वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी)
यवतमाळ, दि २१ मार्च:- जिल्ह्यातील उमरखेड, पुसद, दिग्रस या तालुक्यात
17 व 18 व 19 मार्च रोजी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आज जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी उमरखेड तालुक्यातील नुकसान झालेल्या शेतांची पाहणी करुन शेतकऱ्यांना धीर देत काळजी न करण्याचे आवाहन केले.
यावेळी तहसिलदार व उपविभागीय अधिकारी आनंद देऊळगावकर, कृषी सहाय्यक व तलाठी सोबत होते. तलाठी व कृषी सहाय्यकांनी 30 टक्के पंचनामे पूर्ण केले असून पुढील 70 टक्के पंचनामे दोन दिवसात पूर्ण करावेत आणि अहवाल तातडीने सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्यात. अहवाल प्राप्त होताच शासनाकडे नुकसान भरपाईसाठी प्रस्ताव पाठवण्यात येईल असे जिल्हाधिकारी यांनी शेतकऱ्यांना यावेळी सांगितले.
गहू, ज्वारी व आंबा या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्हाधिकारी यांनी उमरखेड तालुक्यातील कुपटी गावातील श्यामराव ग्यानबाराव मोरे, नागपुर पळशी गावातील पवन गणेशराव देशमुख तसेच चुरमुरा येथील सुंदलाबाई मोतिराम जाधव यांच्या शेतातील नुकसान झालेल्या गहु पिकाची पाहणी केली. तर अमनपुर येथील अशोक शिवराम वानखडे यांच्या शेतातील आंबा व पेरु पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, त्याच्या शेतातही जिल्हाधिकारी यांनी पाहणी केली आणि शेतक-यांना धीर दिला.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...
वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...