Home / यवतमाळ-जिल्हा / उमरखेड / डॉ .अनिल काळबांडे राष्ट्रीय...

यवतमाळ-जिल्हा    |    उमरखेड

डॉ .अनिल काळबांडे राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार सन्मानीत

डॉ .अनिल काळबांडे  राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार सन्मानीत
ads images

डॉ .अनिल काळबांडे  राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार सन्मानीत  

 

 

✍️सय्यद रहीम रजा

तालुका उमरखेड प्रतिनिधी

 

 

उमरखेड:- उमरखेड  परिसरातील मिलिंद महाविद्यालय मुळावाचे मराठी विभाग प्रमुख ,जागतिक साहित्यिक तथा पत्रकार डॉ .अनिल काळबांडे यांना जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ नागपूरच्या वतीने पत्रकार क्षेत्रातील सामाजिक लिखाणाबद्दलडॉ .बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार ने अखील भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष तथा प्रख्यात साहित्यिक डॉ . श्रीपाल सबनीस , पुणे यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह , प्रमाणपत देऊन नागपूर येथील मधूरन सभागृहात त्यांनासन्मानीत  करण्यात आले . या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी  महामंडळाचे अध्यक्ष प्रा.  डॉ .    दीपककुमार खोब्रागडे हे होते तर या वेळी साहित्यिक के .पी . वासनिक ( दिल्ली )महेश चौगुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर मिशन प्रमुख (बेळगाव ,कर्नाटक ) समाजशास्त्रांचे अभ्यासक डॉ . जगन कराडे (कोल्हापूर ) मधुकर वानखेडे , विचारवंत (दिल्ली )  डॉ अनिल सुर्या , डॉ यशवत खडसे, डॉ दादाराव इंगळे, अनिल मनोहर , शालीक जिल्हेकर इ.या मान्यवरांच्य उपस्थितीत स्मृतीचिन्ह , प्रमाणपत्र , शाल देऊन पुरस्कार देण्यात आला. जागतीक आंबेडकरी साहित्य महामंडळाचा ९ वा वर्धापण दिनाचे औचित्य साधून पुरस्कार वितरण , ग्रंथ प्रकाशन , सत्कार सोहळा व राष्ट्रीय कवी संमेलनाचे ही आयोजन या वेळी करण्यात आले आहे .   या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अँड . भूपेश पाटील यांनी तर भूमिका डॉ रविंद्र तिरपुडे यांनी मांडल तर सुत्रसंचालन कल्याण श्रावती यांनी तर आभार सुजितकुमार मुरमाडे यांनी मानले .              डॉ . काळबांडे यांनी, मराठी भाषेचा जगभर प्रचार आणि प्रसार व्हावा या हेतूने साहित्य संमेलनाच्या माध्यमातून जवळपास दहा देशाचा प्रवास केला असून गेल्या पंधरा वर्षापासून पत्रकारितेच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसांना न्याय देण्याची तथा त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी आपली लेखणी झिजवली त्यामुळे त्यांना समाजशील पत्रकार म्हणून त्यांना संबोधल्या जाते . या अगोदर सुद्धा त्यांना प्रा . राजा ढाले वैचारिक लेखन पुरस्कार , मलेशिया येथे नुकताच डॉ .बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार ,प्रबुद्ध भारत साहित्यरत्न पुरस्कार ,महाकवी वामनदादा कर्डक उत्कृष्ट वांग्मय निर्मिती पुरस्कार , डॉ . बी . आर . आंबेडकर एक्सलन्स इंटरनॅशनल अवार्ड नवी दिल्ली , डॉ .बाबासाहेब आंबेडकर जीवन गौरव पुरस्कार यासह अनेक पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला .पत्रकारिता क्षेत्रातील पुरस्कार मिळाल्याबद्दल पत्रकार संघाचे अविनाश खंदारे, संतोष मुडे,दत्ताभाऊ काळे , अशोक गांजेगावकर , राजाभाऊ गांजेगावकर ,विजय आडे, संतोष कलाने , दत्तात्रय देशमुख , राजू गायकवाड, निळकंठ धोबे, प्रशांत भागवत, अरविंद ओझलवार , अझरउल्ला खान , भीमराव नगारे , शाहरुख पठाण, साहेबराव धात्रक, अरुण बेले , लक्ष्यीकांत नंदनवार ,यासह अनेक पत्रकारांनी त्यांचे अभिनंदन केले .

ताज्या बातम्या

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* 27 December, 2024

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई. 26 December, 2024

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई.

वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव 26 December, 2024

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* 26 December, 2024

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी. 26 December, 2024

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी.

वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...

उमरखेडतील बातम्या

पाच टक्के दिव्यांग निधी नियमित मिळावा गजानन वानखेडे

पाच टक्के दिव्यांग निधी नियमित मिळावा- गजानन वानखेडे सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड :शासनाच्या...

रुढी परंपरेला फाटा देत लावला शिवविवाह

रुढी परंपरेला फाटा देत लावला शिवविवाह सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड येथे जिजाऊ सांस्कृतिक...

बाबासाहेबांनी भगवान बुद्धाचा धम्म देऊन या देश्यावर फार उपकार केले - प्रा.जोगेंद्र कवाडे

बाबासाहेबांनी भगवान बुद्धाचा धम्म देऊन या देश्यावर फार उपकार केले - प्रा.जोगेंद्र कवाडे ✒️ सय्यद रहीम रजातालुका...