Home / यवतमाळ-जिल्हा / भूजल आराखड्याची अंमलबजावणी...

यवतमाळ-जिल्हा

भूजल आराखड्याची अंमलबजावणी करणार जिल्हाधिकारी

भूजल आराखड्याची अंमलबजावणी करणार    जिल्हाधिकारी
ads images
ads images
ads images

भूजल आराखड्याची अंमलबजावणी करणार

 

Advertisement

जिल्हाधिकारी

 

✍️गणेश खडसे

शहर प्रतिनिधी यवतमाळ

 

यवतमाळ :-दि.१३ मार्च (जिमाका):-यवतमाळ जिल्ह्याचा भूजल व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला आहे. हा आराखडा केंद्रीय भूमि जल बोर्डाच्या अधिका-यांनी जिल्हाधिकारी यांना सादर केला. भूजल आराखड्यात सुचविलेल्या बाबींवर अंमलबजावणी करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी बोर्डाचे वैज्ञानिक अभय निवसरकार, सायली टेंभुर्णे, रोजगार हमी योजना विभागाचे उपजिल्हाधिकारी गुलशन राणी

तसेच पाणी पुरवठा व जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाच्या केंद्रीय भूमि जल बोर्ड,जल संसाधन,नदी विकास व गंगा संरक्षण विभागाने जिल्ह्याचा भूजल व्यवस्थापन आराखडा तयार केला आहे. या आराखड्यामध्ये पर्जन्यमान, मानसूनपूर्व व नंतरची पाणी पातळी, भूगर्भातील पाणी पातळीत वाढ व घट, जिल्हयातील भूगर्भ स्थिती, माती व जमीनीचा वापर,कृषि उत्पादन क्षमता,वॉटर टेबल,भूगर्भीय खड़क,भूजल स्त्रोत,संसाधनांची उपलब्धता व वापर,पाण्याची उपलब्धता मागणी व वापर आदींचा सखोल अभ्यास करून सदर आराखडा तयार करण्यात आला आहे.

वैज्ञानिक सायली टेमभुरने यांनी अहवालाचे सादरीकरण केले.भूमिजल बोर्डाच्या अधिका-यांशी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हयाच्या भूजल व्यवस्थापनाबाबत चर्चा केली.बोर्डाने आपल्या अहवालामध्ये सूचविलेल्या बाबीवर अंमलबजावणी करण्यात येईल,असे यावेळी सादरीकरणानंतर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन. 23 November, 2024

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.

...

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव. 23 November, 2024

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.

वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

यवतमाळ-जिल्हातील बातम्या

महायुती चे उमेदवार आ.बोदकुरवार यांना कुणबी समाजाचे युवा उभरता चेहरा महेश पहापळे यांचा पाठिंबा.

वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...

आतापर्यंत सगळ्याला आजमावले एकदा मनसेला संधी द्या- राजू उंबरकर

वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...