वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी)
यवतमाळ , दि १७ मार्च :- यवतमाळ जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी अंतर्गत मंजूर प्रलंबित कामे संबंधित विभागांनी वेळेच्या आत पूर्ण करावीत अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्यात. काही विभागांनी पाच वर्षापासून कामे पूर्ण न केल्याबद्दल जिल्हाधिकारी यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत अशा विभागांना यापुढे खनिज विकास निधीतून निधी दिला जाणार नाही असा इशारा दिला.
यवतमाळ जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी अंतर्गत मंजूर कामाच्या प्रगतीचा आढावा जिल्हाधिकारी यांनी महसूल भावन येथे घेतला यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाखनिकर्म अधिकारी डॉ. शिरीष नाईक जिल्हानियोजन अधिकारी मुरलीनाथ वाडेकर तसेच संबंधित विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
जिल्ह्यात खाणीमुळे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष बाधित झालेले १४० गावांची यादी जिल्हा प्रशासनाने तयार करण्यात केली आहे. यामध्ये आरोग्य विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा शिक्षण, क्रीडा विभाग, जिल्हा परिषद बांधकाम व सार्वजनीक बांधकाम विभाग, पर्यावरण, वनविभाग, कौशल्य विकास इत्यादी विभागांनी या भागातील गावांचा उच्च प्राथम्य व अन्य प्राथम्य याआधारे विकास करण्यासाठी कामांचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्यात. १५ एप्रील च्या आत सदर विभागांनी प्रस्ताव सादर करण्यास त्यांनी सांगितले.
खनिज प्रतिष्ठान निधीतुन प्राथमिकआरोग्य केंद्रातील स्वच्छतागृह तसेच दुर्धर आजारासाठी मदत करण्याचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्यात. शिक्षण विभागाला शाळा दुरुस्ती, वर्ग खोल्यांची दुरुस्ती, स्वच्छतागृह आणि स्वच्छ पिण्याचे पाणी यासाठी त्याचबरोबर ज्या शाळांची पटसंख्या चांगली आहे त्या शाळा डिजिटल व आदर्श शाळा करण्यासाठी प्रास्ताव सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्यात. ई-शिक्षण, वाचनालय, क्रीडा संवर्धन यासाठी सुद्धा त्यांनी प्रस्ताव मागवला.
त्याचबरोबर शासकिय कार्यालयात रेनवॉटरहार्वेस्टिंग , सौर वीज निर्मीती,भौतिक पायाभुत सुविधामध्ये जिल्हा परिषद अंतर्गत येणारे ग्रामिण रस्ते, ग्रामपंचायत इमारत व इतर शासकीय कार्यालये इत्यादी कामासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सुचना श्री येडगे यांनी दिल्यात.
विभागांकडे निधी पडुन राहु नये यासाठी मासिक प्रगती अहवाल सादर करण्यात यावा. तसेच सर्व विभागांनी एक वर्षाच्या आत कामे पूर्ण करावित. वर्षभरात काम पूर्ण न करणा-या विभागांचा निधी परत घ्यावा आणि काम पूर्ण झाल्यावरच निधी देण्याच्या सुचना जिल्हाधिकारी यांनी आज दिल्यात.
बैठकिला जिल्हा परिषद लेखाधिकारी ज्योती भोंडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री मुकडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रल्हाद चव्हाण जिल्हा चिकित्सक डॉ. आर.डी राठोड, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी क्रांती काटोले, #कौशल्यविकास व उद्योजकता सहाय्यक आयुक्त विद्या शितोळे, जिल्हा क्रिडा अधिकारी नंदा खुरपुडे, जलसंधारण अधिकारी तसेच इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...
वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...