Home / यवतमाळ-जिल्हा / मारेगाव / एकच मिशन, जुनी पेन्शन,...

यवतमाळ-जिल्हा    |    मारेगाव

एकच मिशन, जुनी पेन्शन, सरकारी कर्मचाऱ्याची घोषणा.

एकच मिशन, जुनी पेन्शन, सरकारी कर्मचाऱ्याची घोषणा.

शासकीय कर्मचारी रस्त्यावर कार्यालयीन कामकाज ठप्प, मारेगाव येथे बेमुदत संपाला उत्स्फूर्त प्रतिसाद

“जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी” या प्रमुख मागणी सह अन्य मागण्या घेऊन आज पासून राज्य कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला असुन मारेगाव तालुक्यात सदर संपास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.शेकडो कर्मचारी यात सहभागी झाले.शहरातील आंबेडकर चौकातुन निघालेल्या रॅलीचे रूपांतर तहसील कार्यालय येथे सभेत झाले.मारेगाव उपविभागीय अधिकारी यांना “न्याय्य” मागण्याचे निवेदन देण्यात आले

राज्य सरकारी,निमसरकारी कर्मचारी, शिक्षक,शिक्षकेत्तर संघटना,समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांच्या हाकेला प्रतिसाद देत महसूल,शिक्षण,आरोग्य, पंचायत,भूमी अभिलेख या सह इतरही सर्व संघटना संपात एकत्र आल्या.NPS रद्द करा-जुनी पेन्शन लागू करा ही संघटनेची प्रमुख मागणी आहे.विशेष म्हणजे स्त्री कर्मचारी यांनी देखील या संपात हिरीरीने भाग घेतला.हा संप बेमुदत असल्याने मारेगाव तालुक्यातील सर्व शाळा बंद झाल्या.सर्व विभागातील कर्मचारी सहभागी असल्याने प्रशासन प्रभावीत झाले.”एकच मिशन जुनी पेंशन” या मागणीने परिसर दणाणून गेला

सभेमध्ये विविध कर्मचारी संघटनाच्या प्रतिनिधीनी अभ्यासपूर्ण मनोगत व्यक्त करून शासनाने राज्य दिवाळखोरीत जाण्याची चुकीची आकडेवारी दाखवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याची बाब अनेकांनी माडली.जो पर्यंत जुनी पेन्शन लागू केल्याची घोषणा करण्यात येत नाही तो पर्यंत हा संप मागे घेण्यात येणार नाही असा निर्धार कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला

या राज्यव्यापी संपामुळे मात्र तालुक्यातील “शासकीय कामकाज” प्रभावीत झाले.जुन्या पेन्शन च्या या आंदोलनाने प्रशासनाच्या अडचणीत वाढ झाली असली तरी कर्मचारी मागण्यावर ठाम असतील असा निर्धार कर्मचाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

मारेगावतील बातम्या

बोरी (बु ) येथील 32 वर्षीय विवाहित युवकाने विहिरीत उडी टाकून केली आत्महत्या

मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे आयोजन*

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...