आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी)
मारेगाव: तालुक्यातील सुप्रसिद्ध असलेल्या बोरी गदाजी गावात येथील युवकांनी आज गुडीपाडवा या सणानिमित्त परंपरागत गुढीला बगल देत नवसृजनाची -नव संकल्पाची -स्वाभिमानाची परिवर्तनवादी पुस्तकांची ज्ञानगुढी उभारून गुडीपाडवा हा हिंदू वर्षातील पहिला सण परिवर्तनवादी पुरोगामी पाऊल टाकून साजरा केला.युवकांनी स्वतःच्या ताकदीतुन निर्माण केलेल्या डॉ ए पी जे अब्दुल कलाम सार्वजनिक वाचनालय बोरी ( गदाजी ) येथे हा परिवर्तनवादी सोहळा पार पडला.एकीकडे गावातील नवयुवक,दारू,खर्रा, मटका इत्यादी व्यसनाच्या आहारी गेला असताना शुभम चौधरी, राहुल खंडाळकर, आकाश साबरे सारख्या युवकांनी ज्ञानगुढी उभारून गावातच नव्हे तर देशात एक नवीन परिवर्तनवादी पायंडा यानिमित्ताने घालून दिला.
"आज राष्ट्रमाता जिजाऊ यांचे संस्कार व सावित्रीमाई फुले यांची शैक्षणिक क्रांती, राष्टमाता अहिल्यादेवी चा जाज्वल्य स्वाभिमान तसेच राष्ट्रप्रेरणा, आणि रमाईची सोशिकता घेऊन अडचणींवर मात करणारी , अंधश्रद्धेला बळी न पडता आजची मातृशक्ती वैचारिक दृष्टीने मन मेंदू सशक्त असणारी नवी पिढी घडवीत आहे."
आजच्या बेटी बचाव बेटी पढाव च्या काळात महिला गुढी म्हणून उंच काठीवर साडी -चोळी बांधने अपमान समजतात. तर पुरुष गुढीला साडी चोळी बांधणे ( घरातील लाज म्हणून) योग्य समजत नसून जरीचा शेला किंवा एक पाती भगवा बांधून गुडी साजरी करणे पसंत करतात. परंतु गुढीवर ठेवलेला उलटा कलश हा हिंदू संस्कृतीत कुठेही बसत नाही बहुजनांच्या या मंगल सणाला अमंगल करण्याचे हे सनातनी षडयंत्र असल्याने तसेच छत्रपती संभाजी राजांच्या भाल्याच्या टोकावर फिरवलेल्या मस्तकाची जीव पिळवटून टाकणारी आठवण करून देत असल्याने ...गुढीवर उलटा कलश ठेवणे म्हणजे गुढीचे पावित्र कलंकित केल्यासारखे होत असल्याने ते टाळणेच योग्य होईल.
या सर्व विचारांती या युवकांनी उभारलेली ज्ञानगुढी समाजातील युवकांना ज्ञान प्राप्त करण्यासाठी आणि जीवनात उच्च ध्येय गाठून ते साध्य करण्यासाठी प्रेरणा देईल यात तिळमात्र ही शंका नाही.युवकांच्या या परिवर्तनवादी कार्यास सलाम.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...
मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...
*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...