Home / यवतमाळ-जिल्हा / निमा यवतमाळ वुमेन्स...

यवतमाळ-जिल्हा

निमा यवतमाळ वुमेन्स विंग तर्फे निमा च्या ७६ व्या वर्धापनदिना निमित्त बापुजी अणे महिला महाविद्यालयात प्रबोधन कार्यक्रम सम्पन्न

निमा यवतमाळ वुमेन्स विंग तर्फे निमा च्या ७६ व्या वर्धापनदिना निमित्त  बापुजी अणे महिला महाविद्यालयात प्रबोधन कार्यक्रम  सम्पन्न
ads images
ads images
ads images

नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन शाखा यवतमाळ वुमेन्स विंग तर्फे कार्यक्रमाचे आयोजन

आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) 
यवतमाळ:नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन शाखा यवतमाळ वुमेन्स विंग तर्फे शनिवार दि. १५ एप्रिल २०२३ रोजी सकाळी १०:०० वा. स्थानिक लोकनायक बापूजी अणे महिला महाविद्याय, दत्त चौक, यवतमाळ येथे स्वास्थ्य संबंधित विविध विषयांवर परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन मा. डॉ दिनेश चांडक ( अध्यक्ष निमा यवतमाळ), डॉ आनंद बोरा (सचिव निमा यवतमाळ), डॉ अंजली गवार्ले( एक्सिक्युटिव निमा सदस्य, यवतमाळ), डॉ कविता बोरकर (महिला प्रतिनिधी निमा यवतमाळ), डॉ आदित्य अढाऊकर ( जिल्हा संपर्कप्रमुख निमा यवतमाळ), डॉ दुर्गेश कुंटे(प्राचार्य, बापूजी अणे महिला महाविद्यालय, यवतमाळ), डॉ सुधा खडके, इ. उपस्थित मान्यवरांचे हस्ते दिपप्रज्वलन आणि प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. 
सर्वप्रथम मा. डॉ दिनेश चांडक यांनी निमा संघटना म्हणजे काय? व संघटना उद्देश काय?  याबद्दल सविस्तर माहिती दिली. यानंतर डॉ आनंद बोरा यांनी सर्वांची दिनचर्या कशी असावी याचे आयुर्वेदानुसार मार्गदर्शन केले तसेच चुकीच्या दिनचर्येमुळे आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम कसा होतो याबद्दल सविस्तर माहिती दिली, डॉ अंजली गवार्ले यांनी मुलींना खरे सौंदर्य म्हणजे काय व आपले विचारच आपल्याला यशस्वी कसे करतात याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले, तसेच डॉ कविता बोरकर यांनी प्राणायाम, कपालभाती व योग्य प्रमाणात व्यायाम यांची सांगड घालून कसं निरोगी राहुन शारीरिक दौर्बल्य(ॲनिमिया) वर मात करु शकतो याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले, यानंतर डॉ आदित्य अढाऊकर यांनी  व्यसनाधीनता व व्यसनमुक्ती या विषयावर मार्गदर्शन करून चांगले व्यसन मनुष्याला कसे घडवते व वाईट व्यसन कसे बिघडवते याबद्दल वर्णन केले. यानंतर कार्यक्रमामध्ये डॉ अंजली गवार्ले यांना त्यांच्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य व यशस्वीतेबद्दल शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले, तसेच डॉ सुधा खडके यांना नुकताच सुषमा स्वराज पुरस्कार मिळाल्याबद्दल शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ सुधा खडके यांनी केले व आभारप्रदर्शन डॉ धर्माधिकारी मॅडम यांनी केले , यावेळी  महाविद्यालयाच्या २५० विद्यार्थीनींनी प्रबोधन कार्यक्रमाचा लाभ घेतला.

Advertisement

ताज्या बातम्या

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन. 23 November, 2024

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.

...

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव. 23 November, 2024

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.

वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

यवतमाळ-जिल्हातील बातम्या

महायुती चे उमेदवार आ.बोदकुरवार यांना कुणबी समाजाचे युवा उभरता चेहरा महेश पहापळे यांचा पाठिंबा.

वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...

आतापर्यंत सगळ्याला आजमावले एकदा मनसेला संधी द्या- राजू उंबरकर

वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...