Home / यवतमाळ-जिल्हा / १८ ते २२ मार्च दरम्यान...

यवतमाळ-जिल्हा

१८ ते २२ मार्च दरम्यान कृषी महोत्सवाचे आयोजन पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते होणार उद्घाटन

१८ ते २२ मार्च दरम्यान कृषी महोत्सवाचे आयोजन पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते होणार उद्घाटन
ads images
ads images
ads images

नागरिकांनी व शेतक-यांनी लाभ घेण्याचे जिल्हाधिका-यांचे आवाहन

आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी)
यवतमाळ, दि १७ मार्च :- शेतकऱ्यांचा कृषी माल थेट ग्राहकांपर्यंत पोहचविण्यासाठी  तसेच नवीन कृषी तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी १८ ते २२ मार्च दरम्यान कृषी महोत्सवाचे आयोजन यवतमाळ येथील समता मैदान येथे करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन उद्या १८ मार्चला अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते दुपारी १ वाजता होणार आहे.

Advertisement

या महोत्सवात १९ मार्चला कापूस पिकावरील कीड व्यवस्थापन, केंद्रीय कापूस अनुसंधान संस्था नागपूरच्या वतीने कृषी किर्तन, कृषी व्यवसायासाठी ड्रोन म्हणजे वरदान, आदर्श गाव संकल्पना, पौष्टिक तृणधान्य रांगोळी स्पर्धा तसेच सायंकाळी ७ वाजता मिर्झा रफी बेग यांचा धमाल विनोदी कार्यक्रम मिर्झा एक्सप्रेस राहणार आहे.

२० मार्चला सेंद्रिय शेती प्रमाणीकरण, रेशीम शेती, एकात्मिक पीक पद्धती, जमीन आरोग्य व्यवस्थापन, जैविक औषधीचे महत्व, अन्न प्रक्रियेचे महत्त्व व पौष्टिक अन्नधान्य पाककला स्पर्धा, तसेच सायंकाळी  ७ वाजता संदीप पाल महाराज यांचे सप्त खंजिरी भजन राहणार आहे. 

२१ मार्चला सेंद्रिय शेती, अमृत पॅटर्न , बीबीएफ तंत्रज्ञान, गटशेती व फळबाग लागवड  तसेच स्मार्ट कॉटन प्रकल्प, स्मार्ट प्रकल्प खरेदीदार विक्रेता संमेलन,  शेतकरी उत्पादक कंपनी स्थापना व केंद्र व राज्य योजना, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग खरेदी -विक्रेता संमेलन इत्यादी विषयांवर कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

२२ मार्चला गुढीपाडव्यानिमित्त सकाळी चैत्र पहाट संगीत कार्यक्रमाचे आयोजन तसेच समता मैदानावर गुढी उभारण्यात येईल. त्यानंतर बांबू तंत्रज्ञान, एकात्मिक पीक पद्धती व शेतीपूरक व्यवसाय, स्वयंसहायता बचत गट व व्यवसाय, प्रगतिशील शेतकरी व शास्त्रज्ञ यांचा परिसंवाद, संरक्षित शेती व भाजीपाला लागवड तंत्रज्ञान, मधुमक्षिका पालन व हवामान बदल याबाबत तज्ञ व्यक्तिंचे मार्गदर्शन होणार आहे.

याशिवाय पशु पक्षीप्रदर्शनी, रोजगार मेळावा, महिला बचत गट व शेतक-यांची उत्पादने सेंद्रिय शेती माल आणि पौष्टिक तृणधान्य विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि शेतक-यांनी या कृषी महोत्सावात हजेरी लावावी असे आवहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन. 23 November, 2024

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.

...

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव. 23 November, 2024

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.

वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

यवतमाळ-जिल्हातील बातम्या

महायुती चे उमेदवार आ.बोदकुरवार यांना कुणबी समाजाचे युवा उभरता चेहरा महेश पहापळे यांचा पाठिंबा.

वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...

आतापर्यंत सगळ्याला आजमावले एकदा मनसेला संधी द्या- राजू उंबरकर

वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...