*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
Reg No. MH-36-0010493
भारतीय वार्ता :गणेश खडसे
यव्तरमाळ, दि, ११ मार्च :- शेतकऱ्यांना शासनाच्या विविध कृषि योजना व उपक्रमाची माहिती, संशोधीत कृषि तंत्रज्ञान, नाविण्यपुर्ण प्रयोगशिल शेतकऱ्यांचे अनुभव, बाजारपेठ व्यवस्थापन, कृषि पुरक व्यवसाय इत्यादीचे मार्गदर्शन उपलब्ध व्हावे तसेच
उत्पादक ते ग्राहक थेट विक्री या संकल्पनेवर आधारीत धान्य, खाद्य व सेंद्रीय शेतीमाल ग्रहकांना थेट विक्री करण्यासाठी यवतमाळ जिल्हयामध्ये कृषि महोत्सव आयोजीत करण्यात येत आहे. सदर महोत्सव १८ ते २२ मार्च दरम्यान समता मैदान ( पोस्टल ग्राऊंड) यवतमाळ येथे होत आहे. प्रकल्प संचालक आत्मा तथा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी व महिला आर्थीक विकास महामंडळ यांचे संयुक्त विद्यमाने हा महोत्सव आयोजित करण्यात येत आहे.
या महोत्सवाचे उद्घाटन १८ मार्चला दुपारी १ वाजता राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचे हस्ते होणार असुन अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांचे अध्यक्षतेखाली व इतर लोकप्रतिनिधी यांचे उपस्थितीत पार पडणार आहे.
यवतमाळ जिल्हयात बदलत्या परिस्थितीत शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन देण्यास वाव आहे. प्रयोगशिल व प्रगतिशील शेतकऱ्यांच्या माध्यमातुन शेतकऱ्यांना आप-आपसातील विचारांची देवाण-घेवाण
करण्यास व्यासपीठ उपलब्ध करुन दिल्यास त्यांच्यातील आत्मविश्वास वृध्दींगत होऊ शकतो. आधुनिक कृषि तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास शेतकरी आर्थिक दृष्ट्या उन्नत होऊन जागितक पातळीवरील स्पर्धाक्षम वातावरणात आपले स्थान सिध्द करु शकतील.
म्हणुनच सदर कृषि महोत्सवात शेतकऱ्यांना शासनाच्या विविध कृषि योजना व उपक्रमाची माहिती, संशोधीत कृषि तंत्रज्ञान, नाविण्यपुर्ण प्रयोगशिल शेतकऱ्यांचे अनुभव, बाजारपेठ व्यवस्थापन, कृषि पुरक व्यवसाय इ. बाबतचे मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे. तसेच कृषि प्रदर्शन, कृषि परिसंवाद आणि अनुभवी शेतकरी व उद्योजकांची व्याख्याने, यशस्वी शेतकरी, शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ व विचारवंत यांची भेट या कृषि महोत्सवात घडवुन आणण्यात येणार आहे .
महोत्सवा दरम्यान कौशल्य विकास विभागामार्फ़त रोजगार मेळावा, आरोग्य विभागामार्फत आरोग्य तपासणी शिबीर, पशुसंवर्धन विभागामर्फत पशपक्षी प्रदर्शन, कृषि संलग्न कंपन्यांचा समावेश, शेतकरी सन्मान समारंभ तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सप्त खंजरी वादक संदिप पाल महाराज यांचे भजन, डॉ. मिर्झा रफ़ी अहमद बेग – मिर्झा एक्सप्रेस, नागपुर येथील कापुस पिकावर कृषि किर्तन करणारी शास्त्रज्ञ चमु त्याचबरोबर गुडीपाडव्याला डॉ. राहुल एकबोटे यांची चैत्र पहाट हा संगीत कार्यक्रम होणार आहेत.
याशिवाय महोत्सवात भास्करराव पेरे पाटिल, पंजाबराव डख, पोपटराव पवार ईत्यादी मान्यवरांचे शेतक-यांना बहुमोल मार्गदशन लाभणार आहे.
सदर कार्यक्रमाचे व्यापक स्वरुप पाहता शासन निर्णयानुसार उत्पादक ते ग्राहक थेट विक्री या संकल्पनेवर आधारीत धान्य व खाद्य महोत्सव, कृषि निविष्ठा, कृषि तंत्रज्ञान व सिंचन, गृहपयोगी वस्तु या स्टॉल्सचा सहभाग असेल. त्यापैकी गृहपयोगी वस्तु, कृषि निविष्ठा, कृषि तंत्रज्ञान व सिंचन यासाठीचे स्टॉल प्रायोजकत्व निधीच्या
बदल्यात आरक्षित करण्यात येणार आहेत.
तरी इच्छुकांनी स्टॉल्स आरक्षित करण्यासाठी प्रकल्प संचालक आत्मा कार्यालयाशी 07232-241162, 9623841251, 9764740851 या क्रमांकावर संपर्क साधुन स्टॉल आरक्षित करावा. तसेच जास्तीत जास्त नागरिक, शेतकरी यांनी महोत्सवात भेट द्यावी आणि ग्राहकांनी थेट शेतक-यांचा शेतमाल खरेदी करावा असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...
सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...
पाच टक्के दिव्यांग निधी नियमित मिळावा- गजानन वानखेडे सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड :शासनाच्या...
रुढी परंपरेला फाटा देत लावला शिवविवाह सय्यद रहीम रजातालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड येथे जिजाऊ सांस्कृतिक...
बाबासाहेबांनी भगवान बुद्धाचा धम्म देऊन या देश्यावर फार उपकार केले - प्रा.जोगेंद्र कवाडे ✒️ सय्यद रहीम रजातालुका...