Home / यवतमाळ-जिल्हा / खेळाडू विद्यार्थ्यांना...

यवतमाळ-जिल्हा

खेळाडू विद्यार्थ्यांना क्रिडा सवलतीचे वाढीव गुण घेण्याचे आवाहन

खेळाडू विद्यार्थ्यांना क्रिडा सवलतीचे वाढीव गुण घेण्याचे आवाहन
ads images
ads images
ads images

खेळाडू विद्यार्थ्यांना क्रिडा सवलतीचे वाढीव गुण घेण्याचे आवाहन

 

Advertisement

✍️गणेश खडसे

यवतमाळ शहर प्रतिनिधी

 

यवतमाळ,दि.13 मार्च (जिमाका):- माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत प्रविष्ट होणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांना क्रिडा सवलतीचे वाढीव गुण देण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थी जिल्हा, विभाग, राज्यस्तरीय, राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय क्रिडा स्पर्धेत प्राविण्य संपादन केलेल्या व सहभागी झालेल्या खेळाडू विद्यार्थ्यांना क्रिडा सवलतीचे वाढीव गुण देण्यात येणार आहे. क्रिडा गुण सवलत मिळवण्यासाठी  यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांनी  २८ मार्च २०२३ पर्यंत परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा.

क्रिडा गुण मिळण्यासाठी संबंधित खेळाडूंनी इयत्ता १० वी व १२ वी  वर्षात क्रीडा प्रकारात सहभागी होणे आवश्यक आहे.  विभागीय शिक्षण मंडळाकडे प्रस्ताव सादर करणेकरिता खेळाडू हा इयत्ता १० वी व १२ वी शालांत परीक्षेला सर्व विषय घेऊन प्रविष्ट होणारा असावा. जिल्हा विभाग, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यता प्राप्त क्रिडा  स्पर्धेत प्राविण्य असावे. तसेच शालेय व संघटनेच्या क्रिडा स्पर्धा कालावधी हा  १ जून २०२२ ते २८ फेब्रुवारी २०२३ दरम्यानचा असावा.

यासाठी प्रति विद्यार्थी रुपये २५ तपासणी शुल्क म्हणून घेण्यात येईल. प्रस्तावासोबत तपासणी शुल्क विभागीय मंडळ यांचे नावे भरणा केलेल्या बँक चलनाची प्रत जोडणे आवश्यक आहे.

कार्यालयात प्रस्ताव सादर करताना परिशिष्ट ई,क्रीडा गुण सवलतीचा विहित नमुन्यातील अर्ज, परीक्षेचे  प्रवेशपत्र, ओळखपत्र आणि स्पर्धेचे उच्चतम कामगिरीचे प्रमाणपत्र, परिशिष्ट १०,संघटनेकरिता असे मुख्याध्यापक/प्राचार्य यांच्या शिफारस पत्रासह सर्व कागदपत्रे साक्षांकित करून २ प्रतीत प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे व्यक्तीश सादर करण्यात यावे. तसेच एकविध खेळाच्या जिल्हा व राज्य संघटनेने शासन नियमानुसार माहिती आयुक्त क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे व क्रिडा अधिकारी कार्यालय येथे सादर करावे.

जिल्हा संघटना यांनी परिशिष्ट १० व प्रतिज्ञापत्र क्रिडा अधिकारी कार्यालयात सादर करणे अनिवार्य आहे.

तरी यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा/महाविद्यालय यांनी २८ मार्च २०२३ पर्यंत कार्यालयीन वेळेत परिपूर्ण प्रस्ताव क्रिडा कार्यालयात सादर करावा.  अधिक माहितीकरिता क्रिडा अधिकारी कार्यालयात प्रत्यक्ष संपर्क साधावा.  यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयाचे मुख्याध्यापक, प्राचार्य यांनी पात्र खेळाडू, विद्यार्थी सवलत  गुणापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे जिल्हा क्रिडा अधिकारी नंदा खुरपुडे यांनी कळविले आहे.

ताज्या बातम्या

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन. 23 November, 2024

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.

...

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव. 23 November, 2024

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.

वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

यवतमाळ-जिल्हातील बातम्या

महायुती चे उमेदवार आ.बोदकुरवार यांना कुणबी समाजाचे युवा उभरता चेहरा महेश पहापळे यांचा पाठिंबा.

वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...

आतापर्यंत सगळ्याला आजमावले एकदा मनसेला संधी द्या- राजू उंबरकर

वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...