*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
Reg No. MH-36-0010493
भारतीय वार्ता
सय्यद रहीम रजा
तालुका प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड तालुक्यातील कैलासनगर बेलखेड येथील पोटच्या मुलाने आपल्या वडिलांचा खून केल्याची धक्कादायक घटना दि 21 मार्च रोजी रात्री 8.30 च्या दरम्यान घडली आहे .
उमरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कैलासनगर बेलखेड येथील रहिवासी संजय तुकाराम राठोड वय 45 वर्ष यांची पोटच्या मुलानेच घरगुती वादातून सुरीने मानेवर वार करून गंभीररित्या जखमी केल्याची घटना दि 21 मार्च रात्री राहत्या घरी घडली .
मिळालेल्या माहितीनुसार संजय तुकाराम राठोड यांचा मुलगा राहुल संजय राठोड वय 25 वर्ष यांनी आपण मला मोटरसायकल चालवायला का देत नाही म्हणून या शुल्लक कारणावरून मी तुमचा पोटचा मुलगा नाही आहे का ? तुम्ही माझ्यावर प्रेम करत नाही लहान् मुलगा अतुल यांच्यावरच तुम्ही खूप प्रेम करता व त्यालाच मोटर सायकल चालवायला देता या शुल्लक कारणावरून वाद विवाद निर्माण झाल्याने मुलगा राहुल यांनी रागाच्या भरात घरातील भाजी कापण्याचे ( सुरी ) अवजाराने वडिलांच्या मानेवर वार केल्याने वडील संजय राठोड गंभीररित्या जखमी झाले . रक्तबंबाळ संजय राठोड यास त्या क्षणी काही गावकऱ्यांच्या सहकार्याने व नातेवाईकांच्या सहकार्याने तातडीने शासकीय उपजिल्हा रुग्णालय उमरखेड येथे भरती करण्यात आले पण उपचारादरम्यान संजय तुकाराम राठोड यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले .
घटनेची तक्रार फिर्यादी मूर्तकाची पत्नी आशाबाई संजय राठोड यांनी उमरखेड पोलीस स्टेशनला दिली मारेकरी मुलास अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला . प्राथमिक तपास उप पोलीस निरीक्षक शिवाजी टिपुर्णे यांनी केला तर पुढील तपास पोलीस अधीक्षक पवन बनसोड .
उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी ,पोलीस निरीक्षक अमोल माळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास एपीआय प्रशांत देशमुख करीत आहे . .
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...
सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...
पाच टक्के दिव्यांग निधी नियमित मिळावा- गजानन वानखेडे सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड :शासनाच्या...
रुढी परंपरेला फाटा देत लावला शिवविवाह सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड येथे जिजाऊ सांस्कृतिक...
बाबासाहेबांनी भगवान बुद्धाचा धम्म देऊन या देश्यावर फार उपकार केले - प्रा.जोगेंद्र कवाडे ✒️ सय्यद रहीम रजातालुका...