मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
Reg No. MH-36-0010493
पोलीस भरतीत एका पेक्षा अधिक अर्ज करणाऱ्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करण्यात यावी
पुरोगामी युवा ब्रिगेड व पोलीस भरतीतील तरुणांची निवेदनामार्फत शासनाकडे मागणी
उमरखेड शहरात आंदोलनाचा इशारा
✍️सय्यद रहीम रजा
तालुका प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड :महाराष्ट्रात नुकतीच पोलीस मेगा भरती झाली असून यामध्ये शासनाने एक महत्वाचा शासन निर्णय घेतला होता, ज्यामध्ये असे असे म्हटले होते की एका उमेदवाराने एकाच ठिकाणी, एकाच जागेसाठी अर्ज करावे अन्यथा तुमचा अर्ज रद्द करण्यात येईल परंतु अनेक विद्यार्थ्यांनी आपला मोबाईल नंबर व ईमेल आयडी बदलून एकापेक्षा अधिक जागी फॉर्म भरल्याचे आढळून आले आहे. ज्यांनी शासनाच्या या निर्णयाचे पालन करून एका जागीच फॉर्म भरला अश्या उमेदवारांवर हा एक प्रकारे झालेला अन्यायच असून या विरोधात पुरोगामी युवा ब्रिगेड व उमरखेड शहरातील पोलीस भरती देणाऱ्या तरुणांनी निवेदन दिले असून एकापेक्षा अधिक फॉर्म भरणाऱ्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करण्यात यावी अशी मागणी निवेदनामार्फत करण्यात आली.
बऱ्याच वर्षानंतर महाराष्ट्र शासनाने मेगा भरती जाहीर केली होती. यामुळे पोलीस भरती देऊन पोलीस होण्याचे स्वप्न बघणाऱ्या युवकांमध्ये नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु शासनाने एक उमेदवार एक फॉर्म ही एक अट टाकली होती. परंतु अनेक विध्यार्थ्यानी याचे उल्लंघन करून दोन पेक्षा अधिक जागी फॉर्म भरूर शासनाच्या या निर्णयाला केराची टोपली दाखवली. यामुळे ज्यांनी इमानदारीने एकच फॉर्म भरला त्यांना शारीरिक चाचणीसाठी एकच संधी मिळाली होती. हा त्याच्यावर झालेला अन्याय असून येत्या काही दिवसात या संदर्भात शासनाने निर्णय नाही घेतल्यास उमरखेड शहरात आंदोलन करण्याचा इशारा पुरोगामी युवा ब्रिगेड व उमरखेड शहरात पोलीस भरती देणाऱ्या विद्यार्थ्यांनी दिला आहे.
यावेळी पुरोगामी युवा ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष शिवशंकर सुरोशे, तालुका अध्यक्ष सुनील लोखंडे, प्रवक्ता शाहरुख पठाण, अविनाश चंद्रवंशी, रुपेश टिंगरे, सत्यवान देशमुख, शकीब खान, अक्षय देशमुख, समाधान ठाकरे, सिद्धांत आडे, सौरभ राठोड, नितेश इंगोले, सुमेध खंदारे, विजय गवर,विजय शिंगणकर, कुणाल कदम, साईनाथ इंगळे, सागर शेटे, स्वप्निल सगणे, असलम शेख आदि उपस्थित होते.
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...
सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...
*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी...
पाच टक्के दिव्यांग निधी नियमित मिळावा- गजानन वानखेडे सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड :शासनाच्या...
रुढी परंपरेला फाटा देत लावला शिवविवाह सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड येथे जिजाऊ सांस्कृतिक...
बाबासाहेबांनी भगवान बुद्धाचा धम्म देऊन या देश्यावर फार उपकार केले - प्रा.जोगेंद्र कवाडे ✒️ सय्यद रहीम रजातालुका...