Home / यवतमाळ-जिल्हा / मारेगाव / पिकविमा मिळण्यासाठी...

यवतमाळ-जिल्हा    |    मारेगाव

पिकविमा मिळण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे आमरण उपोषणाचा इशारा ________________________ विमा कंपनीने ३३ % च रक्कम दिली

पिकविमा मिळण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे आमरण उपोषणाचा इशारा  ________________________  विमा कंपनीने ३३ % च रक्कम दिली

भारतीय वार्ता 

_________________________

ता प्र मारेगांव

     मागील  वर्षीच्या खरीप . हंगामातील पिकाचा विमा केन्द्र शासन व राज्य शासनाच्या हिश्यासह शेतकर्‍यांनी विमा कंपणी कडे काढला मात्र विमा कंपनीने शेतकर्‍याना ३३ % रक्कम काही शेतकर्याना अदा केली, शेतकऱ्याना शंभर टक्के विम्याची रक्कम मिळावी यासाठी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अजय धोबे यांनी शेतकऱ्या सह मारेगाव तहसिलदार यांना निवेदन देऊन येत्या १७ एप्रील पर्यंत उर्वरीत विम्याची रक्कम न मिळाल्यास मारेगांव येथे आमरण उपोषन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला .

     पंतप्रधान पिक विमा योजना २०२२ - २०२३ मध्ये मारेगांव तालुक्यातील शेतकऱ्यांनी शासनाच्या पिक संवर्धन योजनेत प्रशासनाच्या विश्वासावर अॅग्रीकल्चर विमा कंपणीकडे कृषी कर्जदार व गैरकर्जदार असे १७,६५४ शेतकर्‍यानी केंद्र सरकार व राज्य सरकारच्या हिश्यासह रु ६ कोटी  ८८ लाख ४४ हजार रुपयाचा कंपणीला पिक विमा हप्ता जमा केला, खरीप हंगामात जुलै ऑगष्ट सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात सततचा पाऊस व महापुराने शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले , त्या नुकसानीचे पंचनामे प्रशासना मार्फत  करण्यात आहे, प्रशासनाने ती माहिती शासनाला व विमा कंपणीला दिले असल्याची माहिती आहे , मात्र विमा कंपनीने काही शेतकऱ्याना केवळ  नुकसानीच्या ३३% रक्कम देऊन शेतकऱ्याची थट्टा केली शेतकरी व शासना कडून करोडो रुपये घेऊन गलेलट्ठ विमा कंपनी झाली. कायद्यानुसार विमा कंपणीसी निगडीत असलेल्या समितीचे अध्यक्ष तालुका स्तरावर तहसिल असताना पिक विमा न मिळाल्या बद्दल संभाजी ब्रिगेडने १५ मार्चला दिलेल्या  निवेदनाची कुठलीही दखल घेतली नसून संबंधीतानी दिलेल्या अर्जावर  नैसर्गीक आपत्ती तालुका प्रमुखाच्या नात्याने आमच्या झालेल्या  नुकसान तक्रारीची १ जुलै २०२२ शासन निर्णयानुसार  विमा कंपनी कृषी विभाग व महसुल मध्ये सुनवणी करून शेतकरी हित न जोपासने म्हणजे शासनाच्या धोरणाला विरोध करण्याचा प्रकार होय .

   शासन निर्णय क्र प्रपिविगो २०२२ प्र क्र ७२ / ११ अ दि १ जुलै २०२२ नुसार तालुक्याचा  तहसिलदार हा नैसर्गिक आपत्ती तालुका प्रमुख असल्याच शासन निर्णयात नमुद असताना शेतकर्‍याचे जेव्हा निवेदन तक्रारी स्थानिक पातळीवर दिल्या जाते त्याची दखल घेणे हे कर्तव्य आहे , काही शेतकऱ्याना  केवळ पिक विम्याची ३३ % नुकसान भरपाई देण्यात आली ६७ % नुकसान भरपाई मिळावी यासाठी संभाजी ब्रिगेड प्रशासनाला दि १७ एप्रिल पर्यंत शेतकऱ्याना पिक विमा न मिळाल्यास तहसील कार्यालया समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला, यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अजय धोबे , अनंत मांडवकर, अनामिक बोढे, प्रमोद लडके, कुंदन पारखी यांनी नायब तहसिलदार भगत यांना निवेदन सादर केले .

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

मारेगावतील बातम्या

बोरी (बु ) येथील 32 वर्षीय विवाहित युवकाने विहिरीत उडी टाकून केली आत्महत्या

मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे आयोजन*

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...