*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
Reg No. MH-36-0010493
सय्यद रहीम रजा
तालुका प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड येथील आदिवासी मुलींचे शासकीय वस्तीगृहात अनेक दिवसापासून निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत असल्याने अखेरीस दिनांक १४,१५ मार्च २३ रोजी वस्तीगृहातील सर्वच मुलींनी जेवणावर बहिष्कार टाकला होता .
उमरखेड येथील आदिवासी मुलीचे शासकीय वसतिगृह येथील मुलीच्या तक्रारीनुसार महिन्याच्या सुरुवातीला जेवणाची सुविधा व्यवस्थितपणे केली जाते. परंतु त्यानंतर महिना अखेर जेवण्याचा दर्जा खूपच निकृष्ट असतो. शासनाने ठरवून दिलेल्या सुची प्रमाणे जेवणाची व्यवस्था नीटपणे राबवली जात नाही. अशा प्रकारची तक्रार आम्ही गृहपाल कडे वारंवार तोंडी व लेखी स्वरूपात केली. परंतु तक्रारीनंतर काही दिवस जेवण व्यवस्थित मिळते. आणि प्रत्येक महिन्याच्या अखेरी अखेरीस जेवणाचा दर्जा पुन्हा खालावतो. असे वारंवार घडत असल्याने अखेरीस आम्ही सर्व मुलींनी जेवणावर बहिष्कार टाकला.
शासन आदिवासी समाज व समाजातील मुला मुलींना उच्च शिक्षण मिळावे यासाठी वस्तीगृहाची निर्मिती केली.आणी या वस्तीगृहावर वर्षाला करोडो रुपये खर्च केले जाते. जेणेकरून आदिवासी मुली मुलांना सर्व सुविधा मीळाव्यात. परंतु ज्यांच्या मार्फत या योजना राबविल्या जातात, ती व्यक्ती शासनाने ठरवून दिलेल्या निर्देशानुसार वागत नसून त्यामध्ये हलगर्जीपणा करत असल्याचे निदर्शनात येते. यावर वस्तीगृहातील गृहपाल व तसेच एकात्मिक प्रकल्प कार्यालय यांचेवर व्यवस्थापनाची जबाबदारी असते. परंतु कोणत्याही प्रकारची व्यवस्थापनाची जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडली जात नसल्याने असे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यामुळे उच्च स्वप्न पाहणाऱ्या आदिवासी मुला मुलींचे अशा घटनांमुळे खच्चीकरण होत आहे.
उमरखेड येथील आदिवासी मुलीचे शासकीय वसतिगृहातील मुलींनी काही दिवसांपासून आम्हाला अतिशय निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत असल्याची तक्रार देऊनही जेवणात कोणताही बदल झाला नाही. यासाठी आम्ही दिनांक १४ मार्च २३ व १५ मार्च २३ रोजी जेवण घेतले नाही. तरी आमच्या जेवणाच्या ज्या समस्या आहेत त्या तात्काळ सोडवण्यात याव्या अशा असण्याची तक्रार गृहपाल आदिवासी मुलीचे शासकीय वस्तीगृह उमरखेड यांना देण्यात आले. यावेळी वस्तीगृहातील सर्वच मुली हजर होत्या. वस्तीगृहातील जेवणावर लाखो रुपये खर्च होत असताना देखील आजही वस्तीगृहातील मुलींना आम्हाला जेवण चांगले द्या म्हणून मागण्याची वेळ येते ही एक खेदजनक बाब आहे.
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...
सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...
पाच टक्के दिव्यांग निधी नियमित मिळावा- गजानन वानखेडे सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड :शासनाच्या...
रुढी परंपरेला फाटा देत लावला शिवविवाह सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड येथे जिजाऊ सांस्कृतिक...
बाबासाहेबांनी भगवान बुद्धाचा धम्म देऊन या देश्यावर फार उपकार केले - प्रा.जोगेंद्र कवाडे ✒️ सय्यद रहीम रजातालुका...