Home / यवतमाळ-जिल्हा / झरी-जामणी / श्रीमंत सुभेदार होळकर...

यवतमाळ-जिल्हा    |    झरी-जामणी

श्रीमंत सुभेदार होळकर शाहीचे संस्थापक मल्हारराव होळकर यांची जयंती अडेगाव येथे हर्षोल्हासात साजरी

श्रीमंत सुभेदार होळकर शाहीचे संस्थापक मल्हारराव होळकर यांची जयंती अडेगाव येथे हर्षोल्हासात साजरी
ads images

जयंती निमित्त अडेगाव येथील मल्हारराव होळकर चौक येळकोट येळकोट जयमल्हार च्या घोषणेने दुमदुमला........

आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी)                                        

 झरी :दि. १६ मार्च २०२३ रोजी श्रीमंत सुभेदार होळकर शाहीचे संस्थापक शूर योद्धा मल्हारराव होळकर यांची जयंती अडेगाव येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.मल्हारराव होळकरांनी एका छोट्या सैन्यात दाखल होऊन आपल्या कार्य कर्तृत्वाच्या जोरावर आपली चुणूक दाखवून दिली, याचाच प्रत्यय म्हणून की रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी मल्हारराव होळकर यांना उत्तर भारताची मोहीम सोपवून मल्हारराव होळकरांच्या कार्याचा गौरव केला. याच बळावर मल्हार रावांनी स्व: बळावर होळकर शाहीची स्थापना करून तळागाळातील जनतेला सन्मान दिला, अनेक लढाया जिंकल्या , त्यात पानिपत युद्ध हे महत्त्वाचे ठरले . स्वराज्य स्थापन करून स्नुषा अहिल्या देवी होळकर यांच्या खांद्यावर होळकर शहीची पताका दिली. हेच मल्हारराव होळकर यांचं आदर्शवत महान कार्य आहे.       
सर्व प्रथम सर्व समाज बांधवांच्या वतीने मल्हारराव होळकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला,प्रतिमा पूजन यावेळी करण्यात आले, सर्वजण एकत्र येऊन अभिवादन केले व युवा व्याख्याते उज्वल बोधे यांच्या तडफदार वानीने उपस्थितांचे लक्ष वेधले, बोधे यांचं भाषण ऐकण्यासाठी सर्व जण आतूरच असते , श्रोत्यांसमोर एक पर्वणीच असते. यानंतर कार्यक्रमाची सांगता अल्पोहाराणे करण्यात आले . येळकोट येळकोट जयमल्हार च्या घोषणेने सम्पूर्ण परिसर दुमदुमला, यावेळी अनेक महान पुरुषांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाला उपस्थितांमध्ये प्रामुख्याने महाराजा यशवंतराव होळकर युवा मंच तथा महाराणी पुण्य श्लोक अहिल्या देवी होळकर महिला जन्मोत्सव समिती अडेगाव हे प्रामुख्याने उपस्थित होते , या कार्यक्रमासाठी महिला भगिनी व युवा पिढीने या कार्यक्रमासाठी कठोर परिश्रम घेतले, हा कार्यक्रम पुढे , पुढेअसाच यापेक्ष्याही भारी चालत राहावं, व या कार्यक्रमातून येणाऱ्या नव्या पिढीला आपल्या समाजा विषयी आस्था निर्माण व्हावी, व आपल्या धनगर समाजातील कर्तृत्ववान महापुरुष कोण होते, हे येणाऱ्या नव्या पिढीला माहीत होते, त्यांच्या विचारांचा प्रभाव आपल्यावर पडतो व त्यातून सजग पिढी निर्माण होईल, हेच जयंती व पुण्यतिथी कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश आहे, अश्या तऱ्हेने कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडला यावेळी आयोजकांनी सर्वांचे मनस्वी आभार मानले.

ताज्या बातम्या

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* 01 January, 2025

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न*

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-भिमा...

*तालुका कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष निलेश संगमवार भाजपात..*    *आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये इनकमिंग जोरात 01 January, 2025

*तालुका कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष निलेश संगमवार भाजपात..* *आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये इनकमिंग जोरात

*तालुका कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष निलेश संगमवार भाजपात..* *आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये इनकमिंग...

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* 01 January, 2025

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर*

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...

*ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यासाठी Evm मशीन हटाव बाबत भारत बंद मधे केला निषेध* 31 December, 2024

*ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यासाठी Evm मशीन हटाव बाबत भारत बंद मधे केला निषेध*

*ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यासाठी Evm मशीन हटाव बाबत भारत बंद मधे केला निषेध* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

वणी शहरातील हॉटेल आपला राजवाडा 31 डिसेंबर च्या आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज. 31 December, 2024

वणी शहरातील हॉटेल आपला राजवाडा 31 डिसेंबर च्या आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज.

वणी : वणी शहरातील व परिसरातील खास खव्ययांसाठी व्हेज -नॉनव्हेज पदार्थांची विशेष मेजवानी सह भरपूर वरायटी युक्त हॉटेल...

जनता विद्यालय वणी येथील शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा निरोप व सत्कार समारंभ संपन्न 31 December, 2024

जनता विद्यालय वणी येथील शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा निरोप व सत्कार समारंभ संपन्न

वणी :चांदा शिक्षण प्रसारक मंडळ,चंद्रपूर द्वारा संचालित जनता विद्यालय वणी . येथे आज दिनांक 30 डिसेंबर 2024 रोजी निरोप...

झरी-जामणीतील बातम्या

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

रान डुकरांचा हैदोस, मुकुटबन येथील शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान

झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...