*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
Reg No. MH-36-0010493
(निष्क्रिय तालुका अधिकाऱ्याची उचल बांगडी जिल्हा आरोग्य अधिकारी करतील काय)
सय्यद रहीम रजा
तालुका प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड:ग्रामीण भागातील जनतेला मोफत व दर्जेदार आरोग्यसेवा वेळेवर मिळावी म्हणून शासनाकडून मोठा खटाटोप चालविल्या जात आहे तर दुसरीकडे ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्याची नाडी हातात असलेला आरोग्य विभाग मात्र या बाबीला फारसे गांभीर्याने घेत नसल्याचे वास्तव पुढे येत आहे एकीकडे संबंध महाराष्ट्रभर कोरोना महामारीने डोके वर काढले असतानाच उमरखेड तालुक्याचा सरकारी आरोग्य विभाग मात्र सुस्त असल्याचे दिसत आहे सध्या वातावरणातील बदलामुळे सर्दी ताप खोकला या आजाराने ग्रामीण भागात थैमान घातल्याचे दिसत आहे गावात किंवा गावाजवळ असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेण्यासाठी ग्रामीण जनतेला सहज आणि सोपे होते परंतु प्राथमिक आरोग्य केंद्र व त्या अंतर्गत येणारी उपकेंद्रे नावालाच आहेत की काय? हा सवाल आता उपस्थित होऊ लागला असून ग्रामीण भागात कार्यरत असणारी आरोग्य सेवक मंडळी कुठे आहे व त्यांना कोणते काम सोपविले आहे याचा थांग पत्ताच असल्याचे दिसत नाही प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कार्यरत वैद्यकीय अधिकारी मुख्यालयी राहत नाहीत आणि तीच अवस्था त्या अंतर्गत येणाऱ्या उपकेंद्राची असून सी एच ओ सुद्धा मुख्यालयी न राहता अधून मधूनच उपकेंद्रामध्ये हजेरी लावत असल्याचे निदर्शनास येत असून यामुळे ग्रामीण जनतेने सरकारी आरोग्य व्यवस्थेकडे पाठ फिरविल्याचे दिसत असून यापूर्वी उमरखेड तालुक्यातील विडुळ प्राथमिक आरोग्य केंद्राचा गलथानपणा राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनात गाजला होता त्यात दोषी असलेल्या कर्मचाऱ्यावर निलंबनाची कार्यवाही देखील झाली होती परंतु या सर्व बाबीशी जबाबदार असलेल्या तालुका आरोग्य अधिकाऱ्याला मात्र यातून सही सलामत बाहेर काढण्यात आले वास्तविक पाहता तालुका आरोग्य अधिकाऱ्याच्या अधिनिष्ठ येणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रात बेजबाबदार व रामभरोसे कारभार चालत असेल तर त्यावर नियंत्रण ठेवून काम चुकार कर्मचाऱ्यावर कार्यवाहीचा बडगा उगारण्याचा अधिकार तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना असताना देखील त्यांनी येथे कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्याला व कर्मचाऱ्याला अभय दिले होते मग तालुका आरोग्य अधिकारी का कार्यवाही नाही असा सवाल आता सामान्यातून उपस्थित होत असल्याचे दिसत आहे एकीकडे शासन सरकारी आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी उपलब्ध करून देत आहे तर दुसरीकडे शासनाचा गडगंज पगार घेऊन आपल्या कर्तव्यात सर्रास बेईमानी करून आरोग्य व्यवस्थे सारख्या पूर्ण बाबीला गांभीर्याने न घेणाऱ्या येथील तालुका आरोग्य अधिकाऱ्याची तात्काळ उचल बांगडी करून उमरखेड तालुक्यातील ढेपाळलेली आरोग्य व्यवस्था पुन्हा तात्काळ सुदृढ करावी अशी मागणी जोर धरत आहे
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...
सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...
पाच टक्के दिव्यांग निधी नियमित मिळावा- गजानन वानखेडे सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड :शासनाच्या...
रुढी परंपरेला फाटा देत लावला शिवविवाह सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड येथे जिजाऊ सांस्कृतिक...
बाबासाहेबांनी भगवान बुद्धाचा धम्म देऊन या देश्यावर फार उपकार केले - प्रा.जोगेंद्र कवाडे ✒️ सय्यद रहीम रजातालुका...