वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
ग्राहकांसाठी विविध विषयांवर चर्चासत्राचे आयोजन
✍️गणेश खडसे
शहर प्रतिनिधी यवतमाळ
यवतमाळ, दि १० मार्च:- ग्राहकांचे हक्क आणि विविध विषयांवर ग्राहकांना मार्गदर्शन करण्यासाठी १५ मार्च जागतिक ग्राहक हक्क दिनी विविध चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने अन्नपदार्थ लेबल व त्याचे वाचन, भुमी अभिलेख विभागाशी संबधित सेवा, तसेच मानवी आहारातील तृणधान्याचे महत्व या विषयावर तज्ञ व्यक्ती मार्गदर्शन करणार आहे.
सदर कार्यक्रम बळीराजा चेतना भवन यवतमाळ येथे दुपारी साडेअकरा वाजता होणार आहे. यावेळी ग्रहकांच्या माहितीसाठी प्रदर्शनी लावण्यात येणार आहे. जागतिक ग्राहक दिनी ग्राहकाचे प्रबोधन व्हावे या दृष्टीकोनातुन अन्न व औषध प्रशासन विभाग, वैधमापन शास्त्र विभाग, एस. टी. महामंडळ, प्रादेशिक परिवहन अधिकारी, स्टेट बँक ऑफ इंडिया, भारत संचार निगम लिमीटेड, आरोग्य विभाग, म.रा.विद्युत वितरण कंपनी, गॅस एजन्सीज, पेट्रोल पंप व कृषी विभाग यांचे मार्फत प्रदर्शनी लावण्यात येणार आहे.
या प्रदर्शनीचे उद्घाटन जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचचे अध्यक्ष नंदकुमार वाघमारे करणार असुन कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी अमोल येडगे व प्रमुख अतिथी म्हणून अप्पर जिल्हाधिकारी पी. के. दुबे उपस्थित राहणार आहेत. सदर आयोजित प्रदर्शनी सायंकाळी ४ वाजेपर्यंत सर्वांना पहावयास खुली राहणार आहे.
जागतिक ग्राहक हक्क दिनाबाबत वैधमापन शास्त्र निरिक्षक गजानन पोहनकर, अन्न सुरक्षा अधिकारी, यवतमाळ गोपाल माहोरे, हे अन्न पदार्थ लेबल वाचन व इतर विषय, जिल्हा अधिक्षक भुमी अभिलेख शिवदास गुंड हे भुमी अभिलेख विभागाशी संबधित सेवेबाबत माहिती देतील, तसेच डॉ. जयश्री उघडे, अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, यवतमाळ हया मानवी आहारातील तृणधान्याचे महत्व या विषयावर मार्गदर्शन करणार आहे.
तरी ग्राहकांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी,
सुधाकर पवार यांनी केले आहे.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...
वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...