Home / यवतमाळ-जिल्हा / मारेगाव / बेंबळा कॅनल फुटून कॅनलचे...

यवतमाळ-जिल्हा    |    मारेगाव

बेंबळा कॅनल फुटून कॅनलचे पाणी शेतात शिरल्याने बोरी गदाजी येथील शेतकऱ्यांच्या शेतात पडला अर्धा एकर चा गड्डा

बेंबळा कॅनल फुटून कॅनलचे पाणी शेतात शिरल्याने बोरी गदाजी येथील शेतकऱ्यांच्या शेतात पडला अर्धा एकर चा गड्डा

हुसेन करडे यांच्या शेताचे मोठया प्रमाणात नुकसान, शेताची दुरुस्ती करून देण्याची मागणी,वारंवार पाठपुरावा करूनही बेंबळा कालवे विभाग यवतमाळ चे दुर्लक्ष

आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी)
मारेगाव: तालुक्यातील बोरी (गदाजी) येथील हुसेन रामा करडे   यांच्या नावे शेत गट न 44 नुसार 1 हेक्टर 6 आर एवढी शेतजमिन आहे.मागील वर्षी म्हणजे 2022 च्या जुलै ऑगस्ट  महिन्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे बेंबळा कॅनल पूर्ण भरला होता. यामध्ये शेता शेजारील बेंबळा कॅनल फुटून या कॅनलचे पाणी करडे यांच्या शेतात शिरल्याने  शेतात अंदाजे अर्धा एकरचा अंदाचे 12 फूट खोल गड्डा पडला आहे.यात हुसेन करडे यांच्या शेताचे आणि स्वतः त्यांचे खुप नुकसान झाले आहे. शेतात पिकवलेला शेतमाल यात नष्ट झाला आणि खूप मोठा गड्डा पडल्यामुळे भविष्यात या जमिनीवर हुसेन करडे शेती करू शकनार नाही. या सम्पूर्ण नुकसानीसाठी बेंबळा विभाग जबाबदार असून त्यांनी हुसेन करडे यांच्या शेताची माती आणि मुरूम टाकून दुरुस्ती करून द्यावी ही हुसेन करडे या शेतकऱ्यांची  मागणी आहे.या मागणीसाठी हुसेन करडे 13 डिसेंबर 2022 रोजी मा साहाय्यक अभियंता श्रेणी 1 बेंबळा कालवे विभाग क्रमांक 3 यांना भेटून याबाबतचे निवेदन दिले असता त्यांनी कुठलीच कारवाई केली नाही.त्यानंतर पुन्हा 2 मार्च 2023 रोजी मा सहायक अभियंता बेंबळा कालवे विभाग यवतमाळ यांना भेटून निवेदन दिले असता आजपर्यंत कुठली कारवाई झाली नाही.दोन वेळा हुसेन करडे यांनी बेंबळा कालवे विभाग यवतमाळ यांना निवेदन दिले परंतु शासनाने हुसेन करडे यांच्या शेताची कुठल्याही प्रकारची दुरुस्ती करून दिली नाही त्यामुळे संबंधित शेतकरी हताश झाला आहे त्यामुळे शेवटी त्यांनी मीडियाच्या माध्यमातून शासनाला विनंती वजा इशारा दिला आहे.  जर त्यांच्या शेताची लवकरात लवकर म्हणजे शेती हंगाम सुरू होण्यापूर्वी योग्य दुरुस्ती करून दिली नाही तर संबंधित शेतकरी संबंधित विभागाच्या विरोधात आंदोलन उभं करील असा शासनाला इशारा दिला आहे.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

मारेगावतील बातम्या

बोरी (बु ) येथील 32 वर्षीय विवाहित युवकाने विहिरीत उडी टाकून केली आत्महत्या

मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे आयोजन*

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...