन हटाव बाबत भारत बंद मधे केला निषेध* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी : वणी शहरातील व परिसरातील खास खव्ययांसाठी व्हेज -नॉनव्हेज पदार्थांची विशेष मेजवानी सह भरपूर वरायटी युक्त हॉटेल...
वणी :चांदा शिक्षण प्रसारक मंडळ,चंद्रपूर द्वारा संचालित जनता विद्यालय वणी . येथे आज दिनांक 30 डिसेंबर 2024 रोजी निरोप...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...